बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ

Submitted by हस्तर on 29 September, 2021 - 04:52

बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ? त्यात देव आनंद क्रिकेट टीम चा अध्यक्ष पण असतात,पोलीस कंमीनेर पण असतो(dig ) ,बोर्ड प्रेसिडेंट पण असतो ,हेलिकॉप्टर मध्ये बसून जमिनीवरच्या लोकांशी बोलू शकता आणि चक्क cindy crowferd च्या पोटी जन्म घेतात

अक्षय कुमार इंटरनॅशनल चेस प्लेअर असतो ,upsc चा अभ्यास पण करतो ,जर्मन आणि फ्रेंच पण येते ,चित्रपटात सगळे हिरो गाणे गातात पण हा ऑफिसिअल्ली गाणे गातो आणि ते पण आई बायको ह्यांची जबाबदारी सांभाळून
(आणि जसा बायकांचा समाधान होत नसते ,टिपिकल बायकांसारखे त्याची बायको म्हणते फुटबॉल खेळ,स्टॅमिना वाढेल )
आणि हो ,इंदिरा गांधी ह्यांना डायरेक्ट सल्ला देतो ना विचारता
वाणी कपूर ने ह्या आधी फक्त ३ रोले केले होते आणि ह्यात पण छोटा रोल आहे ,पण पण पण चित्रपटाच्या शेवटी २ जबरदस्त ट्विस्ट आहे ज्यामुळे तमाम महिलामंडळाला हा चित्रपट खास आवडेल ,वाणी कपूर आणि हुमा दोघींचे रोल खास आहेत

मध्यंतराआधीच भाग तास कंटाळवाणा आहे ,पण नंतर मजा येते
बुद्धिबळासारखे डाव प्रतिदाव, जे लोग बुद्धिबळ खेळात नाहीत त्यांना समजणार नाही पण बरेच कन्सेप्ट इथे टाकण्यात आले आहे

कंटाळवाणा भुज बघून वैतागलेअसाल तर नक्की बघा ,
अक्षय कुमार सहसा पाकिस्तान विरोध भूमिका घेत नाही पण बहुतेक पहिल्यांदा त्याने असा रोल ,केलाय बेबी मध्ये पण सरळ सरळ पाकिस्तान विरोधी नव्हता
सगळ्यात जास्त कमाल मेकअप आर्टिस्ट्स ची,लारा दत्ता ला इंदिरा गांधी हुबे हब केले ,दुसरिकोनी असती तरी फरक नसता पडला ,तिचा बहुतेक अक्षय बरोबर १३ वा चित्रपट आहे

पण बाकी चित्रपट बघतात मजा येते ,बघूनच घ्यावा ,महाराष्ट्रात चित्रपट गृहे खुलेहोते आहे ,किंवा ऍमेझॉन prime वर पण आला आहे

बाकी जास्त परीक्षण देता येते नाही ,स्पॉईलर्स येतील,प्रतिसाद देतानां पण स्पॉईलर्स चे ध्यान ठेवावे हि माफक अपेक्षा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.aksharnama.com/client/article_detail/5487>>> मला अक्षरनामातला रिव्ह्यु आवडला. चित्रपट पाहिल्यावर मलाही हेच वाटले होते म्हणूनही मला तो रिव्ह्यु आवडला असेल.

प्रचंड पांचट चित्रपट.. अर्धा चित्रपट ग्रीपच येत नाही... नंतर झोपून गेलो... अक्षय कडून फार अपेक्षा होत्या.. बेबी, हॉलिडे टाईप काहीतरी असेल असे वाटत होते.. हे फार टुकार निघाले...

Pages