लेखन उपक्रम : माझ्या आठवणींतली मायबोली

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:12

हा हा म्हणता मायबोलीला २५ वर्षे पूर्ण झाली !
ते नक्की कोण "हा हा" म्हणत होतं बुवा? आम्ही नाही ऐकलं. हा काही आयडींनी "हाय" खाल्ली ते ऐकिवात आहे.

आमच्या वेळेस असं नव्हतं !
ते माहिती आहे हो. काय नव्हतं तेच कितिदा सांगता. एकदा तरी काय होतं ते सांगा की ! आणि हे एकदाच बरं . नंतर परत ५० वर्षे झाली कि पुन्हा विचारू. तुम्ही असाल ना तेंव्हा ? अहो त्यात काय ! हा हा म्हणता आणखी २५ वर्षे निघून जातील बघा.

काय ?मायबोलीला २५ वर्षे पूर्ण झाली?
मग होता कुठे इतके दिवस ? आर्कुटवर का मायस्पेस वर? पण आला आहात ना आता, जरा थोडं टेकून जा, जुन्या मित्रांना भेटून जा !

तर आपल्या मायबोलीला या गणेशोत्सवात २५ वर्षे पूर्ण झाली.
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
यावर थोडं लिहा की.

गेली २५ वर्षे ही पहिली मराठी साईट, (आणि पहिली देवनागरी साईट) अजून चालू आहे ती तुमच्यामुळेच. थोडं स्मरणरंजनात रमूया ! लिहायला वेळ नसेल तर विडीयोही चालेल. मायबोलीवरच्या कुणा जुन्या मित्रमैत्रीणींच्या संपर्कात असाल तर त्यानाही या उपक्रमाची लिंक पाठवून भाग घ्यायचा आग्रह करा.
धाग्याचे शीर्षक माझ्या आठवणीतली मायबोली- मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही.
प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी

( आणि त्या निमित्ताने तुमच्या या लेखात , मायबोलीवरच्या तुमच्याच जुन्या लेखनाचे दुवे देऊन थोडी स्वतःची रिक्षा फिरवलीत, जुने धागे वर आणलेत, तरी चालेल. तेवढीच नवीन सभासदांना तुमची ओळख होईल आणि तुम्हाला नवीन चाहते मिळतील )

किती आठवू गा तू ते
अब्द अब्द मनी येते !

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच काही मिनिटांपूर्वी ते लेख एकत्रित मांडले आहेत. इथे पाहता येतील. बाकी उपक्रमांचीही यादी करण्याचे काम सुरु आहे.
https://www.maayboli.com/ganeshotsav/2021. >>>> हितं आम्हालाबी येक खुर्ची द्या की

मला बी हवीय हो संयोजक , माझं ही नाव दिसत नाहीये. ही माझ्या लेखाची लिंक. प्लिज add करता का

https://www.maayboli.com/node/80105

यादी अपडेट झालेली नाही काय?
माझंही नाव तिथे दिसत नाही.

(बकेट लिस्टच्या यादीतही अजून बरीच नावं दिसत नाहीयेत.)

होतंय का पोस्ट, होतय वाटते, आता 11 सप्टेंबर ला लिहिलेली पण पोस्ट न झालेली शिळी पोस्ट टाकतो. शांत माणसाच्या पोस्टला उत्तर म्हणून होती ती

आता कळले, यात मोबाईल मधून स्मायली टाकलेल्या चालत नाहीयेत

शांत माणूस, तुम्हाला टीवल्या बावल्या म्हणायचे आहे का? ते जास्त चालेल. ते लिहिण्याची टंगळमंगळ करु नका

मायबोलीवरचा आमच्या पिढीचा प्रोटोकॉल म्हणजे इथे जो कोणी येईल तो अरे तुरे किंवा अग तुग च असणे मस्ट, वयाचा काही संबंधच नाही म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असा किंवा शंभर, इकडे आलात की तुम्ही समवयस्क पण आताचा protocol माहिती नाही, त्यामुळे आजचे पालक कसे मुलांना घाबरून असतात तसं तुम्ही आम्ही लिहिले आहे

तसे आम्ही मायबोलीवरचे आजोबांच म्हणायला पाहिजे, बर का मुलांनो? आम्हाला तुमची आज्जी पण मायबोलीवरच मिळाली, त्यावरून काही काका काकूंचा असा समज झाला की मायबोली एक matrimonial site आहे

बाकी नन्तर

या उपक्रमासाठी संयोजकांना खूप खूप धन्यवाद.
कितीतरी छान आठवणी वाचायला मिळत आहेत.
आणि जुन्या गाजलेल्या धाग्यांच्या लिंक्स म्हणजे मोठा खजिनाच हाती लागल्यासारखे वाटतेय.

