गणेशोत्सव संपताना एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे.
मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.
संबंधित व्यक्ती ही मराठी भाषिक असावी. समजा, मराठी मातृभाषिक नसेल तर महाराष्ट्रात रुळलेली व मराठी बोलणारी सुद्धा चालेल. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले असेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा प्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.
धाग्याची सुरुवात खालील २ वाचलेल्या बातम्यांनी करतो :
१.
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. (https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-parivar-ganeshotsav...)
साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
................................................
२.
सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार.
(https://www.loksatta.com/pune-news/sonali-nawangul-dr-manjusha-ku-lakarn...)
तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांसंबंधीच्या गौरव बातम्या.
समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.
…………………………………………………………………………………….
संपदा मेहता
संपदा मेहता
सनदी अधिकारी
माननीय राष्ट्रपतींच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती.
नवनिर्मिती : झटपट ECG
नवनिर्मिती : झटपट ECG काढण्याचे छोटे यंत्र
कार्डिओप्लॉट 12
तन्वी निकाळजे ( एमबीबीएस डॉक्टर)
प्रतीक तोडकर (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर)
मिहीर.गायकवाड( एमबीए विद्यार्थी)
सर्वजण औरंगाबादचे.
या सुटसुटीत उपकरणाला मोबाईल बॅटरीची ऊर्जा पुरते. छोट्याशा केबलने ते मोबाईलला जोडलेले असते. केवळ एक मिनिटात इसीजी काढून होतो आणि त्याचा अहवाल पीडीएफ स्वरूपात तयार होतो.
अभिनंदन !
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे मानद सदस्यत्व
विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी.
https://www.loksatta.com/pune/dr-ravindra-kulkarni-national-academy-of-e...
माहिती आणि या धाग्याबद्दल
माहिती आणि या धाग्याबद्दल धन्यवाद डॉक्टर कुमार...
नुकतेच या धाग्याला १ वर्ष
नुकतेच या धाग्याला १ वर्ष पूर्ण झाले.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
सर्वांची माहिती प्रेरणादायी आहे.
डॉ. सागर जवळे,
डॉ. सागर जवळे,
जळगाव
* लहान मुलांचे मूत्रमार्ग शल्यविशारद.
*संशोधनात अग्रेसर : 40 स्वामित्व हक्क प्राप्त
*अनेक नव्या शस्त्रक्रिया आणि खूप स्वस्तात होणार्या अभिनव उपचारांचा शोध
https://issnawards.com/amo-team/dr-sagar-jawale-ms-dnb-m-ch/
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती.
अभिनंदन
त्यांचं धनंजय नाव प्रथमच
त्यांचं धनंजय नाव प्रथमच वाचलं. कायम D Y असंच दिसलंय.
वडील Y V.
यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळतो आहे , असं वाचलं. तो सार्थकी लावावा.
वडील Y V.>>>
वडील Y V.>>>
बरोबर.
हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी.
मागे आमचा एकदा माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा झाला होता. त्यात त्यांनी भाषण केले होते. अगदी प्रामाणिक !
ते स्वतः विद्यार्थी असताना शाळेतल्या मास्तरांना कशी टोपणनावे ठेवत होते ते त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
सतीश आळेकर
सतीश आळेकर
नटवर्य पणशीकर जीवनगौरव पुरस्कार
विष्णुदास भावे गौरवपदक
महाराष्ट्र शासनाने आयोजित
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहा'तील स्पर्धेत देशभरातून एकूण 24 विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
त्यातील 13 स्टार्टअप महाराष्ट्रातील आहेत .!
अभिनंदन !
(बातमी: छापील सकाळ 24/ 10/ 2022)
डॉ. सुधीर रसाळ
डॉ. सुधीर रसाळ
ज्येष्ठ साहित्य समीक्षक
यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार
डॉ. माधव गाडगीळ
डॉ. माधव गाडगीळ
श्री मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार
अभिनेते प्रशांत दामले यांचा
अभिनेते प्रशांत दामले यांचा विक्रमी 12,500वा नाट्यप्रयोग संपन्न.
कौतुकास्पद कार्य :
कौतुकास्पद कार्य :
श्री सचिन मराठे हे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच नियमित रक्तदाते आहेत. 2010 पासून ते पुण्यातील एका रक्तपेढीत महिन्यातून एकदा असे नियमित प्लेटलेट्स दान करतात. आतापर्यंत त्यांनी 130 वेळा असे दान केलेले आहे.
अभिनंदन !
कालच्या इंडियन
कालच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये पहिल्या पानावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरचे क्षण टिपणारे छायाचित्र आहे . त्यांची दोन foster children आहेत. दोन्ही मुली व्हीलचेअरवर आहेत. वेगळाच मनुष्य आहे हा!
