त-ड-जो-ड अन पंपकीन स्पाईस लॅटे

Submitted by सामो on 13 September, 2021 - 00:35

परत एकदा दुकानादुकानांत शिशीर ऋतुत मिळणारी पंपकिन स्पाईस लॅटे आलेली आहे. पूर्वी अन्यत्र लिहीलेला लेख येथे प्रकाशित करत आहे.
------------------------------------------------------------------------------

पंपकीन स्पाइस लॅटे फक्त शिशीर /पानगळ ऋतूमध्ये स्टारबक्स तसेच अन्य कॉफी दुकानात मिळते. माझी ही सर्वात आवडती कॉफी. अन ती ही स्टारबक्स मधलीच वरती व्हिप्ड क्रीम घालून दिलेली. पण ती मिळते लहानशी $५ ला. दर वेळेस किंवा रोज घेणे शक्य नाही कारण गिल्टी वाटतं. आज मला कमी किंमतीत त्याच कॉफीचा सॅशेज असलेला पॅक मिळाला. अर्थात मी लगेच घेतला न ट्राय केला. फ्रेश कॉफीची सर नाही त्याला पण ठीक वाटला. म्हणजे फ्रेश कॉफी १० असेल तर हा ६ वाटला.I can settle for it rather than spending exorbitant amount on fresh coffee. त-ड-जो-ड!!!

खूपदा असच फ्रस्ट्रेशन (नैराश्य?) येतं, लोकांच्या न विशेषतः नात्यांच्या मागे धावताना आपल्याला परिपूर्ण प्रेम अन ओलावा मिळतो का? In life we settle for approximations (we better settle for them if we are to have any relationships at all). थोडयाफार प्रेमासाठी आपण असे फेकलेले, अटी घातलेले, नाइलाज अथवा कर्तव्यपूर्वक दिलेले प्रेम का स्वीकारतो? का लाचारपण फेकलेले चतकोर तुकडे गोळा करतो? २ गोड शब्दांसाठी , मनावर घातलेले दुखरे घाव विसरुन जातो? अन खरच विसरता तरी येतात का? मग जर ईश्वराखेरीज कोणालाच आपलं मन अन गरजेची व्याप्ती अन खोली कळणारच नसेल तर ही यातायात का?

कोणाला हे लहान मुलीने टाकलेल्या टँट्रम सारखे वाटायचीही शक्यता आहे पण खरच क्वचित मनात येतं - अस्तित्व हाच रोग आहे, अन मग मी कधी स्वीकारला हा रोग? कधी मी concious निर्णय घेतला या अस्तित्वाचा? आठवत तर नाही. का आहे मी इथे अन आहे ती इतकी अपूर्ण का? इतकं longing घेऊन का? अन फक्त मला नाही, माझी खात्री आहे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न पडतो. आईने छातीशी धरलं की मूल शांत होतं तसा solace अन शांती कुठे मिळेल?- कवितेत? नात्यात? सेवेत? पैशात? कुटुंबात?

गुरु ग्रंथसाहिब वाचला की छान वाटतं - त्यात ईश्वराची मनापासून केलेली स्तुती सापडते. वर्णन सापडतं. पण थोड्या वेळानी ते एकसुरी होतं, किंवा अन्य कामे सामोरी येतात. मग परत ये रे माझ्या मागल्या. क्वचित वाटतं मानवी जन्माची एकमेव "dignity" हीच असावी की समोरच्याचे अस्तित्व सुसह्य करणे, समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे.

सर्वांनाच असं वाटतं का .... ?

जशी रोज स्टारबक्स ची पंपकीन स्पाइस लॅटे घेण्याची माझी क्षमता नाही. माझ्याकडे तेवढी पर्चेस पॉवर नाही म्हणजे. मला फार उधळपट्टी केल्याची भावना येते. तशी ईश्वरप्राप्तीची काही पर्चेस पॉवर क्षमता असते का? अन तशी करन्सी असल्यास,असल्यास ती कशी वाढवायची/मिळवायची?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tula kay म्हणायचे आहे ते नीट कळले आहे.पण मला सांगता येणार नाही.काहीही प्रयत्न ना करता,कसे पाण्यात पडलेले पान प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाते.जसे काही त्या पानाने आपला भार त्या पाण्यावर सोपवून दिला आहे,तसेच जे आयुष्य समोर आहे त्याला सामोरे जाऊया.सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असं तर नाही ना!

समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहून त्या व्यक्तीची सेवा करणे......... तसले काही मनात आणत नाही.nastikate झुकnari असल्याने माणसाला माणूस मदत करतो हे माहीत आहे.मग मदत करणाऱ्या माणसाला तो देव तशी बुद्धी देतो वगैरे आस्तिकांचा भाग आहे.त्या वादात पडायचे नाही,पण बरेच वेळा एकमेकांना माणसं सहजपणे मदत करून निघूनही जातात हे बरेचदा पाहिले आहे.

