वजनकाटा

Submitted by चंद्रमा on 18 July, 2021 - 05:05

त्या दिवशी चेक करावे म्हणून,
वजन काट्यावर ठेवला पाय!
बघता बघता शंभरी गाठली;
माझ्या तोंडी आले फक्त "हे काय?"!!

वजन कमी करण्याचा ध्यास घेतला मनाने,
त्या विचारानेच हरपून गेले भान!
व्यायामाचे वेळापत्रक बनवले;
विसरुन मी भूक-तहान!!

मग काय आता पुरे झाले,
सगळे खाण्यापिण्याचे लाड!
तिलांजली दिली एका-एकाला;
नको हे असले शरीर जाड!!

प्रयास केला भरपूर,
पर काही केल्या फरक जानवेना!
मग पुन्हा गेलो काट्यावर;
१२० किलो बघून मला काही समजेना!!

असे का बरे घडावे,
हा तर होता माझा उपहास!
सगळे कयास काय व्यर्थ गेले;
किती केले होते मी उपवास!!

खिडकीचा पडदा हलला,
वाऱ्याच्या गार झुळकीने!
आणि माझे स्वप्न भंगले;
वजन काट्याच्या मंजुळ संगीताने!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिडकीचा पडदा हलला,
वाऱ्याच्या गार झुळकीने!
आणि माझे स्वप्न भंगले;
वजन काट्याच्या मंजुळ संगीताने!!>> वजन काट्याचे मंजुळ संगीत??

विरू ती coin machine असते ना coin टाकला की music वाजते आणि मग वजन दाखवते! आधी होत्या तशा मशिन मंजूळ संगिताच्या!

प्रयास केला भरपूर,
पर काही केल्या फरक जानवेना!>> एवढं करूनही वजन कमी झालं नाहीच का ..??

मस्त आहे कविता..!!