त-ड-जो-ड अन पंपकीन स्पाईस लॅटे

Submitted by पुनर्वसु on 13 September, 2021 - 00:35

परत एकदा दुकानादुकानांत शिशीर ऋतुत मिळणारी पंपकिन स्पाईस लॅटे आलेली आहे. पूर्वी अन्यत्र लिहीलेला लेख येथे प्रकाशित करत आहे.
------------------------------------------------------------------------------

पंपकीन स्पाइस लॅटे फक्त शिशीर /पानगळ ऋतूमध्ये स्टारबक्स तसेच अन्य कॉफी दुकानात मिळते. माझी ही सर्वात आवडती कॉफी. अन ती ही स्टारबक्स मधलीच वरती व्हिप्ड क्रीम घालून दिलेली. पण ती मिळते लहानशी $५ ला. दर वेळेस किंवा रोज घेणे शक्य नाही कारण गिल्टी वाटतं. आज मला कमी किंमतीत त्याच कॉफीचा सॅशेज असलेला पॅक मिळाला. अर्थात मी लगेच घेतला न ट्राय केला. फ्रेश कॉफीची सर नाही त्याला पण ठीक वाटला. म्हणजे फ्रेश कॉफी १० असेल तर हा ६ वाटला.I can settle for it rather than spending exorbitant amount on fresh coffee. त-ड-जो-ड!!!

खूपदा असच फ्रस्ट्रेशन (नैराश्य?) येतं, लोकांच्या न विशेषतः नात्यांच्या मागे धावताना आपल्याला परिपूर्ण प्रेम अन ओलावा मिळतो का? In life we settle for approximations (we better settle for them if we are to have any relationships at all). थोडयाफार प्रेमासाठी आपण असे फेकलेले, अटी घातलेले, नाइलाज अथवा कर्तव्यपूर्वक दिलेले प्रेम का स्वीकारतो? का लाचारपण फेकलेले चतकोर तुकडे गोळा करतो? २ गोड शब्दांसाठी , मनावर घातलेले दुखरे घाव विसरुन जातो? अन खरच विसरता तरी येतात का? मग जर ईश्वराखेरीज कोणालाच आपलं मन अन गरजेची व्याप्ती अन खोली कळणारच नसेल तर ही यातायात का?

कोणाला हे लहान मुलीने टाकलेल्या टँट्रम सारखे वाटायचीही शक्यता आहे पण खरच क्वचित मनात येतं - अस्तित्व हाच रोग आहे, अन मग मी कधी स्वीकारला हा रोग? कधी मी concious निर्णय घेतला या अस्तित्वाचा? आठवत तर नाही. का आहे मी इथे अन आहे ती इतकी अपूर्ण का? इतकं longing घेऊन का? अन फक्त मला नाही, माझी खात्री आहे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडतो. आईने छातीशी धरलं की मूल शांत होतं तसा solace अन शांती कुठे मिळेल?- कवितेत? नात्यात? सेवेत? पैशात? कुटुंबात?

गुरु ग्रंथसाहिब वाचला की छान वाटतं - त्यात ईश्वराची मनापासून केलेली स्तुती सापडते. वर्णन सापडतं. पण थोड्या वेळानी ते एकसुरी होतं, किंवा अन्य कामे सामोरी येतात. मग परत ये रे माझ्या मागल्या. क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

सर्वांनाच असं वाटतं का .... ?

जशी रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे घेण्याची माझी क्षमता नाही. माझ्याकडे तेवढी पर्चेस पॉवर नाही म्हणजे. मला फार उधळपट्टी केल्याची भावना येते. तशी ईश्वरप्राप्तीची काही पर्चेस पॉवर क्षमता असते का? अन तशी करन्सी असल्यास,असल्यास ती कशी वाढवायची/मिळवायची?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिसेंबर/ नाताळवाली पेपरमिंट मोका किंवा जिंजरब्रेड लॅटे, एगनॉग लॅटे वगैरेपेक्षा पंपकिन स्पाईस लाडकी. आणि हा ऋतुच असा जिवघेणा सुंदर असतो ना. निवांत कॉफीचे घुटके घेत पुस्तक वाचत बसावे Happy

हं

Don't get disheartened boobikins. Have the coffee you love. Little early for fall though. Enjoy life.

Coorg coffee and lightly brewed Society tea beat all tasteless and expensive American fad coffee though. Too much unnecessary sugar and cream.

U Bo plus one.

>>>>>Too much unnecessary sugar and cream.
होय अमा, बाजारु पेये आकर्षक असतात पण त्यामध्ये हॉलो कॅलरीज भयंकर असतात हेही खरेच आहे. बोबा टी, बर्गर्स, पिझ्झा हे सर्व क्वचितच बरे वाटते. आपला विवेक, नीरक्षीर तारतम्य हे हवेच नाहीतर मग अनंत आजार मागे लागतातच. शिवाय आरशात पाहून आत्मविश्वास जातो ते वेगळेच.
भारतात पोषणमूल्ये, कमी मेदयुक्त पदार्थ आदिचा विचार अजुनही केला जातो. ही सजगता उल्लेखनियच आहे.

Pumpkin म्हणजे भोपळाच ना.. त्याची कॉफी सुद्धा करतात का.. माहीत नव्हते हे. आमच्याकडे सहसा भाजी आणि घारगे करतात, तुमच्याकडे कॉफी आणि हॅलोविन करतात Happy

Pages