पाकिस्तानी टीवी सिरिअल्समधील काही संवाद.

Submitted by बाख on 26 July, 2021 - 08:12

पाकिस्तानी टीवी सिरिअल्स पाकिस्तानात गाजलीत कि नाही हे समजण्याचा मार्ग म्हणजे त्यातील संवादांची सोशल मीडियावर होणारी चर्चा. पाकिस्तानी सीरिअल्स मधील ज्या काही संवादांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली ती अशी:

१) “मम्मी आप ये क्या कह रही है? ” – हमसफर. हमसफर रिलीज झाल्यावर अगदी ब्लॉकबस्टर बनले. ज्यांनी ही सिरीयल पहिली त्यातील माहिरा खानचा रडका चेहरा आणि तिचा हा संवाद याचीच आठवण ठेवली. “ मम्मी आप ये क्या कह रही है? ”

२) “मोहब्बत में ईल्हम ना हो तू .. फिट्टे मुंह मोहब्बत का.” - सदके तुम्हारे. स्वत: लेखक खलील उर रहमान कमर आणि त्याची चुलत बहीण शानो या दोघांच्या प्रेमकथेवर आधारलेली ही कथा आहे हे कळले तेंव्हा प्रेक्षक या कथेत अधिकच गुंतले . जेव्हा शानो तिच्या मैत्रिणीशी खलीलच्या प्रेमाबद्दल बोलत असते तेव्हा तिला भेटायला तो कोणत्या वेळेला येईल हे सांगते, त्यावेळी तिची मैत्रीण विचारते कि त्याच्या ठावठिकाणाबद्दल ती इतकी खात्री कशी बाळगते आणि तो अगदी कोणत्या वेळेला पोहोचेल हे खात्रीने कशी सांगते ? तेव्हा शानो म्हणते : “मोहब्बत में ईल्हम ना हो तू .. फिट्टे मुंह मोहब्बत का .”

3) “मेरे तो मां बाप भी नहीं है ” - मन मयाल. या नाटकातल्या कलाकारांनी चाहत्यांना अगदी बांधून ठेवले होते. जीनाचे पात्र आयशा खानने निभावले होते आणि प्रत्येक वेळी जीनाने कोणाशीही संवाद साधला असता तिला तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याचे वारंवार सांगावे लागत होते. या व्यक्तिरेखेचा परिचय या संवादाशी संबंधित होता, “मेरे तो मां बाप भी नहीं है. ”

‘“४) “नवान कट्टा खुल गया” - सुनो चंदा. विचित्र जोडप्याची कथा. सिरीयलची स्टार निःसंशयपणे शदानाची भूमिका साकारणारी नादिया अफशान होती. तिच्या पंजाबी वाक्यांचे संवाद नेहमीच विनोदी वाटायचे आणि त्यातले हे वाक्य. “नवान कट्टा खुल गया” -

५) “हे है माये, है माये” - रांझा रांझा कर दी. इम्रान अशरफने ऑटिस्टिक भोलाची व्यक्तिरेखा साकारण्यापासून, त्याच्या वागण्याचे आणि संवाद फेकीचे जे कौशल्य दाखवले त्यामुळे ही व्यक्तिरेखा सर्वांची आवडती बनली. एक वाक्य जो प्रत्येकाला आवडला होता, तो “है है माये, है माये. ”

६) “इझी करा दो” - उदारी. पेडोफिलियाच्या विषयावर लेखक आणि दिग्दर्शक यांनी पंजाबी आणि उर्दूत इतकी सखोल पटकथा बांधली आणि कलाकारांनी इतका चांगला अभिनय केला कि या सिरीयलने प्रेक्षकांचा अगदी कब्जा घेतला. इम्तियाझच्या भूमिकेत अहसान खान याची कामगिरी अगदी वाखाणण्याजोगी. “इझी करा दो” - उदारीच्या अविस्मरणीय संवादांपैकी एक बनले.

७) " बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां हिल्ला मिल्ला " - ढूंढते रह जाओगे. या मालिकेतील दसरत मिर्ज़ा बेगचा तिसरा मुलगा सहजराव खान हैदरी, या अभिनेत्याने स्वतःलाच म्हंटलेले हे वाक्य सोशल मिडियावर बरेच लोकप्रिय झाले.

८) " जन्नत में, और हम सब तेरी हूरें हैं " – अहद-ए-वफ़ा. जीवाला जीव देणारे मित्र, देशावर असणारे त्यांचे प्रेम असा विषय घेऊन ही मालिका सुरु झाली आणि लवकरच लोकप्रिय झाली. जेव्हा अहद रझा मीर उर्फ कॅप्टन साद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्क लावून पडलेला असतो तेंव्हा विचारतो: " मैं कहा हूँ?" ज्याला गुलजार विनोदी प्रतिसाद देतो. " जन्नत में, और हम सब तेरी हूरें हैं. "

९) “ इस दो टके कि लड़कीके लिए आप मुझे पचास लाख दे रहे है ....! " मेरे पास तुम हो - खलील उर रहमान कमर यांनी लिहिलेल्या या संवादामुले बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आणि चर्चेला उधाण आले. सिरीयल मध्ये हुमायून सईद ज्या पद्धतीने अदनान सिद्दीकीला उद्देशून हे वाक्य म्हणतो त्यावर प्रेक्षक फिदा झाले. अदनान सिद्दीकीला त्याच्याच ऑफिस मध्ये जाऊन हुमायून सईदने मारलेली थप्पड सर्वाधिक चर्चेत राहिली.

१०) " मीनू, तू लड़की बड़ी कूल है, लेकिन दुनिया फ़िज़ूल है." चुपके चुपके . आयेजा खानने वेंधळ्या मीनूची भूमिका अगदी समरसून केली आहे. शिकायचे नसते म्हणून बऱ्याच तऱ्हेवाईक गोष्टी करणारी मीनू, इतरांवर चिडते तेंव्हा, " मीनू, तू लड़की बड़ी कूल है, लेकिन दुनिया फ़िज़ूल है." हे म्हणत राहते.

…………………..

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर !
मायबोलीवर पाकिस्तानी कार्यक्रमांचा धागा आजवर पाहिल्याचे आठवत नाही.
लहानपणी केबलवर पाकिस्तानी कार्यक्रम बघायचो बरेच.
लक्षात आता काहीच नाही.
अपवाद हवा हवा ये हवा खुशबू लुटा दे

“नवान कट्टा खुल गया” - सुनो चंदा. >>>>

सुनो चंदा ३ वर्षांपूर्वी पाहिली होती. खूप मस्त सिरीयल आहे. सिझन १ जरूर पहा.