लेकीच्या पाचव्या वाढदिवसासाठी काय गिफ़्ट घ्यावी?

Submitted by मनिम्याऊ on 24 September, 2021 - 11:12

माझी लेक यंदा विजयादशमीला 5 वर्षांची होईल. तिच्यासाठी गिफ़्ट घ्यायची आहे. काही नाविन्यपूर्ण कल्पना सुचवा. तसेच दसरा theme घेऊन घरच्याघरी काय सजावट करता येईल ते पण सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेकीच्या ईच्छा, आवडीनिवडी, कल, स्वभाव, छंद, बजेट अशी काहीही कल्पना दिलेली नसतांना रँडम गोष्टी सुचवायच्या आहेत का?
ह्याच वर्षी माझ्या एका भाचीला पाचव्या वर्षी स्केट्सच हवे होते तर मुलाच्या शेजारी राहणार्‍या मैत्रिणीला लाईफ साईझ टेडी.

स्केट्स ,
walkie talkie - माझ्या मुली कॅालनीभर फिरत असतात.. त्यामुळे त्यांच्याशी कॅान्टॅक्टमधे राहण्यासाठी मला ह्याचा उपयोग होतो..मुलींनाही walkie talkie नाचवायला मजा येते.

घड्याळ समजत नसेल तर अशा प्रकारचं घड्याळही देऊ शकता. लहान मुलांना समजायला सोप्प जातं.2A442D40-5489-41BD-B4BB-FC81FA40DDFC.jpeg

दुर्बिण द्या. आकाशनिरीक्षण करून आनंदी होईल. एखादा नवा ग्रह शोधुन तिचं तुम्हाला रिटर्न गिफ्ट देईल.

काय दिलं सांग बरं का
बड्डे झाला की

माझ्याकडून काही
रिमोट कंट्रोल्ड सेन्सर हेलिकॉप्टर
लेगो सेट
मोठा व्हाईटबॉर्ड आणि हिरवा वेलवेट बोर्ड शेजारी असेल असे काही
ट्रायसायकल

ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेणे गरजेचे असल्यास, आणि सध्या तो स्वतंत्र नसल्यास, पुढे मागे घ्यायचा असल्यास तो बड्डे निमित्तच घेऊ शकता.
हेच स्टडी टेबलबाबतही म्हणता येईल.

मी लेनोवो टॅब दिला लेकाला 6 व्या वाढदिवसाला. आँलाईन स्कुल पण होतं. त्याचे गेम्स विडीओ पण. शिवाय स्वतःचा टॅब म्हणजे खुपच आनंद झाला त्याला.
कॉलिंग वाला आहे पण सिम घातलं नाहीये. पुढे गरज वाटल्यास घालू.

टायटनची झुप म्हणुन लहान मुलांची घड्याळ मिळतात. छान असतात डिझाईन्स.
आवडत्या कार्टुनची उशी किंवा पातळ ब्लँकेट घेवुन द्या. किंवा त्याचा सॉफ्ट टॉयपण मिळतो तोही चालुन जावा.

खूप क्यु ट बाफ
१) कलरिन्ग बुक्स व स्केचपेने/ क्रेयोन्स हे तर मी सांगेनच.
२) प्लस कलर्स मध्ये छान वासाची फ्लेवर वाली पण येतात. स्ट्रॉबेरी वगैरे मुलंना गंमत वाटेल.
३) छो टे घर जे आप्ण बांधावे लागते. प्लास्टिकचा साचा मिळतो व वरून ते घराचे प्लास्टिकचे पस्रवायचे. एक दार असते. आत मुले खेळत बसतात.

४) पपी डॉग आत्ता बाळ घेतले तर मुलगी दहा व्वी होईपरेन्त मस्त जोडी जमेल.

५) भली मोठी अ‍ॅक्टी विटी बूक ज्यात कोडी कलरिन्ग सगळेच असते

६) खूप सारे क्राफ्ट चे डब्बे.: ह्यात मॅक्रामे, छो टे कुंभाराचे व्हील व माती रंगवायचे सजवायचे दिवे पणत्या, दगड, विणकाम, मण्यांचे दागिने बनवाअय्चे सेट. छोटा लेमोनेड सेट मुले दुकान दुकान खेळू शकतील.
७ ) स्पा यरो ग्राफ
८) बार्बी व तिची बहीण व कपडे.

