६० वर्षांपूर्वी...

Submitted by पराग१२२६३ on 13 August, 2021 - 23:03

बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता.

लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले. त्यानंतर ताबडतोब 13 ऑगस्ट 1961 ला बर्लिनला विभागणारी ऐतिहासिक भिंत उभारण्यास सुरुवात झाली.

भिंतीच्या उभारणीतील पहिले 3 टप्पे लागोपाठ आणि त्वरेने हाती घेण्यात आले होते. कारण 60च्या दशकात वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणीही पळून जाऊ शकू नये आणि तसा प्रयत्न करणाऱ्याला लगेच ठार करता यावे यासाठीची व्यवस्था Death Trap म्हणून ओळखली जात होती.

1985 नंतर पूर्वेकडील नागरिकांनी पश्चिमेकडे जाण्यासाठी काही सवलती देण्याची जोरदार मागणी सुरू केली होती.

पुढील पिढ्यांना इतिहासातील त्या अध्यायाची ओळख व्हावी या हेतूने ‘बर्लिनच्या भिंती’च्या काही भागांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. आज ते अवशेष बर्लिनला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे.

या विषयी अधिक जाणून घ्यायचं असल्यास खालील लिंकवर जाता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/60.html?m=1

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users