प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - वाहन/गाडी

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 04:25

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.

वाहन/गाडी

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

truck.JPG
इतरांच्या पिल्लांच्या टॉय कार्स बघून ही आमच्या पिल्लूची(?) एके काळची आवडती गाडी आठवली. तो आता कॉलेज संपून कामाला जात, खरी गाडी चालवत असला तरी ही गाडी जपून ठेवली आहे!!

sub_0.JPG
हा आपला असाच Happy माउई आणि स्केटबोर्ड.

अमीतव Proud

धन्यवाद सामो

DSC04848.jpg

मालदीवची राजधानी माले येथील टॅक्स्या. गंमत म्हणजे त्यांना मिटर नसतो फिक्स रेट असतो.
'माले' हे बेट आकाराने इतके छोटे आहे की कुठूनही कुठे जा त्यावेळी २० मालदिवी रुफिया इतकेच भाडे लागायचे.

Taxi at Male.jpg

ही युरोप मध्ये फिरताना बघितलेली गाडी.

एवढी लय भारी गाडी , आणि थोडक्या वेळात कॅमेरा बाहेर काढून ( तेव्हा मोबाईल एवढे स्मार्ट झाले नव्हते ) आपण तिचा इतका बरा फोटो ही काढू शकलो ह्या दोन्ही साठी तेव्हा खूप भारी वाटलेलं.

मला गाड्या ओळखता अजिबात येत नाहीत. मागची /पुढची पाटी वाचली तरच समजत. नंतर कुणी तरी म्हणलं की ही प्रसिद्ध लिमोझिन आहे

CIMG0798~3.JPG

Pages