मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्क्याची सगळ्यांना उपदेश पाजणारी बडबड बघून हसू येत होतं काल. अन मग जय ची रडारड. मीराचा अप्पू ड्रामा तर इतका फेक! पण ड्रामा शेवटी वाया गेला. दादुस चा त्याग इ. सुद्धा झाकोळला गेला. जय आणि उत्क्याचे तोंड बघण्यासारखे झाले होते काल. वि+वि ने कॅप्टनशिप न जिंकता काय केले अन काय मिळवले हे त्यांना व्यवस्थित समजले असे दिसत होते. आज प्रोमो आलेत त्यात जळजळ दिसते आहे त्यांची.
आता या आठवड्यात दादुस आणि पुढच्या आठवड्यात नीता जाणार का? सोनाली ला तर भरपूर सपोर्ट आहे असे दिसते सोमि वर. सध्या उत्क्या आहे म्हणे नं ६ वर! दादुस च्या थोडासाच वर.

मी परवा दोन वि ना सेम votes दिलेली. आज विकासला पाच votes आणि nitha ला पाच votes देऊन आले.

विकास तीन नंबरवर होता पण त्याने जयला मागे टाकून दोन नंबर मिळवला वर तो विशाललाही टक्कर देतोय, भारी आहे हे.

उत्क्याचा फुल्ल पोपट केला विकासने..... खुप भारी त्याग केल्यासारखा मिरवत होता..... विशाल-विकासचा सीन बघून चेहरा बघण्यासारखा झालेला त्याचा!!
त्यालाच हाकलले पाहिजे आता..... तो सोबत नसताना जय सुद्धा सुसह्य वाटतो!!
सोनाली एरवी एव्हढी विशाल विशाल करत असते तर आता एक आठवडा नॉमिनेट व्हायला आणि ती पाटी घालायला का एव्हढी हो- नाही करत होती!!
मीरा म्हणतीय विकासला मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून विशालने कापले स्वताचेच केस..... आता तिला जेंव्हा कळेल की ही आयडिया विकासचीच होती (मांजरेकर बोलतीलच उद्या चावडीवर ते) तेंव्हा मज्जा येईल
मीनलला तिसऱ्या नंबर साठी टफ देतोय विकास!!

एक नवीन प्रोमो आलाय त्यात विकास रडतोय कारण विशालने मुद्दाम केस कापून त्याचा त्याग झाकोळला असं त्याचं म्हणणं आहे.

बोललो ना मीनल आणि विकासाला नाही आवडलं विशालने हिरोगिरी केलेली. मीनल विशालला कानाखाली मारेन बोलली. लोक्स आपले विनाकारण दोस्तीचं उदाहरण देत फिरताहेत.
https://youtu.be/LmheTk2y9tQ

मीनल विशाल मध्ये वाजले तो प्रोमो बघितला आत्ता. त्यात विकासचे काही नाहीये. विकासनेच सुचवलं की तू केस काप.

>> विकास डोक्याने खरोखर हुशार आहे आणि प्रामाणिकपणे त्याने सांगितलंही की कदाचित मी शेवटचा असतो आणि माझं मत निर्णायक नसतं तर मी केस कापले नसते<<
टीम बी मधले एकतर अतिशय मुर्ख आहेत, अथवा सिंपथी वोट घ्यायचा प्रयत्न करत आहेत. जयला ५ वोट्स खात्रीने मिळणार हे ढळढळीत सत्य समोर असताना एकानेहि हुशारी दाखवली नाहि. विकास तर बिग्गेस्ट डंब. त्याचं मत इक्वलायजर ठरणार, आणि नंतर स्नेहा डोळे झाकुन जयला मत देणार याची त्याला कल्पना आली नसेल तर विशालचे केस गमावल्याचा दोष त्याला लागायला हवा...

घेऊदेकी सिंपथी votes . म मां च सांगत असतात ना सिंपथी मिळवा.

लढाई शेवटपर्यन्त लढायची असते, दुसरा काय करणार हे आधीच ठरवून हत्यार टाकायचे नसते, भले समोर हार दिसूदे . त्यामुळे विकासने बरोबर केलं असं माझं पर्सनल मत.

त्याचा त्याला फायदाच झाला, जयला मागे टाकलं वोटिंगमध्ये त्याने. असंही त्याला काही दिवस कुठे बाहेर हीरोचा रोल करायचा आहे, वाढतील केस. परफेक्ट खेळला तो.

सगळ्यात स्मार्ट मीरा आहे. बिग बॉस बाहुले फोटो नष्ट करायला सांगतो हे तिला माहीत असावं. त्यामुळे तिने आदल्या दिवशी डिमार्टमध्ये जाऊन तो अप्पू आणला असावा आणि याच्याशिवाय मी राहू शकत नाही असं बिग बॉसला भासवलं. तसाही तो अप्पू नवीन बाहुलाच वाटत होता. बिग बॉसला पण कल्पना होती की ही आपल्याला गंडवते त्यामुळे त्याने फोटो पण नष्ट करायला सांगितला. पण मीराने त्या बहुल्यातच आपला जीव अडकलाय हे खोटं खोटं दाखवत बिग बॉसला टिझ केलं.

