चिंचेची आंबट-गोड कढी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 August, 2021 - 07:42

तोंडाला चव आणणारी चिंचेची आंबट-गोड कढी
IMG_20210826_122156.jpg

१ मुठ चिंच (मोठ्या वाटीत भिजत घाला)

खालील मिश्रण एकत्र करुन हाताने कुस्करा त्यामुळे छान स्वाद येतो.
एक मोठा चिरलेला कांदा
अर्धा वाटी ओल खवलेल खोबर
अर्धा वाटी कोथिंबीर
पाव वाटी गुळ

कृती:
गॅसवर भांडे गरम करा
२ ते ३ चमचे तेल सोडा
चिमुटभर हिंग घाला
१०-१५ लसुण पाकळ्या चिरलेल्या घालून ढवळा
2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून ढवळा
पाव चमचा हळद घालून ढवळा
कांदा कुस्करलेल मिश्रण घाला आणि ढवळा. शिजू देवू नका.
त्यावर चिंचेचा कोळ घाला आणि गरजे नुसार १ ते २ पेले पाणी घाला
कांदा कुस्करलेल्या मिश्रणात आधी मीठ घातले आहे हे लक्षात ठेवून जरा कमीच मीठ घालायचे.
आता ही कढी उकळी येण्याच्या आधीच जरासे बुडबुडे यायला लागले की बंद करायची, उकळू द्यायची नाही. उकळवली तर चवीत फरक पडतो.
ही कढी नुसती सुद्धा पितात. कांदा खोबरे कच्चे असल्याने छान कुरकुतीत लागते. कडधान्यांच्या भाजी बरोबर व मटण चिकन बरोबर ही कढी घेतात.
अजून व्यवस्थित कळण्यासाठी यू ट्युबवर प्रकाशित केलेला व्हिडीओ देत आहे.
https://youtu.be/hf9HrJaS4PA

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागुकाकी, मस्त..!! अगदी स्स्स्स्स्स्स्स्लर्प कढी दिसते ही..!! Bw
मला तर तुम्ही मागे एकदा कुठल्याशा लेखात लिहिलेलं चिंचा फोडण्यासाठी किती मेहनत करावी लागते, चिंचेच्या शिरा, चिंचोके बाजुला कसे करावे लागतात अन हे करताना बोटांना वात कसा येतो ते स्मरलं.

तरीपण मला राहुन राहुन असं का वाटतंय ही रेसिपी तुम्ही स्वतः लिहिलेली नाही... Uhoh कदाचित एखाद दुसरे नवीन शब्द लिखाणात अ‍ॅड झाले असावेत किंवा लेखनशैली बदलली असावी.. असो. मला तर तुमच्या सर्वच रेसिपी आवडतात अन चॅनेलही Bw

डिजे. ही रेसिपी मीच लिहीली आहे आणि केलीही आहे. ही यूट्युबला लिहाव लागत त्याप्रमाणे असल्याने वेगळी वाटते.
किल्ली धन्यवाद.
ब्लॅकबेल्ट मी अजून रसम केले नाही. कल्पना नाही.

Nahi

आमसूल घातले व गरम केले तर गरम सोलकढी होईल. तीपण मस्त होते , नारळाचं दूध घालतात. कोकणी रेसिपी आहे, भाताबरोबर खातात.

चिंचेचे रसम साऊथ इंडियात करतात, ते त्यात भरपूर टोमॅटोपण घालतात. चिंचेचा कोळ करून मग रसम करतात, पण आजकाल रसम पावडरची तयार पाकिटे मिळतात.

https://youtu.be/e9qVOiZ9o5s

नवीनच प्रकार वाटतोय. तोंडीलावण्यासारखी खायची आहे का?

मलाही लेखनातले काही शब्द वेगळे वाटले.

तेल सोडा - तेल घाला. (आज काल लोक सगळे जिन्नस टाकतात. Sad )
हिरव्या मिरच्या, हळद, मिश्रण ढवळा - परता? द्रव पदार्थ ढवळतो. तेलावर परततो.

रसम हा साऊथ इंडियन भोजनाचा रोजचा , आलमोस्ट कम्पलसरी भाग आहे,

मला माझ्या चेन्नईच्या रूम पार्टनरने मालदिवात असताना शिकवला होता. मी तिथेच एकदोनदा केले होते. मग विसमरणात गेले

छान दिसतेय, सूप सारखे जेवणाआधी वाटीभर गरमागरम प्यायलो तर तोंडाला खरेच चव येईल. किंवा तापात चव नसतानाही ट्राय करू शकतो. तसेही दह्याची कढी नाही पिता येत तापात.
आमच्याकडे कोंबडीवड्याचा बेत असताना सोबत सोलकढी असल्यास मी असेच आधी वाटीभर पितो. पण अर्थात ती गरम नाही तर नॉर्मल पितो. त्यामुळे जी तोंडाला चव येते त्यावर झणझणीत कोंबडीवडे आणखी छान लागतात.

लगे हाथ जवळा मसालाचा विडिओही पाहिला सजेशनमध्ये आलेला. https://www.youtube.com/watch?v=5y6wea39eeY
तांदळाच्या भाकरीसोबत वा ती नसल्यास मग चपातीसोबत .. फार आवडीचा प्रकार.. आणि फार भारी दिसतोय त्या विडिओत
पण आमच्याकडे वांगे नाही टाकत यात. वांगे-बटाटा आणि सोडे हे कॉम्बिनेशन हिट आहे आमच्याकडे.