आषाढ

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 24 July, 2021 - 02:52

आधी आषाढीचा दिन
त्यात चंचल हे मन
लई घालीते गोंधळ
आवरता आवरे न

ढग काळे नभामधी
थेंब-थेंब पाणी बांधी
थेंब पडता धरणी
कशी सुगंधाने गंधी

गंध मनी दरवळे
मन पळ-पळ पळे
आता इथं आता तिथं
काय ते न मज कळे

ढग घालती सावली
किरणे सूर्याची ही आली
ऊन पावसाचा मेळ
असा पहा इथे चाली

कधी सूर्याचा ही पारा
अन पावसाच्या धारा
आषाढ मना भुलवते
खेळ ऋतूचा हा सारा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults