"खरं प्रेम हे एकदाच होतं का?"

Submitted by चंद्रमा on 27 June, 2021 - 13:38

........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)

....... प्रेम म्हणजे काय? प्रेम या शब्दात दडलय तरी काय? सर्वप्रथम प्रेमाला आपण परिभाषित करू "शब्दांनी नव्हे तर भावनांनी व्यक्त करता येईल अशी एक निसर्गदत्त देणगी म्हणजे प्रेम!" 'प्रेम' म्हणजे नुसतेच दोन नजरांच्या मौजेचे क्षण नाही किंवा तारुण्यावस्थेत विरुद्धार्थी देहाबद्दल वाटणारे आकर्षणही नाही तर ते त्याहीपलीकडील अलौकिक, अदृश्य तेज आहे. प्रेम करु म्हटल्याने करता येत नाही किंवा आवरतो म्हटल्याने आवरताही येत नाही.
... मोहाला बळी पडून एकमेकांच्या कमकुवतपणाचे भागीदार होण्यापेक्षा वासनेचा तोल न जाऊ देण्याची दक्षता घेणच खऱ्या प्रेमाला अभिप्रेत असतं! जीवनातल्या सगळ्यात मोठ्या सुखाची प्रचिती हेच की कुणीतरी आपल्यावर जिवापाड प्रेम करतं! आपल्या उणिवा जाणून सुद्धा प्रेम करतं.
........ मुळ मुद्दा बाजुलाच राहिला तर 'खरं प्रेम हे एकदाच होतं का?' मी तर म्हणेल 'नाही' ते पुन्हा पुन्हा होतं! पण ते आपल्याला कधी कळतं कधी नाही! किशोरावस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा एखादी व्यक्ती पाहताक्षणीच आपल्या नजरेत भरते. त्या प्रिय व्यक्तीला पुन्हा-पुन्हा बघावसं वाटतं. असं वाटतं ती 'नजर' नजरेतून कधी सुटावीच नाही.'ती' किंवा 'तो' समोर आला तरी हृदयाची धडधड होते. हृदयाची स्पंदनं वाढायला लागतात. काळजाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. हात-पाय गार पडतात. त्या व्यक्तीचा एक हलकासा स्पर्श जरी झाला तरी अंगावर शहारा येतो. एक रोमांचक अनुभव असतो तो पहिल्या प्रेमाचा! पहिल्या प्रेमाचा अनुभव तर सर्वांसाठी निराळाच! प्रेमामध्ये व्यक्ती तहान-भूक विसरते हे खरे! मी सुद्धा अनुभवले आहे. जेवताना त्या व्यक्तीची साधी आठवण जरी आली तरी पोट भरल्यासारखे वाटते. घास घश्यातच अडकतो. काही सुचेनासं होतं. जीव कावराबावरा होतो.

"तुझ्या कुशीतही आठवतं मला
माझं एकटेपण मागे सोडलेलं!
तेव्हा कितीदा कोणी पाहील म्हणून;
तुझं नाव लिहून खोडलेलं!!

...... काहींच्या नशिबी हे प्रेम असतं पण अनेकांच्या नाहीच! म्हणतात ना 'पहिलं प्रेम' हे 'पहिलं प्रेम' असतं आणि ते जर अपूर्ण राहिलं तर ज्या वेदना मनाला होतात त्याची तुलना आपण आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या दुःखाशी नाही करू शकत! साल १९९९ मध्ये
'कुछ कुछ होता है' बघितला. प्रेमाचा त्रिकोण! या चित्रपटातली 'अंजली' जेव्हा तिच्या पहिल्या प्रेमात अपयशी होते आणि होस्टेलवर येऊन तिच्या मेडला म्हणते 'रुपवती' "मेरा पहला प्यार अधुरा रह गया!मेरा पहला प्यार अधूरा रह गया!" तेव्हा तिच्या अश्रूंचा जो बांध फुटतो आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या काळजातून जे विदारक विरह गीत फुटतं, 'तुझे याद न मेरी आई, किसी से अब क्या कहना!'
ते दृश्य बघूनच डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.प्रेमाचं अपूर्ण मिलन हृदय गहिवरून टाकतं आणि आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावून जातं! कधी-कधी हे प्रेम सफल होतं पण ते आयुष्याचा जोडीदार बनन्याईतपत यशस्वी नाही होत! कधी जातीचे बंधनं तर कधी हलाखीची परिस्थिती तर कधी मान-पान मग काय या हताश प्रेमवीरांच्या हातात तिला निरोप देण्यासाठी भेट ठरलेली असते ती शेवटचीच!
.... निरोपाच्या वेळी तिचे पाणीदार डोळे कसे झळकत होते परततांना उंबरठ्यावर आलेली ती, तिच्या नजरेतले भाव सगळे सूत्र व्यक्त करत होते.
"तू किती लपवत होतीस तुझ्या मेहंदी भरल्या हातांना!
तुला हातही उचलता आला नाही मला निरोप देताना!!"

