प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - समई/दिवा

Submitted by संयोजक on 12 September, 2021 - 09:05

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.

समई/दिवा.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

मी आर्या मस्त दिवा
मध्यंतरी एका छोट्या समारंभासाठी जेवणाच्या टेबलावर ठेवलेला
IMG_20181107_084923630~3.jpg

ललिता-प्रीती आपण एखाद्या तळ्याकाठी रहाता का जिथे हे लाकडी ढलपे वहात किनार्‍यावरती येतात? आम्ही विस्कॉन्सिनला, सुपिरिअर लेक जवळ रहायचो तिथे अशा ढलप्यांच्या सुरेख वस्तू मिळत असत. अगदी अशाच.

सगळ्यांचेच दिवे मस्त!
हर्पेन, हरिद्वारला गंगा आरती बघितली होती जवळपास अर्धा तास चालली होती. तेव्हा त्या पुरोहितांची कमाल वाटली अर्धा तास ते एवढे जड दिवे सारखे फिरवताना बघून. खरे बाहुबली!

चंद्रदिवा, द मूनलाईट
मुद्दाम ॲंगलने काढलेला फोटो नसून गार्डनमध्ये शतपावली करताना सहज समोर नजर पडली आणि क्षणभर खरेच असे वाटले की कळसावर दिवा बसवला आहे. मोबाईल हातातच होता. क्लिक केले

1631983840688.jpg

माझा झब्बू.
हा angle मुद्दाम adjust केलाय.
CCTV चा खांब आहे आणि चंद्र.
IMG_20210918_234449.jpg

आणि हा त्या वरच्या दिव्याला ऊर्जा पुरवणारा आपल्या विश्वाचा दिवा Happy
यात असे वाटत आहे की सुर्यनारायणाचे आकाशातच प्रतिबिंब पडले आहे. बाल्कनीतून टिपलेला फोटो. पुन्हा ट्राय करतोय पण पुन्हा हे असले काही जमत नाहीये..

1631989987283.jpg

IMG-20210820-WA0009.jpg

घरी लावलेला नवीन लॅम्प......

हे ट्रायलसाठी टाकलं, कारण चार दिवसांपूर्वी इमेज अपलोड होत नव्हती.

IMG-20180811-WA0005.jpg

IMG-20210919-WA0053.jpg

माहेरच्या गौरी. आमच्या खड्यांच्या असतात (वाटीत पाच खडे ठेवलेत, वर फुलं वाहिली आहेत, त्यातली गोकर्ण फुलं माझ्या घरची आहेत, खालची आईच्या घरची). दीड दिवसांच्या गणपतीबाप्पाला निरोप दिल्यावर सजावट होतीच, तिथेच विराजमान झाल्या गौराताई. तिथला दिवा मला फार आवडतो म्हणून फोटो दिला इथे. दिवा आणि गौरी ठेवलेली वाटी यांचं डिझाईन यात थोडं साम्य आहे.

सर्वांचे फोटो बघून प्रसन्न वाटलं. वरचा फोटो मला कधीपासून पोस्ट करायचा होता पण साईझ जास्त होती म्हणून होईना.

आईकडे भलामोठा जाडजुड पितळेचा लामणदिवा आहे, साखळी लोंबती जाड आहे, तिच्या माहेरून आलेला पण तो कधी लावला जात नाही. या थीमसाथी त्याचा मस्त फोटो देता आला असता.

IMG_7118.jpg

IMG_20181106_223528039.jpg

Pages