शशक पूर्ण करा - "माय-बोली" - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 19 September, 2021 - 07:48

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

पाहतो, तर खोलीबाहेर माय उभी. मी डोळ्यांतून जमिनीवर सांडलेलं पाणी पटापट पुसतो. खरं म्हणजे मला आत्ता खोलीत अजून कुणीच नको असतं.
"काय रे, काय झालं? असा एकटा कुढत बसू नकोस."

मी काहीच बोलत नाही. बाजूला ठेवलेला उघड्या लॅपटॉपचा स्क्रीन तेवढा आईला दिसतो.
"अरे इतक्या मनावर नसतात घ्यायच्या ह्या गोष्टी! उद्या गणेशोत्सव संपल्यावर शशकचा रतीब बंद होईलच की! उद्याच वर काढ तुझा अ-गणेशोत्सवी माहितीपूर्ण धागा. आता रडायचं काय कारण?"
.
.
.
"संयोजकांनी सगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांची तारीख सव्वीस सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
सीरीयसली वाचत होते.शेवटी फिस्सकन हसु आलं.

Lol

>>>>>कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय.
>>>>>मी डोळ्यांतून जमिनीवर सांडलेलं पाणी पटापट पुसतो.
Lol Lol Lol आई ग्ग! एवढं टपाटप पाणी पडतय लोल!!!

आई ग्ग! एवढं टपाटप पाणी पडतय लोल!!! >> हा हा. तुम्ही पुन्हा वाचल्यावर सापडलं वाटतं हे. पारायण केल्यावर स्तोत्रातून नवीन गर्भित अर्थ सापडतात ना, तसं वाटलं. Wink

आई ग्ग Lol एक नंबर जमलीय

आणि च्रप्सशी सहमत. २६ म्हणजे जरा जास्तच वाढवली तारीख.जास्त झाले की बोअर होते. आजूबाजूला गणपती गेलेत. हॅंगओवरही उतरला आहे. आपल्याकडेच बळंच चालू आहे. . त्यात लोकंही उगाचच अति गोड बोलत आहेत एकमेकांच्या धाग्यावर. कुठे काही पेटत नाहीये. हम आपके है कौन संपल्याबर हम साथ साथ है लावला तर कसे वाटेल बघायला तसे झालेय..