छानसा कल्पक असा मेकॅनो. फक्त हाताने प्रेस करून फिटींग वाला नाही, मेटलचा स्क्रू नट्स वापरून फिटिंग वाला.
त्यात भंबाट मजा तर आहेच, शिवाय बुद्धीला चालना छान मिळते.

धन्यवाद Happy
ठरलं का काय घ्यायचं ते? छान छान सुचवलय सगळ्यांनी
Submitted by धनुडी>>

हो. खूप आयडियाज मिळाल्या.
1 -२ दिवसात नक्की ठरलं की order करेन.
(लेकीला वाचून दाखवलं तर प्रत्येक वस्तू हवी आहे. Lol आणि त्या त्या item ची तिला कित्ती कित्ती गरज आहे ते निरनिराळ्या प्रकारे मला पटवून देणं सुरू आहे Lol )

दहा पंध रा छोट्या छो ट्या वस्तू घ्या व ट्रेझर हंट सारखे करा घरातच. तिला मजा येल. बोर्ड गेम खेळा यला ती लहान आहे पण व्यापार वगैरे चालेल. साप शिडी लुडो.

दहा पंध रा छोट्या छो ट्या वस्तू घ्या व ट्रेझर हंट सारखे करा घरातच.
>>>>
+७८६
आमच्याकडे गेले दोन वर्षे हे करतोय. सहाव्या वाढदिवसाला सहा गिफ्ट्स, सातव्याला सात Happy
फार मज्जा येते पोरीला. याचा विडिओही काढतो, तो ही मग छान वाटतो बघायला.
यंदा पोरगी म्हणाली, आपण ममाच्या बड्डेला ट्रेजर हंट करूया. मग जागाही तिलाच ठरवायला सांगितल्या आणि चिठ्याही तिलाच लिहायला सांगितल्या.
आता तर आमच्याकडे ट्रेजर हंट ही प्रथा झाली आहे. गिफ्ट्स शोधण्यातच एक आनंद असल्याने त्या छोट्या छोट्या ठेउनही मोठा मोठा आणि रीपीट आनंद मिळवता येतो. त्यामुळे माझा खिसाही फार हलका होत नाही हा एक वेगळाच आनंद Happy

आर्ट कीट मिळते, किंवा कलरींगचे पण मिळते, त्यात खूप वस्तु असतात, महिना सहज निघतो त्यात.
असेच मॅजिक कीट मिळते आणि त्यात बुकलेट पण असते की जादू कशी करायची मस्त असते ते.
प्रयोग करायला आवडत असतिल तर सायंस चे खेळ असलेले डीआयवाय गेम्स असतात ते.

Magic Pot चे वर्षाचे subscription. 5 वर्षे वयोगटासाठी छान पुस्तके आहेत ती. माझ्या मुलीला खूप आवडायची. Weekly की bi-weekly आहेत हे बघून घ्या.

वाढदिवस दणक्यात झाला. 5वा म्हणून 5 गिफ़्ट्स घेतल्या. फ्रॉक, मोठा टेन्ट्, क्राफ़्ट्चे सामान्, लहान टेलिस्कोप् आणि खास तिच्यासाठी बनवलेले साबण.
सकाळी उठल्याबरोबर Treasure Hunt खेळून गिफ़्ट्स हुडकायला मज्जा आली.
Thank you all

अरे व्वा. . मस्तच.
इथे updates दिले हे छान केलेत. छान वाटले.
आता जिव्हाळ्याचा प्रश्न - मेनू काय होता ?

5वा म्हणून 5 गिफ़्ट्स घेतल्या.
सकाळी उठल्याबरोबर Treasure Hunt खेळून गिफ़्ट्स हुडकायला मज्जा आली.
>>
अरे वाह मस्त. हे छान केलेत
गिफ्टही छान निवडल्यात

Pages