कणसाची आमटी

Submitted by अमुपरी on 28 August, 2021 - 02:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 कणीस
अर्धा वाटी किसलेले खोबरे
2कांदे (एक कांदा बारीक चिरुन फोडणी साठी आणी एक वाटणा साठी)
2 चमचे धणे.
चिंच छोट्या लिंबा इतकी
किंचीत गुळ
तिखट पुड
हळद
मिठ

क्रमवार पाककृती: 

1)पहिल्यांदा कणीसाचे आडवे चिरुन छोटे 3 भाग करावेत.
नंतर परत 1 भाग उभा चिरुन 2 भाग करावे. 1 कणीस चे 6 छोटे तुकडे होतिल.
त्यानंतर कुकरला एका भांडयात थोडे पाणी आणी मिठ घालुन शिजवुन घ्यावे.
20210830_141104.jpg

2)1 कांदा, खोबरे, धणे , चिंच, हळद यांचे वाटण करावे.

20210830_141502.jpg

फोटो मध्ये चिंच नव्हती म्हणून सोले वापरली आहेत.

3)एका कढई मध्ये थोडे तेल घालुन साधारण 2 मोठे चमचे ते तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालावा. त्यावर तिखट पुड घालावी.

4)नंतर सर्व कणसांचे तुकडे घालुन परतवून घ्यावे.
20210830_142138.jpg

5)यामध्ये आता पाणी घालावे कणसे उकडलेले.
आणी गरज असल्यास वेगळे पाणी पण घालावे. कणसाचे तुकडे बुडेपर्यंत पाणी हवे.
20210830_142157.jpg

6)पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वरील वाटण घालावे. थोडे मिठ आणी किंचीत गुळ घालावा. व शिजवावे. 15 मीन.

मिठ जपुन घालावे कारण कणसे शिजवताना मिठ घातले आहे.
हे सर्व चांगले शिजवावे.
गरज असल्यास किंवा कुणाला आमटी आणखीन पातळ हवी असल्यास पाणी घालावे.

20210830_142846.jpg

वाढणी/प्रमाण: 
4 जण
अधिक टिपा: 

गरज वाटल्यास आमटी मिळुन येण्यासाठी थोडे तांदळा चे पिठ लावू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

दिसायला भारी दिसतीय.
बाकी मका किंवा कॉर्न ह्या प्रकारात कॉर्न भेळ हा प्रकार जास्ती आवडतो.
सिटी प्राईड कोथरूड ला बऱ्याचदा खाल्लेली आहे आणि आवडलेली पण आहे. (कब लौटेंगे वो बिते दीन Sad )
डेक्कन कॉर्नर च्या आसपास कुठेतरी कॉर्न क्लब नावाचे रेस्टॉरंट आहे तिकडे कॉर्न पुलाव, कॉर्न टिक्की असे नानाविध प्रकार मिळतात.
आता आहे की नाही माहिती नाही.

छान दिसतेय.
अस केलं तर...
साधारण गोल चकत्या करायच्या ( स्लाईस ब्रेडच्या जाडी एवढी चकती) चकतीवर दोन दाणे एकावर एक चिकटलेले अशी जाड तर शिजायला, वाढायला नी खायला पण काही अडचण येवु नये.

घरच्यांचा विरोध पत्करुन मी एका कणसाची आमटी केली आहे... छान चव आहे. सर्वांनाच आवडलं. मिळून येण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर वापरलं अन खारट झाली म्हणुन बटाट्याच्या सळ्या कापून घातल्या Wink (काळएळ बघुन ही माझी वैयक्तिक अ‍ॅडिशन)

धन्यवाद mi_rucha, जेम्सबॉन्ड़.
mi_rucha मला पण कॉर्नभेळ च आवडते जास्त. कॉर्नटिक्की पण मस्त लागते.
जेम्सबॉन्ड़ तुम्ही म्हणता तसे तुकडे एकदा करुन बघायला हवेत.

DJ छान एकदा ट्राई केली तुम्ही रेसीपी.
माझी आई पण नवीन रेसिपी ट्राई करायला तयार च होत नाही खुप convince करावे लागते तिला.
बटाटे घातल्यावर खारट पणा कमी झाला का म? तुम्ही दाणे काढून केली का ? मी लिहिले होते रेसिपी मध्ये मिठ जपुन घाला Happy

बटाटे घातल्यावर खारट पणा कमी झाला का म? >> हो... एका बटाट्याचा बळी दिल्यावर खारटपणा गेला. Proud

तुम्ही दाणे काढून केली का ? मी लिहिले होते रेसिपी मध्ये मिठ जपुन घाला>> नाही मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काप केले. फक्त वाटण करताना काही दाणे पण वाटले. त्यामुळे जरा घट्टपणा आला आहे.

Pages