सिंपथीचा तो दावेदार आहे जो विचार करुन त्याग करतो. सिंपथी खिरापती प्रमाणे वाटली जात नाहि.. जाऊ नये...

आणि बिगबॉस हा हुशारीने खेळायचा खेळ आहे, सिंपथीचा नाहि. या घटनेत हुशारपणा मुळे सिंपथी कोणाला मिळायचीच असेल तर ती विशालला मिळायला हवी...

मला तो विशाल आणि विकासमधला संवाद फार आवडला..... वर्षभर चालेल प्रोमो आणि सर्चमध्ये फक्त आपलेच व्हिडीओ वगैरे आणि लोकांना हे प्रचंड अपील होईल हे पटल्यामुळेच विशालनेही ते केले.

प्रॅक्टिकली विशालसाठी कुणीच काही केले नसते तरी चालले असते कारण जय कॅप्टन होणार हे उघड होते पण इथे एका आठवड्याचे कॅप्टन होण्यापेक्षा बिगर पिक्चर पाहिले लोकांनी!!

कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठी ही दोन्ही ट्विटर हॅंडल्स विकास विशालचं केशदान कॅश करताहेत.

विशालने स्वतः:चे केस कापले तेव्हाची जयची रिअॅक्शन पैसा वसूल होती.

त्याचं मत इक्वलायजर ठरणार, आणि नंतर स्नेहा डोळे झाकुन जयला मत देणार याची त्याला कल्पना आली नसेल>>> तसे तर टास्क सुरू व्हायच्या आधीच त्यांचे बोलणे झाले होते कि तिकडे ५ आणि ४ मत मिळून १ मताने जय जिंकणार. पण तरीही टास्क खेळून/हारून त्यांनी बाजी मारली. आधीची जयची, दादूसची, मीराची रडारडी, उत्कर्षचा मोठा त्याग केल्याचा आव यातली हवाच काढून टाकली. मीरा, गायत्रीला संधी होती स्वतंत्र खेळायची पण त्या जय-उत्कर्षच्या छत्रछायेखाली खुश आहेत.
मला कधी कधी वाटते कि मिनलला जय बरोबर खेळायला आवडते. सुरूवातीला ती त्याच्याशी बोलायला जायची पण तो काही भाव द्यायचा नाही. नंतर ती त्याच्यावर चिडायची पण त्याच्याबरोबर टास्क केल्यावर मजा आली सांगायची. प्लस या गटात विविच्या दोस्तीमुळे ती तिसऱ्या नंबरवर पडते. ते तिला आवडत नसेल. हार पचवता येत नाही तेही दिसते.

आणि बिगबॉस हा हुशारीने खेळायचा खेळ आहे >>> करेक्ट. त्यामुळेच जय क्लियरली जिंकणार हे माहित असतानाही विकास ने आउट ऑफ द बॉक्स विचार केला अन इट वर्क्ड बिग टाइम!! कालचे टास्क जय ने जिंकले तरी कॅपटनशिप पेक्षा जास्त फायदा वि+वि चा झाला! सोमि वर जाऊन पहा Happy त्याग वाया कुणाचा गेला असेल तर तो दादुस चा. खाया ना पिया ग्लास तोडा बारा आना, असे होऊ शकते त्यांचे.

दादूसचा त्याग कसा वाया गेला हे समजलं नाही. विशाल कॅप्टन झाला का? जय कॅप्टन झाला असेल तर विकासचा त्याग वाया गेला. केस गेले आणि त्यासोबत मतं पण विशालने खाऊन टाकली. विकास उघडपणे हे बोलू शकत नाही पण मनात असणारच त्याच्या हे. त्याचाच परिणाम म्हणून मीनल आज विशालला बोलली कानाखाली देईन. विकास पण आतून धुसफूसत असणार आणि योग्य वेळ आल्यावर परतफेड करणार.

लाइमलाइट वि+वि ने घेतला त्यामुळे दादुस ला स्वतःला त्या त्यागाचा फायदा झाला नसावा म्हणून. शिवाय याच आठ्वड्यात घरी जाऊ शकतात ते.
विकासचा त्याग वाया गेला. >>>> क्या? क्या?? क्या??? (तीन वेळा कॅमेर्‍यात पहाण्याची रिअ‍ॅक्शन) जाउ द्या झालं Happy

लाईमलाईट विशालने घेतला फक्त हे विकासला पण कळून चुकलंय त्यामुळेच आजचे जे सगळे प्रोमो दाखवले त्यात विकास गप्प गप्प आहे. दादूस आज ना उद्या जाणारच आहेत, पहिल्या पाचात ते नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे.

क्या? क्या?? क्या??? (तीन वेळा कॅमेर्‍यात पहाण्याची रिअ‍ॅक्शन) जाउ द्या झालं >>> हाहाहा.

