शशक पूर्ण करा : शाखा नाही : शांमा

Submitted by शांत माणूस on 13 September, 2021 - 03:37

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

उजेडाचा लोळ झंझावाताप्रमाणे घुसल्याने पडद्यावरची चित्रे धूसर झाली . बाहेरच्या गोंगाटाने आवाज दबले गेले. तसे तक्रारपेठेतील नागरीक त्रासिक मुद्रेने महापौरांच्या लवाजम्याकडे पाहू लागले.

"या शहरात सभ्य लोक राहतात. आम्हीही तुमच्यातून आलो आहोत. कुणालाही हौस आलेली नाही पाण्याच्या पाईपाला भोकं पाडायची. प्रत्येकाला समस्या असतात. आमच्याकडचा स्टाफ भरोसे बाबांकडे जातो. मानसिक ताण नाहीसा होतो. समस्या आहेत. प्रोजेक्टर घेऊन फिरल्याने त्या सुटणार नाहीत"

नागरीक अवाक होऊन बघत असताना दार लावून घेतले गेले आणि पुढची स्लाईड आली
पुणे महानगरपालिका - आमची कुठेही शाखा नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users