लेकीच्या पाचव्या वाढदिवसासाठी काय गिफ़्ट घ्यावी?

Submitted by मनिम्याऊ on 24 September, 2021 - 11:12

माझी लेक यंदा विजयादशमीला 5 वर्षांची होईल. तिच्यासाठी गिफ़्ट घ्यायची आहे. काही नाविन्यपूर्ण कल्पना सुचवा. तसेच दसरा theme घेऊन घरच्याघरी काय सजावट करता येईल ते पण सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गिफ्ट्स.
मुलांना या टेंट मध्ये खेळायला फार मजा येते.
मला माझ्या मुलाला ख्रिसमस आणि वाढदिवसचं गिफ्ट काय द्यायचं हा गहन प्रश्न पडला होता तो त्यानेच सोडवला. म्हणाला फादर ख्रिसमस ला सांग मला केलडोस्कोप दे आणि तू मला बड्डेला लोगो टॉईज दे. केलडोस्कोप बनवून द्यायचा विचार होता पण मग तो आईनेच दिलाय हे कळेल म्हणून त्याचं किट मिळालं तर किट देईन.

फोटो टाका आता ईथे गिफ्टचे. धाग्याचा फायदा सर्वांना Happy

मुलांना या टेंट मध्ये खेळायला फार मजा येते >> +७८६ फक्त पोरं धुडगूस घालणारी असली की आयुष्य कमी असते. खेळून झाल्यावर शांतपणे गुंडाळून ठेवायची सवय असलेली बरी. अन्यथा नंतर त्याच्या काट्याकुट्या काढून पोरांच्या मारामाऱ्या सुरू होतात Happy

Pages