.... तर एकतर्फी प्रेम करणाऱ्यांचा किस्साच निराळा! 'तो' किंवा 'ती' प्रेम करते पण ते समोरच्याला कळतच नाही. आपण जीव तोडून प्रेम करतो. काळजाचं पाणी करतो पण समोरच्याला कळून सुद्धा वळत नाही मग ते शेवटचं प्रेमपत्र तो तिला अर्पण करतो. "माझ्या प्रस्तावाने तुझे मन नाराज झाले असेल कदाचित माझ्याबद्दलच्या तुझ्या भावनाही जळाल्या असतील. तुला माझ्या अस्तित्वाचा रागही येत असेल पण ते तसेच असू दे. फक्त तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्याचा मला अधिकार असू दे!" मग काय उरतात फक्त आठवणी. आठवणींचे जग.
"तुझ्या नयनांनी माझ्या नयनांना
असं कसा दगा दिला!
डोळ्यात तुझ्या होकार असता;
तुझ्या ओठांनी कसा नकार दिला!!"
खरंच ह्या हाताश, विकल आणि काळजाला चर लावणार्‍या चारोळ्या ऐकल्याना की मन उदास होतं आणि ओठांवर "तडप तडप के इस दील से आह निकलती रही" हे विरहगीत येतं!
आयुष्यात सावरण्याची संधी प्रत्येकालाच मिळते. फक्त त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे त्या व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं! 'पहिलं प्रेम' जरी अपयशी ठरलं तरी 'दिल तो बच्चा है जी' एक खिलौना टूटा तो क्या हुआ दिल बहलाने के लिये दुसरा ढूंढ ही लेते है! मग हळूहळू या प्रेमविरहातून 'तो' किंवा 'ती' बाहेर पडते आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रात ते रमून जातात. पुन्हा नव्याने नक्षत्रांची खेळी भरते आणि हे नभ पुन्हा भरतीला येतात. त्या कोमल, घायाळ हृदयावर पुनश्च स्वातीच्या टपोऱ्या थेंबाचा वर्षाव होतो आणि प्रेमाची स्फुल्लिंगं बाहेर पडतात. पुन्हा हे क्षण नजरेच्या टप्प्यात येतात आणि हा प्रेमाचा संसार पुन्हा फुलून येतो. म्हणतात ना, "एक जखम भरण्यासाठी त्यावर दुसऱ्या प्रेमरूपी नात्यांचा मलम लावावा लागतो" तो हाच की काय कोण जाणे!

प्रेम हे असच असतं कारूण्याची किणार असलेलं,हृदयाला स्पर्शून जाणारं, सांगताविणाच अंतर्मुख करणारं आणि हसता-हसता डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारं!
शेवटी एक फार मर्मसत्य सांगणारा शेर आठवला.

"दीलो की बात करता है जमाना,
पर मोहब्बत आज भी चेहरे से शुरू होती है!!"

(पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रेमाची अनुभूती आपण जर अनुभवली असेल तर मायबोलीकरांनी प्रतिसादाच्या रूपात ती मांडावी ही नम्र विनंती)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Love is a 'Verb'
प्रेम कोणी ही करेना -का अशी फिर्याद खोटी
प्रेम लाभे प्रेमळाला -त्याग ही त्याची कसोटी
.
लेख आवडला. मनातील भावना शब्दात, छान उतरविल्या आहेत.
अनेक वर्षांपूर्वी प्रेमाविषयी एक लेख लिहीलेला होता आठवला तर इथे नाही टाकत पण नवीन धागा काढ्ते.

कुछ कुछ होता है' बघितला. प्रेमाचा त्रिकोण! या चित्रपटातली 'अंजली' जेव्हा तिच्या पहिल्या प्रेमात अपयशी होते आणि होस्टेलवर येऊन तिच्या मेडला म्हणते 'रुपवती' "मेरा पहला प्यार अधुरा रह गया!मेरा पहला प्यार अधूरा रह गया>>>>>>>>>

कुछ कुछ होता है मध्ये ती मेड नसुन हॉस्टेल मेट्रन असते आणि तीचे नाव रुपवती नसुन रिफत बी(मुस्लिम नाव) असते.

हे शीर्षक वाचून ९ पैकी १० जणांना कुछ कुछ होता हैयच आठवत असेल...
मला एक जुना धागा आठवला Happy

एकाच वेळी दोघींच्या प्रेमात .. ?? .. ?? ...
https://www.maayboli.com/node/39444

हाडळीचा आशिक धन्यवाद चूक दुरूस्त केल्याबद्दल!
सामो आपले आभार!
सियोना खरंच "कुछ कुछ होता है पूर्ण पात्रासकट तुम्हाला लक्षात आहे त्याबद्दल कौतुक तुमचं! आणि हा ऋन्मेश जी तुम्ही बरोबर म्हणालात!आपल्या सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद!

धन्यवाद आशू आणि ब्लॅककॅट आपल्या प्रतिसादासाठी!
पण माझी अपेक्षा ही आहे की आपण आपल्या पहिल्या प्रेमाचा अनुभव इथे अधोरेखित करावा.

कूच कूच होता है सिनेमा आला तेव्हा मी गल्लीत गोट्या खेळायचो आणि तो मी अजूनही पाहिलेला नाही. पहिले प्रेम/लफडे झाले तेव्हा मी सोचा ना था आणि नो एंट्री पिच्चर थेटरात पाहिले होते तिच्या बरोबर(आता ती लेकुरवाळी आहे). नंतर हे पहिले प्रेम माझ्या घरी समजल्यावर घरच्यांनी मला बुकलून माझी हाडकं मोकळी केली होती, इतकीच आठवण उरलीये त्या पहिल्या प्रेमाबद्दल Biggrin

तीचे नाव रुपवती नसुन रिफत बी(मुस्लिम नाव) असते.>> अजयकुमार बिष्टच्या फॅन असतील लेखिका. ह.घ्या.

नाही, जे पूर्ण होतं ते खरं प्रेम. पलीकडून योग्य रिस्पॉन्स येत नाही, तोवर खरं प्रेम म्हणजे काय ते कळत नाही. मी स्वतः ज्या आकर्षणाला प्रेम समजत होतो, ते आकर्षण दूर जाऊन नंतर माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात आली. तिच्यासोबत असताना कळलं, खरं प्रेम ते हेच.

कूच कूच होता है सिनेमा आला तेव्हा मी गल्लीत गोट्या खेळायचो
>>>>>>
मी बारावीपर्यंत गल्लीत गोट्या खेळायचो. आमच्याकडे शेरी म्हणायचे त्या गल्लीला. बारावीला मला ड्रॉप होता गोट्या आणि पत्त्यांच्या नादात. पण त्याआधी माझ्या काही गर्लफ्रेंडही झाल्या होत्या. कुछ कुछ होता है चित्रपटही बघून झाला होता. पण थिएटरात नाही तर केबलवर. तेव्हा थिएटरचे फॅड नव्हते ना परवडायचे, किंबहुना केबलवालाच पिक्चर आला रे आला की त्याच शनिवारी रात्री केबलवर झळकवायचा. त्यामुळे थिएटरला पुन्हा बघायला कोण जाणार..