मस्त उपक्रम आहे हा, किती तरी आठवणी लिहिता आल्या

माझ्या आठवणितली मायबोली पेक्षा मी मायबोलीवर काय काय केलं तेच जास्त लिहिलं गेलं , पण त्याला पर्यय नाही। पण ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी मायबोली गणेशोत्सव समितीचे मनापासून आभार मानते

नवा धागा काढून लिहिण्याइतका जीव या लेखनात नाही, म्हणून इथेच प्रतिक्रिया म्हणून लिहितेय.

२००४ मधली गोष्ट. ऑफिसमधल्या मित्राने विचारलं, ‘श्वास’ बघायला येणार का? आम्ही काही जण जाणार आहोत. मी त्याला दोन तिकिटं ठेवायला सांगितली, आणि आई आणि मी गेलो. पंधरा एक जणांचा ग्रूप होता तो. भेटल्याभेटल्या भरपूर गप्पा सुरू झाल्या सगळ्यांच्या. सगळे एकमेकांना चांगले ओळखणारे, नियमित भेटणारे वाटले. मी काही तेव्हा तोंड उघडलं नाही. मध्यंतरामध्ये आणि सिनेमा संपल्यावर आई आणि मी सिनेमाच्याच विचारात होतो, त्यामुळे परत कुणाशी ओळख करून घ्यायचा किंवा बोलायचा प्रयत्नही केला नाही.

त्याच आठवड्यात मला एका इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. मोठी कंपनी, बर्‍याच दिवसांनी मी देत असलेला इंटरव्ह्यू यामुळे तसं बरंच दडपण होतं मनावर. आत गेले, आणि इंटरव्ह्यू घेणार्‍याने पहिला प्रश्न केला, “अग, तू परवा ‘श्वास’ बघायला होतीस ना मायबोलीच्या ग्रूपमध्ये?” माझं दडपण वगैरे पळून गेलं कुठल्या कुठे. नंतरचा इंटरव्ह्यू म्हणजे निवांत गप्पा मारल्यासारखा झाला. पुढे मी सिलेक्ट झाले, तिथे जॉईनही झाले, पण इंटरव्ह्यू घेणार्‍याला ऑफिसमध्ये कधीच बघितलं नाही. (तो ऑनसाईट गेला तोवर.) मायबोलीची सदस्यही नसताना मायबोलीकरांसोबत असल्याने मला हे मिळालं आहे. (ऑफिसमधला हा मित्र आणि इंटरव्ह्यू घेणारा या दोघांचेही मायबोली आयडी मला आठवत नाहीत. बहुतेक सायबर मिहिर आणि भ्रमर / मिलिंद.) पण ऑनलाईन ओळखीतून लोकांमध्ये एकमेकांविषयी इतका विश्वास, आत्मीयता निर्माण होऊ शकते हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं.

यापूर्वी एक – दोन वेळा मिहिरनेच सांगितल्यामुळे मायबोलीवर चक्कर झाली होती, पण अजून घरी इंटरनेट नव्हतं. ऑफिसमध्ये नेहेमीच पेटलेलं असायचं त्यामुळे निवांत वाचायला मिळण्याची शक्यता नव्हती. रोमन लिपीतलं मराठी वाचणं कष्टाचं होतं. त्यात मायबोलीवर बहुतेक होमसिक झालेले परदेसिया गप्पा मारतात असं पहिलं इम्प्रेशन होतं. पुण्यातच असल्याने बाकी मराठी वाचायला बोलायला भरपूर संधी होती. त्यामुळे मायबोलीवर येण्याबाबत विशेष उत्सुकता नव्हती.

