SAP करावे की Data analysis करावे : सल्ला हवा आहे..

Submitted by अजय चव्हाण on 9 September, 2021 - 12:24

नमस्कार मायबोलीकरहो,

मी सध्या एका शिंपिंग एम एन सी मध्ये स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे पण एकंदरीत बदलांचे वारे पाहता पुढे जास्त स्कोप दिसत नाही.. सध्याची पोजिशन बघता काम तर टिम लीडर आणि प्रसंगी युजर म्हणूनच करायच असतं.. ना धड युजरमध्ये ना धड लिडरशीपमध्ये.. मधल्या मध्ये मरण होतय... बाहेर कुठे टिम लीडर म्हणून अप्लाय केलं तर ऑन पेपर टिम लीडरचा टॅगची रिक्वायरमेंट सांगतात आणि आमच्या प्रोसेस मध्ये टिम लीडर ही पोस्टच नाहीये स्पेशालिस्ट नंतर डायरेक्ट ए. एम . ची पोस्ट आहे आणि ती ही सहजासहजी मिळवता येईल असं वाटत नाही कारण ए. एम ऑलरेडी जास्त आहेत जे आहे त्यांनाच मूव्ह केलं जातयं आणि जरी व्हकेंट झालीच पोजिशन तर त्यासाठीही स्पर्धा जास्त आहे..एकंदरीत सगळच़ं कठीण दिसतय.. IJP हा प्रकार तर फक्त नावालाच असतो..दुसर्या डिपारटमेंटच्या लोकांना त्यासाठी प्राधान्यही दिलं जात़ं नाही आणि आमच्याकडे IJP निघतच नाही..

आणि मुख्य म्हणजे दुसरीकडे अप्लाय करायचं झालं तर सिनिअर म्हणून पण काम करायला तयार आहे पण सॅलरी ब्रकेट आडवं येतं आणि मी लाईनर ईडस्ट्री मध्ये काम करत असल्यामूळे Freight Forwarder, NOVCC, CHA तर लाईनरवाल्यांना उभंही करत नाही भले ही कॅलिबर असो किंवा नसो.. आणि ज्या लाईनर कंपन्या आहेत त्यातल्या काही बंद झाल्यात.. आणि ज्या आहेत त्या एकमेकांत मर्ज झाल्यात आणि कोस्ट कंटींगच्या नादात फक्त फ्रेशर घेतात आणि टिम लिडर तर बाहेरुन हायर करत नाहीत.. आमच्यासारख्या मधल्यांना कुठेच स्कोप नाही‌.. कधी कधी असं वाटतं कुठे झक मारली आणि हृया फिल्डमध्ये आलोय... कारण आठ वर्षाचा अनुभव व्यर्थ आहे..

म्हणून डोमेन चैंज करावसं वाटतय.. नविन भाषा शिकणं हा आधी पर्याय ठेवला होता पण बाकीच्याचे अनुभव पाहता ते करणं जास्त काही फायद्याचं दिसतं नाही..

आता सध्या दोन पर्याय मला तरी आहेत असं वाटतयं..

एक : तर SAP SD (Sales & DistrIbution) कोर्स करून
सुरुवातीला थोडं पॅकेज कॉम्प्रोमाईज करून कदाचित सध्या इतकं पॅकेजही मिळू शकत पण पुन्हा सुरुवात करावी आणि नंतर जम्प मारून पोजिशन ना सही पॅकेज तर मिळेल...तसंही SAP ला स्कोप आहे आणि त्याचं सॅलरी ब्रकेटही हाई असतं..

दोनः दुसरं म्हणजे Data Analysis चा कोर्स करून त्यात स्थिर व्हावं..कारण त्यातही स्कोप आहे आणि तस़ंही Analysis करण़ं हे माझं आवडत काम आहे इथेही Analysis चं काम आहे पण Data or technical संदर्भातलं नाहीये..