असंच एक न्यायक्षेत्रातलं मराठी नाव धर्माधिकारी.
चंद्रशेखर धर्माधिकारी आणि त्यांचे चिरंजीव सत्यरंजन धर्माधिकारी. हे दोघे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले नाहीत. पण नावं मात्र लक्षात राहिलीत.
*नावं मात्र लक्षात राहिलीत.
*नावं मात्र लक्षात राहिलीत.
>>> खरंय.
आणि सध्या चर्चेत असलेले अजून एक नाव म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. त्यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
हो. ते न्यायाधीक्ष म्हणून कधी
हो. ते न्यायाधीक्ष म्हणून कधी ऐकू आले नाहीत. त्यांचं लेखन मात्र दिसलंय. दिवाळी अंकांत् त्यांच्या आत्मचरित्राचे अंश आले होते. वृत्तपत्रांतही लिहित असावेत.
पत्रकार द्वारकानाथ लेले यांनी
पत्रकार द्वारकानाथ लेले यांनी स्थापन केलेल्या काव्यशिल्प या कवी आणि रसिकांच्या संस्थेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.
(द्वारकानाथ लेले हे स्वतः कवी नव्हते परंतु काव्यरसिक होते).
द इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे
द इन्फोसिस सायन्स फाउंडेशनचे यंदाचे पुरस्कार घोषित.
विदिता वैद्य (लाईफ सायन्सेस)
महेश काकडे (गणितीय विज्ञान)
निस्सीम काणेकर (भौतिकशास्त्र)
विद्यानिधी (प्रसाद) वनारसे
विद्यानिधी (प्रसाद) वनारसे
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
(डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे).
डॉ. जयंत खंदारे, पीएचडी
डॉ. जयंत खंदारे, पीएचडी
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा डॉ. ए व्ही रामाराव उत्कृष्ट आंत्रप्रेन्युअर पुरस्कार.
त्यांनी स्थापन केलेल्या एआयआर या संस्थेने कर्करोगाच्या चाचणी संदर्भात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.
यंदाच्या बालदिनी चोपडा येथील
यंदाच्या बालदिनी चोपडा येथील रहिवासी चेतना मराठे हिची संसद भवनातील मध्यवर्ती कक्षात भाषण करण्यासाठी निवड झाली होती. तिच्या भाषणातून तिने संसद सदस्यांची मने जिंकली.
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. त्यासाठी यंदा देशभरातून 25 विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
भाषा सर्वेक्षण माहितीपट :
भाषा सर्वेक्षण माहितीपट : समास
संशोधन प्रमुख : डॉ. गणेश देवी
लेखक-दिग्दर्शक : धनंजय भावलेकर
चित्रपटातील निवेदन : डॉ. मोहन आगाशे
सदर माहितीपटाची केरळ सरकारच्या 14 व्या आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सवात निवड. मदुराई फिल्म महोत्सवातही प्रदर्शित होणार
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांचे नाट्य दिग्दर्शनाचे एक शतक पूर्ण !
' काळी राणी' हे शंभरावे नाटक.
ज्ञेय कुलकर्णी
ज्ञेय कुलकर्णी
शालेय विद्यार्थी वय ९
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर
चार वर्षाच्या लहान मुलाचे विजेचा झटका बसण्यापासून संरक्षण करून प्राण वाचवले.
पुरस्कार 25 जानेवारीला नवी दिल्ली येथे दिला जाणार.
अभिनंदन !
(बातमी: छापील सकाळ 13 जानेवारी 2023)
मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा
मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा ध्यास घेतलेल्या
एकलव्य फाउंडेशनचे
यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण
शर्मिला ओसवाल
शर्मिला ओसवाल
संचालक, बॅसिलिया ऑरगॅनिक स्टार्टअप
जागतिक पातळीवर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी केंद्र सरकारतर्फे 2023 साठी या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे.
महिला दिन विशेष:पल्लवी मराठे
महिला दिन विशेष:
पल्लवी मराठे
व
डॉ. कीर्ती बडवे
या दोघींचा ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स या परिषदेत सन्मान.
त्यांच्या संशोधनामुळे :
१. इस्रो आणि नासाच्या नावाने होणाऱ्या शास्त्रीय फसवणुकीचा उलगडा झाला.
२. देशद्रोहाच्या प्रकरणात महत्त्वाचे निष्कर्ष हाती लागले.
(बातमी: छापील सकाळ 8 मार्च 2023)
अहमदनगर येथील दरेकर
अहमदनगर येथील दरेकर परिवारातर्फे वेगळ्या लग्नकार्य प्रथेची सुरुवात:
होतकरू तरुणांना व्यवसायाचे "संधीदान"
https://loksattasangharsh.com/?p=24596
Pages