२००८ मध्ये जर्मनीला एकटीच होते. तेव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. मायबोलीचा तेव्हा परत नव्याने शोध लागला. दोन – चार लेख इथेही लिहिले. पण मी मायबोलीवर यायचे ते मुख्यत: वाचायला. दाद, नंदिनी, कवठी चाफा, कौतुक शिरोडकर, दिनेशदा (बहुतेक ट्युलिपही.) यांचं लिखाण मनापासून आवडायचं. गप्पांच्या पानांवर मी फिरकायचे नाही, कारण मी उगवणार कधीतरी आठवडाभाराने, तोवर काय घडून गेलंय याचा मला पत्ता नसायचा. वादविवाद प्रकाराचाही मनापासून कंटाळा असल्याने त्यात एकदाच थोडं काही बोलले असेन. यानंतर कित्येक वर्षं मी फक्त निसर्गाच्या गप्पांच्या पानावर प्रतिसाद द्यायचे. त्या गप्पा थंडावल्यावर तेही प्रतिसाद थांबले आणि मी कायम रोमात असणार्‍यातली झाले. इतक्या दिवसांनी वाचल्यावर ते लेखन शिळे झालेले असायचे, त्यामुळे प्रतिक्रिया दिल्या नाहीत कधी. अजूनही वाचनासाठी मायबोलीवर मधून मधून येतेच. फार नियमित इथे येता आलं नाही, तरी मी आल्यावर वाचनाचा कोटा पूर्ण करूनच जाते. अनया, धुंद रवी, हार्पेन, चिनूक्स, सई केसकर, मनीमोहर, सीमंतिनी, मी अनु यांचं लेखन विशेष लक्षात राहिलं, अमेरिकन गुलामगिरीवरची मालिकाही. सध्याच्या लेखनापैकी जिज्ञासाचं ‘नातं निसर्गाशी’ आणि त्यावरचे प्रतिसाद अगदी नीट वाचले. (टंकाळा नसता तर जिज्ञासा मांडतेय तेच लिहायला मला आवडलं असतं, म्हणून जास्तच जिव्हाळ्याने. Happy )

मायबोलीला मी सर्व्हरस्पेस न खाणारा एक वाचक दिला. Wink बाकी लेखन, गाजलेलं लेखन, प्रतिसाद, गांजणारं लेखन असलं काहीही केलेलं नाही.

विचारपूस सुविधेचा किती वापर होतो, त्यातून तुमचं मायबोलीज्ञान किती वाढतं, लोक इतरांच्या विपूंमध्ये किती बागडतात हे मला अजिबातच माहित नव्हतं.

मायबोलीमध्ये काय बदल झाले हे सांगण्याइतकी नियमित मी इथे येत नाही. पण राजकीय वादविवाद फारच टोकाला जाताहेत आता, कुठल्याही धाग्यावर सुरू होताहेत असं वाटतं.

इतकी वर्षे झोपा काढल्यावर आज अचानक हे लिहावंसं का वाटलं मला? इथे लिहिलं नाही, तरी मायबोलीकडून बरंच काही मिळालं आहे. रोमातल्या, अधूनमधून डोकावणार्‍या बर्‍याच जणांना कदाचित असंच म्हणायचं असेल. ते व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार! मायबोलीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

गौरी कॉपी पेस्ट करायचे कष्ट घ्या आणि नवीन धागा काढाच. बराच जीव आहे तुमच्या आठवणीत. मायबोलीने तुमच्या नोकरीची छान सुरवात झाली. सुंदर मनोगत.

गौरी, इंटरेस्टिंग...!

मजकूर लहान/मोठा असा क्रायटेरिया कशाला? वेगळा धागा हवाच याचा.

अरे धागा काढा रे नि त्याला पताका जोडा...म्हणजे एरवी नायतर चिनूक्स, मी_अनु, धुंद रवी, मनीमोहर ह्या अशा ओळीत माझं नाव कश्शाला येणार आहे??! पावलाय बाप्पा नि आलंय नाव तर होऊ द्या खर्च Lol थँक्यू गौरी.
जोक्स अपार्ट, छान लिहीले आहे. मनापासून आहे. आवडलं.

गौरी, इंटरेस्टिंग...!

मजकूर लहान/मोठा असा क्रायटेरिया कशाला? वेगळा धागा हवाच याचा.>>+१

निरू, मी_अनु, मामी, किशोर मुंढे, ललिता-प्रीति, सामो, सीमंतिनी, कविन, केया सगळ्यांना धन्यवाद! नवा धागा काढलाय.

अरे धागा काढा रे नि त्याला पताका जोडा...म्हणजे एरवी नायतर चिनूक्स, मी_अनु, धुंद रवी, मनीमोहर ह्या अशा ओळीत माझं नाव कश्शाला येणार आहे??! पावलाय बाप्पा नि आलंय नाव तर होऊ द्या खर्च Lol थँक्यू गौरी. >>>

अगदी माझ्याच भावना!

अरे धागा काढा रे नि त्याला पताका जोडा...म्हणजे एरवी नायतर चिनूक्स, मी_अनु, धुंद रवी, मनीमोहर ह्या अशा ओळीत माझं नाव कश्शाला येणार आहे??! पावलाय बाप्पा नि आलंय नाव तर होऊ द्या खर्च Lol थँक्यू गौरी.
जोक्स अपार्ट, छान लिहीले आहे. मनापासून आहे. आवडलं.>>> Proud सी

Pages