स्व-काळजी- जबाबदारी कोणाची?

Submitted by मोहिनी१२३ on 28 July, 2021 - 11:23

बर्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं.माझ्या फेसबुक मित्रयादीतील Dr.Shilpa Chitnis Joshi आरोग्य/आजारांविषयी अनेक महितीपर,बोधप्रद पोस्टस् लिहीत असतात.
त्या वाचल्यावर नवीन महिती कळतेच. परंतू त्या वाचून, काही कंमेटस् वाचून एक प्रश्न बराच काळ मनात घोळतोय. तो म्हणजे स्व-आरोग्य, स्व-काळजी ही जबाबदारी कोणाची?

माझ्या मते डॅाक्टरस् हे पेशंटसला treat करतात; काही वेळा आजार होऊ नये म्हणून prevent करतात.मार्गदर्शन करतात.

मला सुदैवाने खूप चांगले डॅाक्टर्स मिळाले. ज्यांनी मला मोठ्या आजाराच्या, मरणाच्या दाढेतून बाहेर काढलं. त्यामुळे मी डॅाक्टर्स बद्दल खूप कृतज्ञ आहे.

“तो कहना क्या चाहते हो भाई” हा प्रश्न बर्याच जणांच्या मनात स्पष्ट उमटलेला मला इथून दिसतो आहे.

मला एक विधान खूप ठाशीवपणे करायचे आहे की चांगले आरोग्य ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. ती आपल्या family doctor ची किंवा consultant/expert doctors ची जबाबदारी नाही.

आपण आपल्या आरोग्याची, काळजीची जबाबदारी जेव्हा स्वत: घेऊ तेव्हा खर्या अर्थाने आपण निरोगी राहूच पण वैद्यकीय व्यवस्थेवरचा ताणही कमी करण्यात आपला हातभार लागू शकेल.

हे शहाणपण मला एकाएकी आले नाहीय तर आरोग्याच्या हेळसांडीतून झालेले त्रास सहन करून आले आहे.

स्व-काळजी म्हणजे काय अशा विषयावर कधीतरी लिहायचं मनात आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडं अधिक विस्तृत लिहीले असते तर आवडले असते. लेखातील मुद्दा हा मूट पॉइन्ट वाटला. बरेचदा लिहीताना आपल्या नकळत बरेच काही गळून जात असते. त्या गाळलेल्या जागा भरता आल्या तर पहाव्यात. पण एकंदर कल्पना सुयोग्यच आहे.