संस्कृता स्त्री पराशक्ती

Submitted by दिनेशG on 3 October, 2021 - 12:06

चार वर्षांपूर्वी एक इमेल आली . IIM अहमदाबाद येथील प्रोफेसर पद्मश्री अनिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या Gujarat Grassroots Innovation Augmentation Network संस्थेच्या समर स्कुल ची. माझ्या डिपार्टमेंट च्या चौथ्या वर्षात जाणाऱ्या चार मुलींना त्यांच्या departmental mentor नी थोडे समजावून त्यात भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी एका महिन्यासाठी अहमदाबाद, गांधीनगर येथे जाऊन राहावे लागणार होते. या चारही मुलींची घराची परिस्थिती सामान्य असल्याने विशेष बाब म्हणून त्यांचा सारा खर्च तेथील संस्था उचलणार होती. त्यांच्या पैकी एकीचे वडील त्यांना अहमदाबाद ला सोडून परत आले. त्या एका महिन्याने त्या मुलींचा इंजिनिरिंग कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. समाजातील तळागाळातील साध्य साध्या प्रश्नांना सोडविण्यासाठी इंजिनिअरला ज्या नजरेची, कल्पकतेची आवश्यकता असते त्याची उकल त्यांना होत गेली. समर स्कुल च्या दरम्यान पाळीव जनावरांचे तापमान आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी त्यांनी बनविलेल्या यंत्राच्या प्रोटोटाईप ची खूप वाखाणणी झाली.

त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना त्यांच्या पुढील संशोधनासाठी एक लाख रुपयांचे फंडिंग BIRAC तर्फे मिळाले. IIT Bombay, STMicroelectronics या संस्थांशी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. IIT Delhi, IIM- A मधील सृजनास पूरक असे वातावरण अनुभवता आले.

डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये माझ्या या ग्रुपने बनविलेल्या prototype चे demonstration रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर , मधुर बजाज या दिग्गजांसमोर देण्याची संधी त्यांना मिळाली. या सर्वांनीच त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

सामान्य कुटुंबातून येणाऱ्या या मुलींचे स्वप्न डिग्री ला ऍडमिशन घेण्याचे होते पण पैशाचा प्रश्न होता. पैशाअभावी त्यांचे शिक्षण थांबता नये असे मला मनापासून वाटत होते. चौघींच्याही डोळ्यात शिकायची स्वप्ने मला स्पष्ट दिसत होती. काय करावे असा विचार करत असताना मला मधुर बजाज यांचे demonstration च्या वेळचे शब्द आठवले. त्यांनी मुलींचे कौतुक करत त्यांच्या सोबत गेलेल्या माझ्या सहकाऱ्याच्या हातात आपले विझीटिंग कार्ड दिले होते आणि पुढे कधीही काही मदत लागल्यास ती देण्याचे मुलींना आश्वासन दिले होते. मी त्यांना या मुलींच्या डिग्री च्या शिक्षणासाठी sponsorship appeal लेटर पाठवायचे ठरवले आणि तसे लेटर आम्ही तयार करून email वरून पाठवले. दिलेल्या शब्दाला जागत श्री मधुर बजाज यांनी लगेच बजाज फौंडेशन तर्फे चारही मुलींचा पुढील तीन वर्षांचा प्रत्येकी सव्वा तीन लाखाचा खर्च उचलला.

या वर्षी चारही जणी अत्यंत चांगल्या गुणांनी एस एन डी टी महिला विद्यापीठातून बी टेक झाल्यात. आजच एका प्रख्यात कंपनीच्या ऑफ कॅम्पस प्लेसमेंट मध्ये साऱ्या टेस्ट उत्तीर्ण होत त्यातल्या दोघींची निवड झालीय. उरलेल्या दोघीही लवकरच कुठल्या ना कुठल्या MNC मध्ये जॉब ला लागतील.

इलेक्ट्रॉनिक्स ही मूळ आवड असलेल्या या चौघी आर्थिक गरजेमुळे सॉफ्टवेअर मध्ये काम करायला राजी झाल्यात पण संधी मिळताच त्यांना त्यांच्या मूळ आवडीकडे वळायचे आहे. त्यातल्या दोघी आपले हार्डवेअर डिझाईन चे ज्ञान अद्ययावत व्हावे कालिकत च्या National Institute of Electronics and Information Technology NIELIT Calicut मधून सहा महिन्यांचा VLSI Design चा डिप्लोमा करताहेत आणि पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली तर जर्मनीला जाण्याची स्वप्न बघत आहेत. BARC, ISRO, BHEL सारख्या कंपन्यांमधून core इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करायला मिळावे म्हणून परीक्षा देत आहेत. गुजरात गव्हरमेंट च्या स्टार्टअप फंडिंग साठीचे दिलेले स्वतःच्या स्टार्टअप पिच असफल झाले असले तरी वेळ येताच स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याची जिद्द त्या अजूनही बाळगून आहेत. कौटुंबिक प्रथेनुसार एकीने चक्क लग्न करून संसार थाटलाय खरा पण अजून शिकण्याची आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून भरीव काम करण्याची जिद्द तीही दाखवतेय. HCL Technologies मध्ये निवड झालेल्यात तीही आहे.

हे सर्व लिहिताना एक मार्गदर्शक, शिक्षक म्हणून फार छान वाटतेय. भारताचे पहिले महिला विद्यापीठ जी उद्दिष्ट घेऊन काम करतंय त्याला जागल्याचे समाधान मिळतेय. एका हाडाच्या शिक्षकाला आणखीन काय हवे असते?

Group content visibility: 
Use group defaults