>>>>>>काहीही प्रयत्न ना करता,कसे पाण्यात पडलेले पान प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाते.जसे काही त्या पानाने आपला भार त्या पाण्यावर सोपवून दिला आहे,तसेच जे आयुष्य समोर आहे त्याला सामोरे जाऊया.सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असं तर नाही ना!

देवकी छान मुद्दा मांडला आहेस. आयुष्याचा सहजसुंदर स्वीकार ज्यात की स्वीकाराच्याही भावनेला स्थान नाही. फक्त एक ह्युमन 'बीइंग" नॉट ह्युमन "डुइंग".
>>>>>पण बरेच वेळा एकमेकांना माणसं सहजपणे मदत करून निघूनही जातात हे बरेचदा पाहिले आहे
कोणीतरी सूर्याला अर्घ्य देते म्हणुन सूर्य आहे व जग टिकुन आहे म्हणतात. पण खरच तसे नसावे. कोणीतरी कोणाला तरी सहज मदत करुन जातो म्हणुन माणुसकी शिल्लक आहे आणि त्यावर जग चालत आहे.

त्या त्या मूडमध्ये हे विचार स्फुरतातही आणि दे मेक सेन्स अ‍ॅज वेल. परंतु ते तात्कालिक असतात. नंतर वाचताना, कळतं फार मुद्दे उड्या मारत , मधल्या जागा स्किप करत लिहीलेले आहेत. Sad

>>> solace अन शांती कुठे मिळेल?- कवितेत? नात्यात? सेवेत? पैशात? कुटुंबात?
आपल्यातच. तुझे आहे तुजपाशी... Happy

बाकी क्षणिक उद्रेक असावा हा, पण आपल्याला काय आणि किती मिळालं याचा विचार करताना आपण इतरांना - त्यांच्या अपेक्षेच्या मानाने - काय देऊ शकलो हाही विचार करावाच. प्रत्येकाला आपापलं आयुष्य आपापल्या सुखासाठी जगायचं आहे, कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इन्टरेस्ट अटळ आहेत हे आनंदाने स्वीकारावं. जिथे शक्य तिथे सुवर्णमध्य (विन विन) काढावा, नाही तिथे तुकडा पाडून विषय संपवून टाकावा.

(हे सगळं मला वाटतं - दरवेळी जमतंच असं नाही. पण निदान असा प्रयत्न असतो.)

होय स्वाती क्षणिक उद्रेक आहे पण हेसुद्धा खरच की असे क्षण येतात बरेचदा. नकारात्मक स्वसंवाद टाळलाच पाहीजे. त्यातून एक पराभूत मानसिकता निर्माण तर होतेच पण त्याची सवयही लागते. माझ्या बाबतीत तसे झालेले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>आपण इतरांना - त्यांच्या अपेक्षेच्या मानाने - काय देऊ शकलो हाही विचार करावाच.
प्रचंड अनुमोदन!!
>>>>>>>>>>>>जिथे शक्य तिथे सुवर्णमध्य (विन विन) काढावा, नाही तिथे तुकडा पाडून विषय संपवून टाकावा.
होय एक घाव दोन तुकडे करावेत. असे लळत लोंबत राहू नये. हे खरे आहे.

सकारात्मक स्वसंवाद शिकते आहे हळूहळू.

Screen Shot 2021-09-14 at 1.35.01 PM.png (credit: Starbucks) Happy मिळाले रोज $५ तरी हे एवढं सगळं पचवणार का? लाभली जरी शांती तरी ती मनाला रिझवणार का? का पुन्हा अशांततेच्या शोधात... क्या किजिएगा उस शांती का??

हाहाहा Happy अगं सी नाही एवढ्या कॅलरीजच एका पेयात नकोत Happy नाही पचवता येणार - शारीरीक एक वेळ येइल पण मानसिक नाही Wink

हा बीबी बघुन सारखी पमकिन स्पाईस्ड लॅटे आलेली आहे, ती घेतली पाहिजे याची आठवण होते आहे.
तुमचं डीप मिनिंग समजण्याची माझी कुवत नाही, पण सिझनची पम्पकिस स्पाईस्ड लॅटे सुटायला नको. तुम्ही हॉट पिता का कोल्ड पिता? आमच्या पुर्वीच्या हापिसात फुकटात कोल्ड बाटल्या मिळायच्या तर तीच प्यायचो. आता नव्या ठिकाणी दमड्या मोजुन प्यायची आहे म्हणुन विचारतोय Proud

मी हॉट पिते. कोल्ड अजिबात आवडत नाही.
>>>>>>>>>>आता नव्या ठिकाणी दमड्या मोजुन प्यायची आहे म्हणुन विचारतोय Proud
अर्र्र्र मला वाटलं इन्व्हाईट करणार होता Wink

Happy
यासी बोलती जन करणे हवेत संभाषण
'या कधीतरी अमुच्याकडे' अशी बोळवण
जी जी रं जी जी जी ....
---------------------------------------------------
जस्ट किडिंग. मजा चाललेली आहे.

प्लीज इग्नोर द लेख. कम्प्लीटली आ ऊटडेटेड!!! रड्या लेख.
-----------------------

हा धागा वर काढण्याचे कारण - पंपकिन स्पाइस लॅटे स्ट्राईक्स अगेन Happy हॅपी फॉल डे एव्ह्रीवन. व्हॉट अ डे टु 'फॉल' इन लव्ह!!!