दोन्ही फिल्डमधल्या Institute शी संपर्क साधून थोडक्यात माहीती घेतली आहे‌‌..SAP ची प्लेसमेंट 100% मिळेल असं सांगण्यात आलय़ तर Data Analysis ची 50% चान्सेस प्लस Interview वर Depend आणि कितपत पारंगत झालोय ह्यावर अवलंबून आहे हे सांगण्यात आलयं..

तर जाणकरांनी किंवा जे ह्या फिल्डमध्ये कार्यरत आहे त्यांनी ह्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन करावे..ही माफक अपेक्षा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्टीफीकेशन SAP देते, फी त्याना द्यावी लागते. ती साधारण ५०-६० हजार आसावि.

SAP च्या साइटवरही भरपुर स्टडी मटेरिअल आहे. Sap software तुमच्या घरच्या कोम्प्युटरवर घालुन देतो म्हणुन कोणी सान्गितले तर त्याला बळी पडु नका.

माझा सॅपदेवाशी फक्त गिर्‍हाइक Happy म्हणूनच संबंध आलाय.
पण नुकतीच मला एका सॅप वाल्याची यशस्वी गाथा कळाली.
ही व्यक्ति जेष्ठ नागरीक आहे. निवृत्त होण्या आधी त्यांनी सॅप कोर्स केला. कसला माहित नाही. त्याच्यात पण स्पेशलाझेशन असते हे मला वरील पोस्टींवरून कळाले. पण विषय तो नाही.
ते आहेत पुण्याचे. मुलगा मुलगी अमेरिकेत. पण हे ग्रहस्थ जिथे असतील तेथून मस्त सॅपचे क्लासेस घेतात. बक्कळ कमावतात.

एक नविन ऑप्शन तुमच्या नजरेस आणण्यासाठी म्हणून लिहीले.

>>आय्टित काम करणार्‍या किती जणांनी डोमेन नॉलेज आधी घेउन नंतर प्रवेश केला आहे? >>>
मी.<<

ओके.. डोमेन्/फंक्शनल नॉलेज असणारे एसएमइज टेक्निकली आय्टिमधे नसतात. गेल्या १०-२० वर्षांत पॅकेज सॉफ्टवेर्स्चं स्तोम माजल्याने त्यावर काम करणारे सगळे आपण आय्टित आहोत असं समजतात. त्यांच्या खुलाशा करता - आय्टि म्हणजे हार्डवेर्/सॉफ्टवेर्/मिडलवेर/नेटवर्क यांची सांगड घालुन सोलुशन डिलिवर करणारे. एसएपी, ओरकल, एसएफडिसी इ. अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेरचा एक छोटासा अंश आहे. यावर काम करणारे; आर मोर अलाइन्ड टु बिझनेस फ्रॉम फंक्शनल स्टँडपॉइंट. त्यांना हार्डवेर कपॅसिटि, सर्वर फार्म्स/क्लस्टर्स, क्लाउड्स, इंटिग्रेशन, एपिआय्ज इ. चा ओ-का-ठो माहित नसतो, तशी अपेक्षाहि नसते. हा सगळा गुंता स्ट्रीमलाइन करुन कंपनी/क्लायंटचा बिझनेस एखाद्या वेल ऑइल्ड मशिनपणे चालु ठेवणे - हे आय्टि वाल्यांचं काम...

बाय्दवे, माझा भावाने कंम्प्युटर सायंसचं बॅक्ग्राउंड नसुनहि एका मोठ्या ऑटो कंपनीच्या सिआयओ पदावर काम करुन भारतातला एसएपिचा लार्जेस्ट रोलआउट यशस्वी केला. गंमतीत मी त्याला सुद्धा तु आय्टि प्रोफेशनल नाहि असं म्हणायचो... Happy

