#अर्णवच्या_गोष्टी

Submitted by मुक्ता.... on 16 September, 2021 - 14:31

#अर्णवच्या_गोष्टी

या हॅश टॅग खाली आता बालकथा पोस्ट करण्याचा विचार आहे. माझा मुलगा अर्णव 8 वर्षाचा आहे. बाकी त्याच्या पिढीप्रमाणे , घरोघरी मातीच्या चुली या नियमानुसार माझे आणि त्याचे वरचेवर टी व्ही आणि मोबाईल वरून झगडे असतात. म्हणजे मी टी व्ही बंद कर म्हणलं की मग मी काय करू ? मला बोअर होतंय हा माशा अँड बेअर मधल्या माशाच्या तोंडचा तिचे हेल काढून म्हटलेला डायलॉग असतोच. गेम अलावूड नाही. पुन्हा तोच हेल काढून "मै करूं तो क्या करू?" असे दिनवणे बापुडे चेहरे करून बोलती बंद करण्यात अर्णव एकदम पटाईत झालाय.
तसा कधी कधी पटवतोही तो मला.
"मग मला गोष्ट सांग आई." असं म्हणतो.
अरे पण अशी कशी गोष्ट लिहिणार असं म्हटलं की मग "काय? तुला लिहायला आवडतं ना? मग आपल्या मुलांसाठी काही लिहीत नाहीस असं कसं?", असा खोड्यात अडकवणारा आणि स्मारटी क्वेसचन विचारल्यावर माझी विकेट पडली ना!
तो झोपल्यावर एक दिवस खरच मनात विचार आला. आपण याला रँडमली सुचत जाईल तशा गोष्टी सांगाव्यात, आणि तसे व्हायला लागले. माझ्याकडून त्याला गोष्टी सांगायला आणि अगदी रंगवून सांगायला सुरुवात झाली. म्हणजे आमची भारी गट्टी जमली हे करताना. मलाही नाविन्यपूर्ण निर्मितीचा आनंद मिळायला लागला.म्हटलं आता आपण हे लिहायला हवं.
म्हणून हा शेअर प्रपंच!
मला कसा प्रयत्न आहे ते नक्की सांगा.
सिरीज किती मोठी होईल न्हाई माहीत करण काहीच प्लॅनिंग नाही. बघू....
एक किंवा दोन दिवसाआड पोस्टायला सुरुवात करिन म्हणत्ये!
करावं का?

सरमिसळ एक भयंकारी रोमांच दुसरे पर्व तूर्तास थांबवले आहे. त्यावर काही बेटर सुचायला हवाय , लिहिताना समहाऊ मजा येत नाहीये. म्हणून थांबलं आहे ते, लिहिताना फ्लो ब्रेक होतोय.

सध्या आता ही अर्णवच्या गोष्टींची संकल्पना पुढे नेतेय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अमा, नाही न्हाई, :D, अर्णब कभी नही...
सामो, हो ना मला नवीन वाटतंय जरा ते.प्लॅन नसलेल्या रँडमली सांगितलेल्या गोष्टी लिहायला मजा येईल.