15 ऑगस्टच्या तयारीसाठी आमच्या बोकलवाडीच्या सुप्रसिद्ध शाळेच्या मेन गेटपाशी एखादा माणूस कमरेपर्यंत आरामात उभा राहू शकेल एवढा मोठा खड्डा हेडमास्तर दाबे सरांच्या मर्जीत नसलेल्या शिक्षकांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. एक मोठे लोकल नेते तिथे एक कुठलेसे झाड की झुडूप लावायला येणार आहे म्हणे! झाड लावण्यासाठी एवढा मोठा खड्डा करतात का? असा लॉजिकल विचार तुमच्या मनात येऊ शकतो परंतु महत्त्वाचा मुद्दा तो नाही, मुद्दा ऑलिंपिकचा आहे, अभिमानाचा आहे, खेळाडू वृत्तीचा आहे. भारताला भाला फेकीत साक्षात सुवर्णपदक मिळाल्यामुळे अर्थातच आमच्या बोकलवाडीच्या गणिताच्या खविस बोकडे मास्तरांच्या निरुत्साहाला अक्षरशः ऊर्जेचा भाला टोचला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काल दुपारी त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना मैदानात आणून भाले फेकीच प्रात्यक्षिक करून दाखवण्याचे ठरवलं.
खरा भाला न मिळाल्यामुळे एका बांधकामाच्या ठिकाणा वरून एक मोठा लांबलचक बांबू आणण्यात आला. गणिताचे मास्तर पिटी मास्तरांच्या नाकावर टिच्चून भालाफेक करताहेत म्हटल्यानंतर सर्व वर्ग सोडून देण्यात आले. शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी मैदानात ही गर्दी केली.
आपल्या या उपक्रमास एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे ते पाहून गुरुजींना उत्साह आला नसता तरच नवल त्यांनी देखील आपला शर्ट काढून बनियन वर सर्व प्रेक्षकांचे अभिवादन केले. कटकुळे दंड असेल तरी शेवटी प्रसिद्धी कुणाला नको असते? अंमळ लांबच असलेला तो बांबू उर्फ भाला घेऊन मैदानाच्या एका टोकावर पायाने जमीन उकरत उभे असलेले मास्तर अक्षरश: एखाद्या दैदिप्यमान योद्ध्याच्या घोड्याप्रमाणे दिसत होते. मित्रांनो ज्या साठी तुम्ही श्वास रोखून धरलेला आहे शेवटी तो क्षण आलाच. एखाद्या पोलीस मागे लागलेल्या लबाड चोरा प्रमाणे त्यांनी सुसाट धाव घेतली.
लांबून बघणाऱ्या लोकांना असे दिसले की मास्तर बांबूचे एक टोक धरून मैदानाच्या मधात अगदी व्यवस्थित आले मात्र अचानक कशात तरी पाय अडकल्याने त्यांनी तोल सावरण्यासाठी भाल्याचे पुढचे टोक जमिनीत खुपसले आणि घात झाला. गुरुत्वाकर्षण आणि गतीच्या काही मूलभूत नियमांमुळे बांबू तिथेच आणि हे मात्र रॉकेट सारखे
बोंबलत उंच उडाले आणि प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाऊन बाहेर झाडासाठी करून ठेवलेल्या खड्ड्यात उलटे रुतून बसले.
दुसऱ्याची सार्वजनिक फजिती झाली की आपल्याला हसू येतेच आणि हसू दाबण्याचा प्रयत्न केला की तर अधिकच हसू येते हे एक वैज्ञानिक सत्य आहे. उपस्थित जनसमुदाय पडू पडू हसू लागला इतके की लोक हसता हसता जमिनीवर गडबडा लोळू लागले.
2-4 समजूतदार शिक्षक आपले असह्य हसू कसेबसे आवरत धावत मेन गेट पाशी गेले आणि बोकडे मास्तरांचे पाय धरून खड्ड्यातून ओढून बाहेर काढले.
या खड्ड्यात जाण्याच्या अनपेक्षित कार्यक्रमामुळे तोंडात गेलेला मलिदा थुंकत बोकडे मास्तर रागात एवढेच म्हणाले:
"च्यामारी हा खड्डा करणाऱ्याच्या, करेना का खड्डा दहा दिवस आधी पण मी म्हणतो खड्ड्यात लेंडी खत आता पासून घालायची काय गरज होती?"
बोकडे मास्तरांची भालाफेक!
Submitted by सखा on 9 August, 2021 - 05:57
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
इमॅजिन केलं
इमॅजिन केलं
हाहाहा
हाहाहा
(No subject)
मस्त. एकदम चित्रदर्शी.
मस्त. एकदम चित्रदर्शी.
भारीच की !
भारीच की !
Pole vaultला ते भालाफेक म्हणत
Pole vaultला ते भालाफेक म्हणत असावेत. बोकल बुद्रुक का खुर्द"?
लेंडी खत
लेंडी खत
भालाफेकीची चुकून पोल व्हॉल्ट
भालाफेकीची चुकून पोल व्हॉल्ट झाली
मस्तच !
मस्तच !
(No subject)
Hasun hasun murkundi valane
Hasun hasun murkundi valane mhanaje Kay te zaale..
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
आणि रॉकेट ‘बोंबलत’ उडते?
आणि रॉकेट ‘बोंबलत’ उडते?
आइगो आइगो बिच्चारे बोकाडे
आइगो आइगो बिच्चारे बोकाडे गुर्जी
(No subject)
(No subject)
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
(No subject)
हहपुवा.
हहपुवा.
मी आमच्या गणिताच्या मास्तरांना इमॅजिन केलं
लई मज्जा आली.
(No subject)
बोंबलत उडणारे रॉकेट... मस्त
बोंबलत उडणारे रॉकेट... मस्त वर्णन. अगदी हलकं फुलकं लिहिलंय. आवडलं
सर्वाचे आभार!
सर्वाचे आभार!