अहो आवडते तर प्या ना वाट्त्तेल तेव्हढी, एव्हढे भावनामय, तत्वज्ञानी कशाला होता?
अहो, पैसा काय, आज आहे, उद्या नाही. परवा परत येईल.
हे वय कधीतरी उलटेल. मग एक वेळ अशी येईल की त्या कॉफीतच काय कशातच फारसा राम उरणार नाही. स्वानुभवावरून संगतो आहे हो.

होय अगदी चीप झालाय हा लेख. Happy मी पिते आता हवी तेवढी. हा लेख पूर्वीचा आहे. मला माझा मूड डॉक्युमेन्ट करुन ठेवायचा होता म्हणुन प्रतिसाद देत वर काढला.
प्लीज इग्नोर इट Happy

>>>>अहो, पैसा काय, आज आहे, उद्या नाही. परवा परत येईल.
त्रिवार सत्य Happy

एव्हढे भावनामय, तत्वज्ञानी कशाला होता? >> Biggrin
तरी बरं तुम्ही अजून त्या दुसऱ्या ताईंचे लेख आणि रसग्रहण वाचलेले दिसत नाही. त्यांना ज्यातत्यात तत्त्वज्ञान दिसते.

हे वय कधीतरी उलटेल. मग एक वेळ अशी येईल की त्या कॉफीतच काय कशातच फारसा राम उरणार नाही. >> १००% सहमत.
सामोतै, बिनधास्त प्या कॉफी. माझी आठवण काढून एक कप अजून प्या. Happy

>>>>>>.तरी बरं तुम्ही अजून त्या दुसऱ्या ताईंचे लेख आणि रसग्रहण वाचलेले दिसत नाही. त्यांना ज्यातत्यात तत्त्वज्ञान दिसते.
हाहाहा

>>>>हे वय कधीतरी उलटेल. मग एक वेळ अशी येईल की त्या कॉफीतच काय कशातच फारसा राम उरणार नाही. >> १००% सहमत.
नोटेड!!!

>>>>>>>>सामोतै, बिनधास्त प्या कॉफी. माझी आठवण काढून एक कप अजून प्या. Happy
हाहाहा. वजन कमी झालय हो कधी नव्हे ते. राहू दे तसच.

ते पम्पकिन स्पाईक आईस्क्रीम झालं. यंदा फेवरिस म्हणून जग्गात भारी इथली आईस्क्रीम चेन आहे तिकडे पम्पकिन स्पाईस्ड चॉकलेट डिप मध्ये घोळवून कोन दिसला. :फेस पामः
हल्ली शास्त्रापुरती सीझनला एक पम्पकिन स्पाईस कॉफी ही नको वाटते. अती गोड करुन ठेवतात.

मला पंपकिन पाय स्पाईस आवडतो पण कॉफीत भोपळ्याची प्युरी नाहीच झेपत. त्यामुळे फिल्टर कॉफीच्या खालच्या भांड्यात पंपकिन पाय स्पाईस आणि वरच्या फिल्टर्वाल्या भांड्यात स्टार बक्सची वेरोना. २% दुध फ्रॉदरने फेस काढलेले आणि १.५ टी स्पुन साखर.

नाही नाही. पम्पकिम स्पाईस्ड म्हणजे पायचीच स्पाईसच. प्युरी नसते. (ना?) सिमेमन, क्लोव, नटमेग इ. इ. पण आयती आणली की व्हिप्ड क्रीम आणि पोतंभर साखर घालतात. त्यांना नाही सांगता येईल. पण मग इथे पोस्ट कशा वाढणार!

अमित, स्टार बक्सच्या PSL मधे प्युरी असते. बिस्कोटी, ब्राऊनीत वगैरे ठीक आहे पण कॉफीत प्युरी म्हणजे...

अरे देवा!
When the Pumpkin Spice Latte was first released in 2003, it was infused with its now-iconic flavor using a few pumps of pumpkin spice syrup and a dash of pumpkin spice on top. The recipe was developed with the goal of using spices that complement both pumpkin and coffee, but did not include any actual pumpkin. However, in 2015 — a dozen years after its introduction — Starbucks revamped its PSL sauce by adding a small amount of pumpkin puree. Additionally, the coffee purveyor lists pumpkin puree as an ingredient for the syrup in a homemade recipe currently on its website. With that being said, the actual amount of pumpkin in the drink isn't exactly plentiful.

Read More: https://www.foodrepublic.com/1648326/does-starbucks-psl-use-real-pumpkin/
मी २०१५ नंतर प्यायली नाही डिक्लेअर करतो. मग मीच बरोबर म्हणता येईल. Lol

पंपकिन स्पाईसच्या व्हिप्ड क्रीमवरती, काल बरिस्त्याने नटमेग पावडरच भुरभुरवली नव्हती. मी जाऊन मागून आले. अर्रे त्या पावडरशिवाय काय मजाए? Sad

Pages