प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - वाहन/गाडी

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 04:25

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.

वाहन/गाडी

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

IMG-20200201-WA0072_0.jpg

संयोजक, हा फोटो मी राणीच्या बागेतील फूल प्रदर्शनात काढला होता. गेल्या वर्षी रंगाच्या खेळात टाकला होता. चालत नसेल तर कृपया काढून टाकावा.

IMG_20210913_144220.jpg
बर्फाळलेली अन नंतर चकचकीत मिनी

ssj केक मस्त दिसतोय अगदी

कोणी माझी आठवण काढली का?
- केक

गाडी, दिवा आणि गाडी दात काढून हसतेय म्हणजे हास्य Happy
आतापर्यंतच्या तिन्ही विषयांना सामावणारा झब्बू .. एकेच ठिकाणी टाकतो.. नाहीतर उगाच म्हणाल ऋन्मेष प्रतिसाद वाढवतो Wink

IMG_20210913_145157.jpg

खिडकीत वा बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या गाड्या बघणे आणि मोजणे आणि आवडती गाडी दिसल्यास आनंदाने ओरडणे
- सांगा बघू लहानपणी कोणाकोणाला होता हा छंद Happy

1631527495415.jpg

खिडकीत वा बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या गाड्या बघणे आणि मोजणे आणि आवडती गाडी दिसल्यास आनंदाने ओरडणे
- सांगा बघू लहानपणी कोणाकोणाला होता हा छंद ">> आमचं अक्ख लहानपण ह्या खेळात गेलं आहे. आमच्या घरापपासून मुंबई पुणे हाय वे जवळ होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावर बसायचं आणि गाड्या मोजायच्या. गाडी लांबून येताना दिसली की गेस करायचं कोणती गाडी आहे ते. तेव्हा फक्त तीनच तऱ्हेच्या गाड्या असत रस्त्यावर. फियाट, ambassedar आणि ट्रक ...मला आठवतंय तासभर बसलं गाड्या मोजत तर पंधरा वीस च्या पुढे जात नसे आकडा.

सर्व फोटो भन्नाट.

आयरे रोड डोंबिवलीत रहाताना, लाल मातीचा डोंगर दिसायचा (बिल्डिंगज उगवायच्या आधीची गोष्ट) त्यावरुन दिवा वसई लाईन जायची. जास्त मालगाड्या जायच्या पुर्वी, दिवा वसई सुरु झाली नव्हती. पुण्याला जाणारी डबलडेकर गाडी तिथून जायची (कुठून पुणे आठवत नाही), नवीन सुरु झालेली, मी पाचवीत वगैरे असेन. तेव्हा दुपारी तीनला जायची, ती बघायला आख्ख्या चाळीतले लहानथोर उभे राहायचे. फोटो वगैरे काढायला तेव्हा कोणाकडेही साधा कॅमेरा नव्हता.

नंतर कॉलेजात जाताना छोट्या मारुतीचे आकर्षण वाटायचं. फियाट आणि ambasador दिसायच्या आधीपासून तुरळक का होईना पण नवीन मारुती भारी वाटायची. माझी आवडती फियाट मात्र कारण बाबा प्रीमियरमध्ये होते.

लहानपणी डोंबिवलीत टांगे होते, अहाहा वाटायचं. बैलगाड्या, स्कूटर्स, वरुन जाणारी विमानं सर्व बघण्यात धन्यता वाटायची.

सांगा बघू लहानपणी कोणाकोणाला होता हा छंद ">>>>>>

आम्हाला अजूनही आहे.स्कूल बस येईपर्यंत मी आणि मुलगा हेच करायचो कोरोना आधीपर्यंत.

फियाट-पद्मिनीचा डौल अगदी वेगळाच वाटे. आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये बर्‍याच पद्मिनि असायच्या. खिडकीतून बाहेर बघितले की त्यांचेच दर्शन होई. आमचे अगदी जवळचे शेजारी त्यांचा दादा प्रिमिअरमध्ये कामाला होता. बोलण्यात अप्रूफाने नेहमी प्रिमिअरचा विषय असेच. त्यामुळे त्या गाड्यांबद्दल आपसूकच एक आपुलकी वाटे. नंतर ती कंपनी बंद झाल्यावर गाड्याही हळूहळू नजरेआड झाल्या. परवा अनेक वर्षांनी अचानक पावसात एक पांढरी व्यवस्थित मेंटेन्ड चकचकीत पद्मिनी रस्त्यावर दिसली आणि क्षणभर तिथेच थबकायला झाले.

गजानन करेक्ट, प्रीमियर पद्मिनी. आम्ही पद्मिनीच म्हणायचो. क्षणभर नाव विसरले होते, धन्यवाद तुम्ही आठवण करून दिलीत.

स्वस्ती मस्त फोटो.

लाल डब्याचा छान फोटो आलाय. हात दाखवून थांबवल्यासारखा..

बाकी बालपणी गाड्या बघायच्या मोजायच्या छंदाचा वेगळा धागा काढता येईल... गणेशोत्सवानंतर Happy

chetak 2m (2).jpg

एकेकाळी हे वाहन (चेतक) परकीय चलनात पैसे देऊन मिळवावे लागत होते आणि तरीसुद्धा त्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली होती !

IMG_20190907_132829.jpg
सॅनफ्रॅन्सिस्को. म्युनी नं १८१५.
ही १९२८ मध्ये मिलान, इटली मध्ये तयार झालेली स्ट्रीट कार आहे. दरवर्षी व्हिंटेज स्ट्रीट कार्स एक वीकेंड रुळांवर चालवतात. (ही कदचित रेग्युलर फ्लीट मध्येही असते असं वाटतं.) त्यात २०१९ला एबार्कडरो- फिशरमन्स वॉर्फ रुट वर आम्ही यात बसलेलो.

IMG_20190907_151837.jpg
आणि ही ब्लॅकपूल, इंग्लंड ची १९३४ची स्ट्रीट कार / बोट ट्राम. अशा दोन ट्राम (नं. २२८ आणि २३३) वरुन उघड्या आणि बोटीच्या आकाराच्या आहेत. फारच सुंदर दिसतात फिरताना.

yllw.JPG
ओके हा टेक्निकली गाडीचा म्हणुन काढलेला फोटो नाही पण यलोस्टोन पार्क मधे रस्त्यात मधेच बायसन आल्यामुळे थांबलेल्या गाड्यांचा आहे Happy

IMG_1815.JPG

Pages