काही बाही

Submitted by मुग्धमानसी on 24 September, 2021 - 13:02

कधी मी असते
कधी मी नसते
कुणाला कळते
कुणा नाही!

मीही हो.. सांगते!
हसतच होते
आताशा दिसते
कुणा नाही!

माझी मीच लुप्त
माझे मन सुप्त
विश्वातून गुप्त...
दिशा दाही!

माझ्या मनातही
उमलते काही
तुला दिसेलही
किंवा नाही!

तरिही इथेही
बहुदा तिथेही
सांडते कुठेही
कुणी नाही!

डोळ्यांतही नाही
काळजात नाही
धगीतही नाही
धूर नाही!

अशी मी बधीर
खरंच अधीर
माझ्यापाशी नाही
फार काही!

तरिही मी आहे
तुझ्यातच आहे
तुला सांगताहे
कविता ही!

तूच माझी बात
तूच मला लात
माझे या जगात
कुणी नाही!

जरी सिद्धहस्त
तरीही उद्ध्वस्त
असे समाधिस्त
काही बाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा!! एकदम छान.
सुरूवातीला एखाद्या गृहीणीवर आहे असे वाटले होते.
(अर्थात तशीही लागू पडू शकते.)