गणेशोत्सव संपताना एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे.
मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.
संबंधित व्यक्ती ही मराठी भाषिक असावी. समजा, मराठी मातृभाषिक नसेल तर महाराष्ट्रात रुळलेली व मराठी बोलणारी सुद्धा चालेल. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले असेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा प्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.
धाग्याची सुरुवात खालील २ वाचलेल्या बातम्यांनी करतो :
१.
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. (https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-parivar-ganeshotsav...)
साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
................................................
२.
सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार.
(https://www.loksatta.com/pune-news/sonali-nawangul-dr-manjusha-ku-lakarn...)
तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांसंबंधीच्या गौरव बातम्या.
समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.
…………………………………………………………………………………….
लहान बाळासह रेल्वे प्रवास
लहान बाळासह रेल्वे प्रवास करणाऱ्या मातांना प्रवासात निर्धास्त झोप घेता यावी म्हणून नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलचे प्राध्यापक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षली देवरे यांनी संशोधन करून बाळांच्या बर्थची निर्मिती केली आहे.
या फोल्डेबल बेबी बर्थला पेटंट मिळाले असून हे संशोधन भारतीय रेल्वेला मोफत देण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आहे.
अभिनंदन !
https://marathi.abplive.com/news/maharashtra/nandurbar-researcher-builds...
खूप सकारात्मक धागा..
खूप सकारात्मक धागा..
धन्यवाद डॉ. कुमार सर _/\_
डॉ. के एच संचेती यांना द नोबल
धन्यवाद.
...............
डॉ. के एच संचेती यांना द नोबल इंडिया फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार
https://www.dainikprabhat.com/dr-kantilal-hastimal-sancheti-awarded-nobe...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४४ व्यक्तींना 'महाराष्ट्राची गिरिशिखरे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
https://www.deshdoot.com/others/maharashtra/maharashtrachi-girishikhare-...
डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल
डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी नुकतीच ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे.
अभिनंदन !
https://www.lokmat.com/national/atul-rane-appointed-head-brahmos-aerospa...
महाराष्ट्राची शान! सायना
महाराष्ट्राची शान! सायना नेहवालला हरवणारी नागपूरची मराठमोळी मालविका देशाची नवी आशा
https://www.loksatta.com/photos/sports-gallery/2760740/badminton-player-...
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1744185245781310&id=49096497...
डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील,
डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील, औषधनिर्माणशास्त्रज्ञ.
सलग तिसरे सुवर्णपदक प्राप्त.
कर्करोग -औषध संशोधनात अग्रेसर
अभिनंदन !
बीड जिल्हा परिषदेच्या कुर्ला
बीड जिल्हा परिषदेच्या कुर्ला प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बालवैज्ञानिक ओंकार अनिल शिंदे याने डोळ्यात पाणी न येता सराईतपणे कांदा कापता यावा यासाठी संशोधन करून ‘स्मार्ट चाकू’ची निर्मती केली आहे. त्याच्या या संशोधनाची दखल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतली आहे. त्याचे हे संशोधन दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
https://marathipaper.com/seeing-the-tears-in-the-mothers-eyes-while-cutt...
मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात
मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा; संदीप पाठकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
https://www.loksatta.com/manoranjan/sandeep-pathak-has-won-the-best-acto...
मंगला गोडबोले :
मंगला गोडबोले :
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार.
डाॅ. सोनम कापसे
डाॅ. सोनम कापसे
पुण्यातील ‘टेरासीन’ रेस्टाॅरंट पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ‘टेरासीन’ची कल्पना सुचली. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डाॅ. सोनम कापसे यांनी टेरासीन हे रेस्टॉरंट सुरू केलं.
https://www.loksatta.com/pune/dr-sonam-kapde-launched-terrasinne-restaur...
अभिनंदन !
राजीव गांधी पुरस्कार जाहीर
राजीव गांधी पुरस्कार जाहीर
डॉ. मोहन आगाशे : कला गौरव
श्रीरंग इनामदार ( खो-खोपटू) : क्रीडा गौरव
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर :
परम विशिष्ट सेवा पदक
डॉ. संजय तोषनीवाल, वाशिम
डॉ. संजय तोषनीवाल, वाशिम
डॉ. जितेंद्र नाईक, जळगाव
डॉ. आनंद कुलकर्णी, औरंगाबाद
रक्तदाबावरील प्रभावी औषध शोधण्यासाठी भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पेटंट
(Sustained release metoprolol succinate).
अभिनंदन !
डॉ. सदानंद सरदेशमुख
डॉ. सदानंद सरदेशमुख
जीवन गौरव पुरस्कार ,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
( आयुर्वेदिक क्षेत्रात भरीव संशोधन)
अभिनंदन
दीपक चटप
दीपक चटप
ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या 45 लाख रुपयांच्या Chevening शिष्यवृत्तीचा मानकरी
ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील.
https://pudhari.news/latest/248816/chevening-scholarship-the-first-young...
इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला
इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटला मोठा मान मिळाला आहे. लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे. शनिवारी (२३ जुलै) हे नाव देण्यात आले. इंग्लंडमधील एखाद्या क्रिकेट मैदानाला भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
https://www.loksatta.com/krida/leicester-cricket-ground-from-england-nam...
डॉ. अपूर्वा पालकर
डॉ. अपूर्वा पालकर
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू.
मस्त धागा आहे हा.
मस्त धागा आहे हा.
ताजी बातमी :
ताजी बातमी :
न्यायमूर्ती उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश होणार
न्यायमूर्ती उदय लळीत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत. देवगड तालुक्यातील कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/cji-n-v-ramana-recommend-justice-uu...
माझे मावससासरे डॉ देगलूरकर
(माझे सख्खे मावससासरे) मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ देगलूरकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मला काकांचा थोडा सहवास व त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली आहे. अतिशय साधे व थोर व्यक्तिमत्त्व आहे. उत्तुंग व्यासंग, महान कर्तुत्व !
https://mpcnews.in/babasaheb-purandare-award-dr-deglurkar-mla-chandrakan...
छान, अभिनंदन !
छान, अभिनंदन !
...
प्रतिक्षा तोंडवळकर
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 37 वर्षांपूर्वी सफाई कामगार म्हणून सेवेस प्रारंभ.
आज त्याच बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर.
जिद्दीचा प्रवास !
https://thelogicalindian.com/uplifting/journey-of-pratiksha-tondwalkar-f...
अमित पाटणकर
अमित पाटणकर
(वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावटकार)
xim20 या संकल्पना कारसाठी रेड डॉट डिझाईन आणि अन्य मानाचे पुरस्कार
13 आंतरराष्ट्रीय पेटंटस
शिल्पा व्यापारी
शिल्पा व्यापारी
वयाच्या २६ व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू करत जपानमध्ये व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान
(इंडिकस सॉफ्टवेअर)
https://www.esakal.com/saptarang/it-companies-japan-senior-executives-es...
केवळ कौतुकास्पद!!! निखळ
केवळ कौतुकास्पद!!! निखळ कर्तुत्व.
कर्त्रूत्व शब्द लिहीता येत
कर्त्रूत्व शब्द लिहीता येत नाहीये.
कर्तृत्व kartRutva
कर्तृत्व
kartRutva
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
शिक्षक दिन विशेष : राष्ट्रपती
शिक्षक दिन विशेष : राष्ट्रपती पुरस्कार
* सोमनाथ वाळके, बीड
* शशिकांत कुलथे, बीड
* कविता सिंघवी, मुंबई
Pages