चीज चिली गार्लिक ब्रेड रेसीपी

Submitted by निमिष_सोनार on 28 July, 2021 - 01:39

पेस्ट:
लसूण सोलून त्याचे अतिशय छोटे तुकडे करून बटरमध्ये मिक्स करा.
त्यात भरपूर चीज किसून टाका.
सिमला मिरचीचे छोटे तुकडे आणि हिरव्या तिखट मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे करून त्यात टाका.
हे सगळे मिश्रण हाताने किंवा चमच्याने मिक्स करून ठेवा.

ब्रेड:
शक्यतो जाड मोठा ब्रेड घेऊन तव्यावर एका साईडने थोडे बटर टाकून भाजून घ्या.
भाजलेल्या बाजूवर वरील पेस्ट किंवा मिश्रण पसरवा.
मग उरलेली बाजू बटर लावून तव्यावर भाजा. झाले चीज चिली गार्लिक ब्रेड तयार!!

यात मिरची नाही टाकली तरी चालते. मग तो बनतो चीज गार्लिक ब्रेड!!

(माझ्या मुलाने सांगितल्यानुसार हे लिहिले आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो निमीष, पाककृती छान आहे पण तुम्ही ललित लेखनात लिहीले आहे. कृपया प्रशासकांना सांगुन ती पाककृती विभागात हलवा.

सॉरी

https://www.maayboli.com/user/3/guestbook >>>>> इथे लिहा. तुमच्या रेसेपीच्या उजव्या साईडला वरती गुलमोहर- ललित लेखन असे लिहीले आहे त्या खालीच Admin वर टिचकी मारा.

रश्मी जी, मी प्रशासक यांना माझ्या पाककृती, ललित लेखन विभागातून पाककृती विभागात हलवण्यास विनंती केली आहे, पण यानंतर मला आणखी रेसिपी टाकायच्या आहेत त्यासाठी पाककृती विभागात त्या कशा टाकायच्या याची प्रोसेस मायबोलीवर कुठे लिखित स्वरूपात आहे का? त्याची लिंक देता का? किंवा थोडक्यात आपण मला गाईड कराल का?

https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes

वरील ग्रुपचे सभासद व्हा.
त्या ग्रुप मध्ये लिहिताना परत लेखनाचा धागा आणि पाककृती असे पर्याय असतात. पाकृ लिहायची असेल तर त्यातील पाककृती पर्याय निवडून लिहा.

हो, वर मानवदांनी बरोबर लिंक दिलीय. त्याचे सभासद व्हा नक्कीच आवडेल तुम्हाला ते सर्व वाचल्यावर. नेटवर खूप रेसेपीज असतात. पण मायबोलीवर बाकी माहिती पण आहे त्यातली.

हिरव्या मिरचीचे केले नाहीत कधी.चिली फ्लेक्स्,मक्याचे दाणे आणि ओरिगॅनो पावडर वापरले आहेत.
हे व्हेरिअशन करायला हवे.

खूप सॉल्लीड लागतं चीज-चिली-टोस्ट. मी व्हेंडरच्या काऊंटर वर अस्संच बनवून घ्यायचो. फार आवडीने खाल्लं मी हे प्रकरण.

डेक्कन क्विनेच्या पँट्रीत बसून बाहेर पळती झाडे पाहत बेकड्-बीन-चीज टोस्ट सोबत कॉफी पिणं तर अप्रतिम कॉंबिनेशन..

प्रमाण लिहले असते तर अजुन उपयोग झाला असता वाचकांना!!
कारण लसणाचा तिखटपणा आणि त्यात मिरचीचे तुकडे हे बॅलन्स करायला बटर आणि चीझ पण त्याप्रमाणात घालायला लागते नाहीतर ते अति झणझणीत होते!

अहो स्वरूप, त्यांनी त्यांच्या मुलाने जशी सांगितली तशी लिहिली आहे पाकृ हे कंसात लिहिलं आहे की हो. आपण ते वाचून आपल्या बेताने करायचं.

धागा ललित लेखनात काढा नाहीतर राजकारणात काढा, पण फोटो मंगताय बॉस.. त्याशिवाय मजा नाही. मी आताच गार्लिक ब्रेड खाल्ले. पण त्यात फाफट पसारा नव्हता. पोरांना झेपतील असे होते. पण मला कसलेही गार्लिक ब्रेड अवडतातच.

छानच लागेल हे प्रकरण.
(हल्ली भारतात ज्यात त्यात भरपूर प्रमाणात चीज घालून खाणं हा नवा ट्रेंड आहे हे बरीच युट्युब चॅनल्स बघून लक्षात आलेलं आहे)

प्रमाण त्याला विचारुन प्रतिसादात लिहिले तरी चालेल सोनार. एक अनुभव सांगते. माझ्या न णंदे कडे आर्मीचा कुक होता. त्याला त्यांच्या रेसीपी छान येत असत. राजमा राइस आलूपराठे. पण एकदा मी त्याला गार्लिक बटर करायला सांगितले होते तेव्हा त्याने मूठ भर ठेचलेली लसूण व एक १०० ग्राम बटर चे पाकीट एकत्र मिक्स करून ठेवले होते. हे खाणेच शक्य नाही.

