बंगलोर मधील चांगले बिल्डर

Submitted by च्रप्स on 23 August, 2021 - 21:07

बंगलोर मध्ये फ्लॅट घ्यायचा विचार आहे, माझे ऑफिस बंगलोर मध्ये आहे आणि उद्या भारतात परतायचा विचार पक्का झाला तर बंगलोर ला येणे असेल...
पुण्यातील चांगले बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन माहीत असतात जसे की डी एस के, कोलते पाटील, परांजपे वगैरे.. तसे बंगलोर मधील चांगले बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन माहिती हवी आहे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रेरा (RERA) ने approve केलेले

रेरा (RERA) ने approve केलेले प्रोजेक्ट्स बघा.

शोभा डेव्हलपर्स, श्रीराम प्रॉपर्टीज, वैष्णवी, मंत्री, ब्रिगेड, गोदरेज, L&T, कुमार, प्रेस्टिज, पूर्वांकरा, असे बरेच आहेत.

(तुम्ही रहायला येणार असाल आणि ऑफिसला नेहमी जायलायायला लागणार असेल तर शक्यतो ऑफिस जिथे आहे त्या भागात घर घ्या)

तुम्ही रहायला येणार असाल आणि ऑफिसला नेहमी जायलायायला लागणार असेल तर शक्यतो ऑफिस जिथे आहे त्या भागात घर घ्या
>>
ऑफिसच्या भागात घर घेताना आसपास इतर सुविधा अन रेसिडेन्शिअल एरिआ असल्याची खात्री करून घ्या.
माझ्या कलीगनी ऑफिसच्या शेजारी घर घेतलं, पण संध्याकाळी जनरल खरेदी / फॅमिली डिनर साठी सोसायटी बाहेर पडणं मुश्किल होतं कारण रस्ता ऑफिसमधून घरी परतणार्‍यांच्या गर्दीनी कायमच जॅम असतो.
अर्थात हे सगळं प्री पँडेमिक... पोस्ट पँडेमिक काय अन कसं असेल कोण जाणे... (कलीग पँडेमिकमधे मूळ गावी परत गेलाय Wink )

बंगलोरमधे जागा घेताना बघायचा अजून एक मुद्दा म्हणजे जमीन लेक एरिआ मधून रीक्लेम केलेली आहे / नाही.
जर लेक एरिआ मधली असेल तर पावसाळ्यात ड्रेनेज तुंबणं वगैरे होऊन रस्त्यात वॉटर लॉगिंग होतं. सेलर पार्किंग असेल तर काही ठिकाणी पार्किंग मधेही पाणी भरतं.
बंगलोरच्या काही भागांमधे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मोठ्या सोसायट्यांचं वार्षिक टँकर बजेट लाखोंच्या घरात आहे कारण त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.

बंगलोरच्या बर्‍याच भागात सध्या मेट्रो कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि काही भागांमधे सुरू होतंय.
याचाही विचार करून डिसीजन घ्या.

बंगलोर मध्ये मेट्रो काम आणि ट्रॅफिक कमी करायला आयटी ऑफिसेस ना 2022 डिसेंबर पर्यंत वर्क फ्रॉम होम देण्याचा विचार चालू आहे.