शशक पूर्ण करा - घर घर - BLACKCAT

Submitted by BLACKCAT on 12 September, 2021 - 13:06

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
मी चटकन त्याच्यापासून दूर पळाले, उंच सुरक्षित अंतरावर वर गेले. तरीही त्याने मला पाहिलेच.

" हलकट, तू इथे सरपटत खाली बसलीस तर मी कुठे कौलावर जाऊन बसू का? मांजर जमिनीवर , कुत्रे दारात आणि इतरत्र आम्ही. तू भिंतीवर वर बसून किडे खा."

तो माझ्याकडे बघून ओरडत होता.
" हे माझे घर आहे, इथे खाली गादीवर येऊ नकोस."
दिवा मालवून तो झोपला.

"ह्याचे घर म्हणे ! पाच वर्षापुर्वी नुसती मोडकी भिंत होती. आम्हाला हुसकून ह्यांची इमारत इथे वसली. " मी चुकचुकले आणि मग शांतता पसरली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
कौलावर जाऊन बसू का.... डोळ्यासमोर दृश्य आले.

छान..

छान Lol