१०० ग्राम अमूल बटर मध्ये फार तर एक दीड टी स्पून ठेचलेली लसून पाच सहा पाकळ्या व्यवस्थित होईल. ओरेगानो दीड टी स्पून चिलि फ्लेक्स दोन टीस्पून बेसिकली डोमिनोज चे चे पाकिटे आपल्या घरी उरतात ते एकावेळी एकेक घालता येते. काही लोकांना ही उरलेली पाकिटे वापरायला आवडत नाही. ते बघून घ्या.

ल्ली भारतात ज्यात त्यात भरपूर प्रमाणात चीज घालून खाणं हा नवा ट्रेंड आहे हे बरीच युट्युब चॅनल्स बघून लक्षात आलेलं आहे)>> हो आणी ती फार त्रासदायक ट्रेंड आहे. दोश्यात सुद्धा पिझाच्या भाज्या, चीज व मेयोनेज. पराठ्यात पण. गुजरात मध्ये हे असले स्नॅक्स फार दिसतात. ह्यामुळे रीजनल टेस्ट व डायव रसिटी खतम होते आहे.

मी एकदा ब्लाइंडली एक रशिअन सँदविच मागवला होता. आमच्या इथल्या नॉर्मल कीर्ती महल हॉटेल मधून. तर ते भयानक प्रकरण निघाले. चीज सँडविच मध्ये च पायनापल चे तुकडे व जॅम. आणि भयानक प्रमाणात किसलेले चीज. मग रेसीपी गुगल केली तर ते साधारण तसेच होते. पण अगदी संपवेना.

छान वाटते आहे रेसिपी.
ते चीजी मिश्रण लावलेला हिस्सा भाजायचा नाही का? पिझ्झा भाजतो तसे फक्त चीज वितळवून घ्यायचे का?

स्टफिंग वाला हिस्सा तव्यावर भाजताना चिकटत नाही का?>> अहो प्राची, स्टफिंग केलेला भाग भाजायचा नाही. तसं केलं तर तव्यावर जो राडा होईल तो कसा निस्तरायचा असा गहन प्रश्न पडेल. स्टफिंगचा भाग स्टफिंग करण्याआधीच भाजुन्न घ्यायचा अन त्या भाजलेल्या भागावर स्टफिंग ठेऊन मग स्टफिंगची बाजू वर राहील असं बघून खालची बाजू भाजून घ्यायची.

नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे Proud

Dj, ते लक्षात आलं म्हणूनच एडिट केले मी. पण...
असो.
आता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर द्या बघू.

Bw

नाही. चीज वितळून नाही घ्यायचं. मिश्रणाखालील ब्रेडचा भाग आधीच भाजून घेतल्यामुळे त्यावर मिश्रण ठेवल्यावर ते वितळू लागेल. तसंच हे मिश्रण ठेवलेला ब्रेड खालच्या बाजूने भाजण्यासाठी पुन्हा तव्यावर ठेवल्याने अजुन गर्मी मिळाल्यामुळे मिश्रणातील चीज मस्तपैकी पसरेल. मला हे असं वितळलेलं चीज चिली टोस्ट अन त्यावर डोमीनोज पिज्झाच्या पुडीतलं हर्ब्स टाकुन खाताना स्वर्गसुख लाभतं.... Bw

रणवीर ब्रार चीझ चिल्ली टोस्ट
सर्च करा यूट्यूब वर...खूप छान रेसिपी दिली आहे

स्वानुभव टीप: मीठ अजिबात घालू नका

भारतात बिग बास्केट वर मिक्क्ष चीज चे बारके बारके तुकडे अस्लेले एक पॅकेट मिळते. मी कधी कधी मॅक्रोनी( आपला साधा हैद्राबादी बांबिनो पास्ता) उकडून ठेवते त्यातला उरलेला वाटी भर अस्तो तो थोड्या तेलावर तव्यात परतते. मीठ मिरेपूड व इटाअलिअन मसाले थोडे बहुत घालून चांगले परतते. असले तर केचप ( म्याकडी मधले उरलेले) एक पाकीट घालते व मग इंडक्षन बंद करून हे चीजचे बारीक तुकडे दोन चमचे घालते. पदार्थ व तव्याच्या हीटने ते चीज बरोब्बर मेल्ट होते. जळत नाही. व एकूण बेस्ट लागते. आपली घरगुती रेसीपी. कुरकुरीत पास्ता

Pages