शशक पूर्ण करा २ - काटा - ललिता-प्रीति

Submitted by ललिता-प्रीति on 17 September, 2021 - 10:49

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. आणखी काय हवं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं...

क्षणार्धात तिनं ॲक्सिलरेटरवरचा पाय काढला. ब्रेक मारत गाडी जरा डावीकडे घेतली. गिअर बदलला. उजवा पाय ब्रेकवर टेकवलेलाच ठेवला. पायांना हलकासा कंप सुटला होता. हात किंचित घामेजायला लागले होते. तिनं आधी खिडकीची काच अर्धी उघडली. उदित नारायणला गप्प केलं. त्या दृष्याकडे पुन्हा नजर टाकत घड्याळ बघितलं. उगीच!

फोन करायचा? कुणाला? त्यानं काय होणार? शी! आधी कसं नाही कळलं आपल्याला?

परत समोरचं दृष्य...
थांबायचं का? की पुढे जात राहायचं?

काहीही केलं तरी पेट्रोलचा काटा E वरून वर सरकणार नव्हताच...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

भारी जमलेय

आणि एकदाची गाडी इस्टार्ट झाली म्हणायची तुझी इथे Wink

शशक पूर्ण करा २ - याच्या सुरुवातीच्या ओळी संयोजकांनी कुठे दिल्या आहेत ते मला सापडलं नाही. पण इतर काही सदस्यांच्या कथा आल्या, त्या पाहून त्यातली सुरुवात मी उचलली.

आणि एकदाची गाडी इस्टार्ट झाली म्हणायची तुझी इथे >>> माझ्या डोक्यात शशकची आणखी जरा एक वेळखाऊ कल्पना आहे. पण त्यामुळेच ती वेळेत लिहून होईल की नाही ग्यारंटी नाही. Sad

मस्त!

माझ्या डोक्यात शशकची आणखी जरा एक वेळखाऊ कल्पना आहे. पण त्यामुळेच ती वेळेत लिहून होईल की नाही ग्यारंटी नाही>> आपल्याला काय वेळेच मोठसं? डोक्याला खाद्य मिळाल्याशी कारण. लिही तू Wink वेळ संपली तर खाजगीत दाखव मला Lol

छान.

Lol झक्कास. आवडलंच!! ह्याबद्दल एक मीम आहे - मी क्वचित प्रेझेंटेशन द्यायचं असलं की वापरते: दोन प्रकारची लोकं असतात-
CarfuelPeople.jpg #फेबुवरचंकुणीतरी

सीमंतिनी Lol
त्या मीममधली उजवीकडची मी... आणि as if by rule, डावीकडचा माझा नवरा Biggrin

मस्तच जमलीये. .
एकदा या अनुभवातून गेले आहे त्यामुळे हे फारच रिलेट झाले.

सिमंतीनी, चित्र छानच आहे. .
ललिता, सेम पिंच. . सेम पिंच. .