पॅशन फ्रुट चे सरबत

Submitted by मनिम्याऊ on 5 September, 2021 - 12:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पॅशन फ्रुट्स पिकलेले
साखर (एका फळास ३ चमचे)
पाणी

क्रमवार पाककृती: 

सध्या पॅशन फ्रुटचा वेल छान बहरला आहे.
IMG_20210905_212339.JPG

पिकून तयार झालेली पॅशन फ्रुट्स घ्यावीत.
IMG_20210905_212527.JPG
फळाचे चिरून दोन भाग करून घ्यावेत. त्यात बिया आणि गर असतो.
IMG_20210905_212937.JPG

चमच्याने गर ब्लेंडरच्या भांड्यात काढून घ्यावा
त्यात पाणी घालून फ़िरवून घ्यावे.

तयार मिश्रण गाळून घेऊन त्यात चव बघून साखर घालावी.
थंडगार करून प्यावे. मस्त चव असते.
IMG_20210905_213013.JPG

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

ज्या पॅशनफ्रुट वर सुरकुत्या पडल्या असतात ते तयार झालेले समजावे

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त .. मला आवडते हे सरबत.आमच्या कडे पुर्वी होता वेल . भरपुर लागयची फळे.

छान आणि सोपी पाकृ.
मी पण खाल्ले नाहीये .आणि बघितलंय ते नर्सरीत. फळं धरलेली होती. ह्यात व्हिटॅमिन सी खूप असते असे सांगितलं तिथं. म्हणजे आंबटसर असावी.

वावे, धन्यवाद. घरनंबर बरोबर केला Bw

मनिम्याऊ. धन्यवाद. तुमचा लेख वाचून १५-२० मिनिटात लेख तयार करण्यासाठी जबरदस्त पोटेन्शियल दिल्याबद्दल Bw

<<मनिम्याऊ. धन्यवाद. तुमचा लेख वाचून १५-२० मिनिटात लेख तयार करण्यासाठी जबरदस्त पोटेन्शियल दिल्याबद्दल Submitted by DJ....... >>

या मग सरबत प्यायला Happy