हो करू शकतो पण बेसिक आयडिया यावी आणि मूळात मला जमतयं का हे जाणून घेण्यासाठीच सहा महिन्याचा कोर्स आधी करुन पाहणार होतो.. >>>
अजय, जर तुम्हाला एक्सेल, अकाउंटसी वगैरेची आवड असेल आणि निरिक्षण शक्ती उत्तमअसेल/, कोणत्याही गोष्टीला सतत अ‍ॅनालाईज करून त्यातले फायदे तोटे बघायची सवय असेल तर डाटा अ‍ॅनालिटीक्स आवडेल.
मी अमेरिका किंवा परदेशी मास्टर्स यासाठी सुचवल कारण करीअर नव्याने सुरु करण आपल्याकडे भारतात अजुन तितके रुळले नाही पण इकडे ते खुप कॉमन आहे. दहा वर्ष फॅशन डीझाईनिंगच काम करून आमच्या कंपनीत एकजण जॉईन झाला. फक्त जुजबी सिक्वेल शिकून आलेला.
नविन लोकांना आपल्याकडे जॉब मिळण त्यामानाने सोप आहे पण एका करिअर मधून दुसरीकडे जाण तितक नसाव अस वाटल.
दुसरं म्हणजे इथे अजुनही हे फिल्ड सॅच्युरेट झालेल नाही. जॉबच्या संधी भरपुर आहेत.
छोटे मोठे कोर्स केले तरी हवा तसा ब्रेक मिळून बर्‍यापैकी पैसे मिळवायला वेळ लागेल. पण करीअरच चेंज करायच आहे तर थोडं विचार करून व्यवस्थित प्लॅनिंग करून केलत तर नक्की जमेल. आता कदाचीत २-३ वर्ष जास्त वाटु शकेल पण eventually you will catch up. पैसे आणि प्रगती दोन्ही बाबतीत.

आय्टि म्हणजे हार्डवेर्/सॉफ्टवेर्/मिडलवेर/नेटवर्क यांची सांगड घालुन सोलुशन डिलिवर करणारे>>>>>>

तुमचे बरोबर आहे राज. एसेपी मध्ये बेसिस व एबॅप मिळुन हे काम करतात, बाकीचे सगळे फंक्शनल कंसल्टंट असतात पण ह्या सगळ्यांना उचलुन आयटीत घातले जाते, जसे आमच्या कंपनीत आम्हाला घातलेले आहे. आमच्या जवळजवळ ५०० लोकांच्या इन हाऊस एसेपी टिममध्ये हार्डवेर्/सॉफ्टवेर्/मिडलवेर/नेटवर्क वाले मिळुन १०० असतील. बाकीचे जे ह्यात १० वर्षांहुन जास्त टिकलेले आहेत ते सगळे आधी कंपनीतच इतर डोमेनमध्ये होते, त्यांना एसेपीमध्ये घेतले गेले/ते स्वखुशीने आले/दुस-या कंपनीतुन इतर डोमेनमधुन एसेपी मध्ये आले. ही अशी फौज भली मोठी आहे. मात्र आता जे तरुण पन्चविशीतले लोक फण्क्शनल येताहेत त्यात बहुतेक करुन इन्जिनिअर्स येतात. आम्ही फायकोसाठी सिये, सियेमे, एम्बिये विथ फायनान्स अशी अट घातलेली आहे. यातल्या जवळजवळ कोणालाच डोमेन नॉलेज नाहीये. काही कंपन्या फायकोसाठी सुध्दा इंजिनिअर्स घेतात. मागे टिसिएसने फायकोमध्ये २०० बि टेक घेतले म्हणुन बातमी वाचलेली. सो, आता जमाना बदलत चालला आहे. डोमेन नॉलेज आहे पण एसेपी एक्स्पोजर अजिबात नाही अशा माणसाची मी तरी माझ्या टिममध्ये निवड करत नाही कारण तो शिकेपर्यन्त वाट पाहण्याइतका वेळ कंपनी मला देत नाही. एसेपी एस्क्पोजर असेल आणि हाताशी वेळ असेल तर विचार केला जातो. अशा काही जणांना घेतलेले आहे.

Pages