स्व-काळजी-आहार-किती आणि कधी?

Submitted by मोहिनी१२३ on 6 September, 2021 - 10:41

भूक लागली असताना खाणं ही आणि प्रकृती आणि संस्कृतीही.
दुसर्याला जरूर द्या मग त्याकरिता मुद्दामून जास्त बनवा.
भूक लागली असताना ती चहा/कॅाफी/ तत्सम पेयांनी मारणं ही विकृती.
भूक लागली नसताना खाणं ही ही विकृतीच.
किती खावे- पोट म्हणेल तितके.
कधी खावे-भूक लागली असताना.
काय खावे-ताजे
कसे खावे-शांतपणे बसून.

ह्या, आयुष्य इतके सोपे असते तर काय हवे होते….

असतं हो मंडळी,आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. आपल्याला लहानपणी भूक लागली आणि भूक भागली की व्यवस्थित कळतं. मग मोठेपणी काय होते? मोठेपणी आपण आपलं पोट सोडून बाकी गोष्टींना महत्व देतो. मग हळूहळू पोटही आपल्याला इशारे देणे बंद करतो.

आपण का खातो?
१. वेळ झाली म्हणून
२.औषधे घ्यायची म्हणून
३. कोणीतरी आग्रह केला म्हणून
४. कोणीच आग्रह करत नाही म्हणून
५.थोडेसेच राहिले आहे म्हणून
६. खूप राहिले आहे, ते संपवायला पाहिजे म्हणून
७. हे कोणालाच आवडत नाही म्हणून
८.हे सगळ्यांना आवडतं म्हणून मला नंतर राहणार नाही म्हणून
९.मला खूपच आवडलयं म्हणून
१०. कोणीतरी सक्ती केलीय म्हणून
११. वेळ जात नाहीय म्हणून
१२.नंतर वेळ मिळणार नाही म्हणून
१३. एखादा पदार्थ फारच exotic/दुर्मिळ/speciality आहे म्हणून
१४.घराची शिस्त म्हणून
१५. (खाद्य पदार्थाचा, सो मी वर) फोटो पाहिला म्हणुन.-मानव
१६. बाहेरून घरी आलोयं तर घरी आल्यासारखं वाटायला हवं म्हणून काही तरी खाणे. -अस्मिता
.
.
ही यादी कितीही वाढवता येईल. ही कारणे किती खरी/किती खोटी, किती योग्य/किती अयोग्य या तपशीलात पडायला नको.मात्र आपला जास्तीत जास्त आहार हा भूक लागेल तेव्हा/भूक असेल तेवढाच आणि ताजा या त्रिसुत्रींनी बांधलेला हवा.

निरोगी माणसाला साधारणत: ठरलेल्या वेळेला भूक लागते. आणि ठरलेल्या प्रमाणात भूक लागते. तसं नसेल एखाद्या दिवशी, तर शरीराचे ऐकले पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
त्या यादीत
१५. (खाद्य पदार्थाचा, सो मी वर) फोटो पाहिला म्हणुन.

हे कारणही ऍड करायला हवं आता.

छान , पहिला भागही छान होता.
१६. बाहेरून घरी आलोयं तर घरी आल्यासारखं वाटायला हवं म्हणून काही तरी खाणे.

जे लोक जगण्यासाठी न खाता, खाण्यासाठीच जगतात आणि मग वजन वाढले की कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत बसतात, त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर ही आहे की प्रत्येकाला स्वतःचे वजन स्वतःलाच उचलावे लागते.