तसे तर टास्क सुरू व्हायच्या आधीच त्यांचे बोलणे झाले होते कि तिकडे ५ आणि ४ मत मिळून १ मताने जय जिंकणार. पण तरीही टास्क खेळून/हारून त्यांनी बाजी मारली. आधीची जयची, दादूसची, मीराची रडारडी, उत्कर्षचा मोठा त्याग केल्याचा आव यातली हवाच काढून टाकली. मीरा, गायत्रीला संधी होती स्वतंत्र खेळायची पण त्या जय-उत्कर्षच्या छत्रछायेखाली खुश आहेत. >>> अगदी अगदी.

मीनल विशाल भांडण जास्त टिकले तर मीनलसाठी कठीण आहे. तरी तिने दोनदा विशालसाठी काहीतरी केलंय. ती जरा भडकू आहे बहुतेक पण धडपडी आहे. अर्थात नक्की सीन काय ते आज बघणाऱ्या लोकांना कळेल.

बाकी राहिला प्रश्न व्होटिंग ट्रेण्डचा तर जय हा विशाल विकासपेक्षा आधीपासूनच मागे होता. त्यामुळे त्याला हे दोघे टकले झाले त्याचं नुकसान काहीच झालं नाही. पण विकासला संधी होती विशालच्या पुढे जायची ती विशालने हिरावून घेतली.

बोकलत जय काल दोन नंबरवर होता, विकास मागे होता. आज तीनवर गेला.

सगळ्यात स्मार्ट मीरा आहे. बिग बॉस बाहुले फोटो नष्ट करायला सांगतो हे तिला माहीत असावं. त्यामुळे तिने आदल्या दिवशी डिमार्टमध्ये जाऊन तो अप्पू आणला असावा आणि याच्याशिवाय मी राहू शकत नाही असं बिग बॉसला भासवलं. >>> असं असू शकेल. मीराबद्दल मला काही राग, द्वेष नाही. ती असेल पाचात. राग त्या गा दा, स्नेहाचा येतो.

फक्त या विकेंडला मीराला म मां नी तो व्हीडीओ दाखवावा, ज्यात विकासने विशालला सांगितलं केस कापण्याबद्दल.

जय दोन नंबरला होता की सात नंबरला होता त्याचा प्रश्नच नाहीये कारण तुम्ही सगळे कॉन्फिडन्ट आहात की जय हा शेवटच्या दोघात असणारच. विशाल जय लाईट बंद करून येणार हे तुमचंच म्हणजे टीम बी च्या सपोर्टर्सचं मत आहे त्या अनुषंगाने मी बोलतोय. जय सोबत लाईट बंद करायला विकास राहतोय की काय याची भीती विशालला होती म्हणून त्याने स्वतः टक्कल केलं आणि विकासला मागे ढकललं.

आता जरा मज्जा येतीय कुणीतरी "तुम्ही टीम बी चे सपोर्टर्स" वगैरे म्हणून मुद्दे मांडायला लागले की!!
नाहीतर सगळा एककल्ली मामला चाललेला इकडे Wink

टीम बी मधले एकतर अतिशय मुर्ख आहेत, अथवा सिंपथी वोट घ्यायचा प्रयत्न करत आहेत. जयला ५ वोट्स खात्रीने मिळणार हे ढळढळीत सत्य समोर असताना एकानेहि हुशारी दाखवली नाहि. विकास तर बिग्गेस्ट डंब. त्याचं मत इक्वलायजर ठरणार, आणि नंतर स्नेहा डोळे झाकुन जयला मत देणार याची त्याला कल्पना आली नसेल तर विशालचे केस गमावल्याचा दोष त्याला लागायला हवा...
<<<<<
हाहाहा टिम ए सारखच टिम ए च्या सपोर्टरना सुद्धा शो नक्की काय कशाबद्दल आहे समजल नाहीये Wink
टास्क्स जिंकणे/कॅप्टन होणे याने कोणी हिरो होत नाही, दॅटिज जस्ट पार्ट ऑफ गोइंग अहेड इन बिबि जर्नी !
जय कॅप्टन होऊनही चर्चा विशाल विकासची, यातच समजा शो मधे हिरो कोण Happy

बायदवे, तृप्ती बाहेर आल्यावर आता जय, उत्कर्ष च्या विरोधात बोलते आहे मुलाखतींमधे Happy विशाल सर्वात चांगला वगैरेही म्हणते! हे अर्थात आतमधे तिला समजले नसावे. बाहेर येऊन सोमि बघून त्याप्रमाणे सोयिस्कर स्टँड घेतलेला दिसतोय Happy

बायदवे, तृप्ती बाहेर आल्यावर आता जय, उत्कर्ष च्या विरोधात बोलते आहे मुलाखतींमधे Happy विशाल सर्वात चांगला वगैरेही म्हणते! हे अर्थात आतमधे तिला समजले नसावे. बाहेर येऊन सोमि बघून त्याप्रमाणे सोयिस्कर स्टँड घेतलेला दिसतोय .. तृप्ती ताई पक्क्या राजकारणी आहेत. त्याची झलक आतमधे दिसलीच होती.

तसे बघायला गेले तर जयलासुध्दा कॅप्टन व्हायची काही गरज नव्हती, मी असते तर म्हंटले असते दादूसला माझ्या साठी नका कापू केस. की त्याला ती परवानगी दिली नव्हती.?

Pages