डुक्कर आणि कोंबडी

Submitted by सामो on 3 September, 2021 - 17:06

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.

कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.

एका शेतकर्‍याकडे, त्याच्या मळ्यावर एक डुक्कर व एक कोंबडी होती. या दोघांनाही आपल्या मालकबद्दल अतोनात प्रेम आणि आदर होता. दोघांच्याही मनात मालकासाठी काहीतरी चांगले करावे अशी इच्छा होती.
एकदा कोंबडी डुकराकडे आली व म्हणाली - "मला एक सुरेख कल्पना सुचली आहे. तू जर ती मान्य केलीस तर मालकाकरता आपण काहीतरी मस्त करू शकू." डुकराने पृच्छा केली "काय?" तेव्हा कोंबडी म्हणाली - "मालकाला नाश्त आवडतो पण बिचार्‍याकरता वेळ नसतो तेव्हा आपण दोघांनी मिळून उद्या त्याच्याकरता नाश्ता बनवायचा का?" डुकराला ही कल्पना रुचली. तेम्हणाले "जरूर. काय बनवू यात बरे?" कोंबडी म्हणाली - "हे बघ मी नाश्त्याकरता अंडी देऊ शकेन. तू ham देशील का? बघ बुवा आपण मस्त ham- अंड्यांचा नाश्ता मालकाला देऊ"
यावर विचार करून डुक्कर म्हणाले - "नाश्त्यामध्ये तुझा फक्त सहभाग आहे. माझे तर सर्वस्व पणाला लागते आहे."

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये देखील काही लोक हे डुकरासारखे संपूर्ण committed असतात. प्रकल्प चालणे अथवा न चालणे हे त्यांच्या करता तारक अथवा मारक ठरते तर दुसर्‍या प्रकारचे म्हणजे कोंबडी प्रकारचे लोक हे committed नसतात तर त्यांचा फक्त प्रकल्पामध्ये सहभाग असतो.

स्रोत - https://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोंबडीचे ढुंगण खातात का ऋ?
>>>>
मला कल्पना नाही. लहानपणी आजोबा दारात कोंबडी कापायचे. बघायला मी जायचो धीर एकवटून. पण तिच्या मानेवरून सुरी चालवताना बघायला मन धजावायचे नाही. त्यानंतर रक्त वगैरे साफ करून, गरम पाण्यात टाकून पिसे काढून तिला सोलेपर्यंत बघायचो. पण नंतर तिचे तुकडे करताना बघणे व्हायचे नाही. तिथवर जाईस्तोवर पेशन्स संपायचा. त्यामुळे तिच्या शरीराचा कुठला भाग खातात कुठला नाही याची कल्पना नाही.

पण मुद्दा तो नाहीये.
वर मी फक्त उदाहरणादाखल दिले आहे ते हे सांगायला की मालकाला ढुंगण द्यायचे आहे की अंडी हे ठरवायचा अधिकार त्या कोंबडीलाच आहे. प्रत्यक्षात मी कोंबडी असतो तर मालकाला ना ढुंगण दिले असते ना अंडी, फक्त दोनचार पिसे उडवली असती. कोणी मालकासाठी जीव द्यायचा असेल तर खुशाल द्यावा. त्याचे कौतुक ईतरांना सांगू नये असे मला वाटते.

सदर कोंबडी व डुक्कर हे बाळबोध कथेतील पात्रं वाटतात, मुळात मालकाने कोंबडी आणि डुक्कर एका विशिष्ट उद्देषानेच पाळलेले आहेत, मालक काही दिवस अंडी खाऊन नंतर आक्खी कोंबडीच खाणार आहे आणि एक ना एक दिवस फक्त हॅम नाहीतर आक्खे डुक्करच खाणार आहे , त्यामुळे मालकांसाठी नियमित कामाव्यतिरिक्त विशेष करू पाहणारे कोंबडी व डुक्कर दोघेही सारखेच गाढव आहेत.

डुकराला इतर कामासाठी देखील ठेवला असू शकेल....

एक जोक आठवला...

एकदा एक डुक्कर चे पिल्लू आणि त्याचे बाबा
कचरा पेटी च्या बाहेर शी खात असतात.
पिल्लू म्हणते
" बाबा, बाबा, आपण जसे माणसाची शी खातो तसे आपली शी कोण खात असेल का??

चिडून डुकराचे बाबा जोरात त्याला
म्हणतात,"तुला किती वेळा सांगितलं आहे - जेवताना घाण बोलत जाऊ नको...

हा मेटफोर कदाचित आय्टि मधे स्प्रिंट्/वर्कस्ट्रीम लेवलला लागु होइल कारण त्या लेवलला सगळेच बाय डिफॉल्ट डुक्कर (कमिटेड) असतात. आता काहि डुकरांना (स्क्रम मास्टर्/पिएम्/लीड) आपण कोंबड्या आहोत हा गैरसमज असतो, पण सरतेशेवटि ते सुद्धा टेक्निकली डुक्करंच असतात. याहुन वरच्या, स्टेकहोल्डर लेवलला रेसीचार्ट असतो. तिथे डुक्कर, कोंबड्या यांच्या बरोबर लांडगे (एसआय्ज) आणि माकडं (कस्टमर) असतात. यातले लांडगे, डुकरं+कोंबड्यां यांच्या मदतीने हार्टि ब्रेकफास्ट देतो असं आमिष माकडाला देतात. बर्‍याचदा ब्रेकफास्ट अंडरकुक होउन बेचव होतो, आणि ज्याच्या करता ब्रेकफास्ट बनवला त्याचं अगदि माकड होतं... Proud

Lol

आता काहि डुकरांना (स्क्रम मास्टर्/पिएम्/लीड) आपण कोंबड्या आहोत हा गैरसमज असतो, पण सरतेशेवटि ते सुद्धा टेक्निकली डुक्करंच असतात.
>>> स्क्रम मास्तर आणि पीएम बिनकामाचे असतात.. लीड ला या लिस्ट मध्ये ठेऊ नका.. लीड घास घास घासतो...

इंटरव्ह्यू घेणे आणि देणे हा अति विनोदी प्रकार आहे.>> तुमचे मांजर वाले लेख येउंद्यात की. खुसखुशित असतं तुमचं लेखन!

बाकी, लेख पटला Happy

ऋ, कोंबडी चे अंडे २ प्रकार चे असते, एकात पिलु असते (मेटींग झाले तर) आणि एरवी जे असते (दुसरा प्रकार) ते आपण खातो (पीरिएड). तुझा अंड्या आयडी असुन इतकी बेसिक माहिती तुला नाहि?

Pages