सांगायचा मुद्दा हा की प्रेमाला आणि खेळण्याला वय नसते. अंगात हौस असावी लागते Happy

जे पूर्ण होतं ते खरं प्रेम. पलीकडून योग्य रिस्पॉन्स येत नाही, तोवर खरं प्रेम म्हणजे काय ते कळत नाही.
>>>>>
आपल्या मताचा आदर आहे. पण म्हणजे एकतर्फी प्रेम नसतेच असे म्हणायचे आहे का आपल्याला???
सच मेरे यार है, हा वही प्यार है, जिस के बदले मे, कोई तो हो, जो प्यार दे, वरना बे कार है टाईप्स ???

"खरं प्रेम हे एकदाच होतं का?" >> "खरं" हे विशेषण देऊन प्रेमाची वर्गवारी केलीच आहे तर, "खऱ्या" प्रेमा व्यतिरिक्त अजून कुठल्या प्रकारची प्रेमं असतात याबद्दलही सांगाल का?

म्हणजे विषय नीट कळेल.

पण माझी अपेक्षा ही आहे की आपण आपल्या पहिल्या प्रेमाचा अनुभव इथे अधोरेखित करावा.>> धागाकर्ते या नात्याने आपण जर प्रथम आपले प्रेमानु़भव अधोरेखित केले असते तर जास्त यथोचित ठरले असते आणि बाकीच्यांनाही हुरुप आला असता.
चांगला विषय चर्चेला घेतला आहे तुम्ही.

साधना आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
हो छापले बरे उशिरा पण तो एक हृदयाच्या खोल कप्पा होता.
जिद्दु छान आपल्या निर्भिड शैलीला सलाम!
अजिंक्य आपण आपले अमूल्य मत मांडल्याबद्दल आभार!
आणि ऋन्मेष दादा आपण तर सदाबहार प्रत्येकवेळी आपल्या मिष्कील आणि खट्याळ शैलीने चर्चेत रंगं भरता.

व्वा मानवजी आपल्या प्रश्नाने मला पण विचारात पाडलं खरं, पण माझ्या सुपिक बुद्धित ज्या प्रेमाविषयी कल्पना आहेत त्या मांडतो!
मुख्यतः प्रेमाचे तीन प्रकार
(१) infatuation आकर्षणातून निर्माण झालेले प्रेम

(२)shoe off दिखाव्याचे प्रेम

(३) दिव्य प्रेम म्हणजेच खरे प्रेम

जे प्रेम आकर्षणातून निर्माण होते ते केवळ बाह्य सौंदर्यावर लुब्ध होते पण आंतरीक सौंदर्याच्या अभावामुळे हळूहळू क्षीण होत जाऊन त्याजागी भीती आणि औदासीन्य येते.

दुसऱ्या प्रकारचे प्रेम हे समोरच्याचा रौब, प्रतिष्ठा मानसन्मान जात-पात बघून केले जाते.ते दिखाव्याचे असते. त्यात जोश उत्साह आनंद नसतो ते केवळ सहवासातून निर्माण झाले असते.

'दिव्य प्रेम' म्हणजेच 'खरे प्रेम' ते सहवासातून निर्माण होत नसून विचारांच्या जुळणीतून होते दिव्य प्रेम कोणत्याही नातेसंबंधांपेक्षा श्रेष्ठ आणि सर्व संबंधांना सामावून घेणारे असते.

खरंतर विषय खूप खोल आहे पण शब्दांनाही मोल आहे. खऱ्या प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाल्यास तुम्ही 'सिर्फ तुम' हा चित्रपट बघा ज्यामध्ये संजय कपूर नायीकेला तिचे ट्रेन मध्ये विसरलेले डॉक्युमेंट परत करतो. आपल्याला निस्वार्थ भावनेने केलेली मदत बघून ती त्यांच्यावर निस्सीम प्रेम करते आणि त्याच्या भेटीसाठी केरळला येते त्या दोन जीवांधला धागा हा खऱ्या प्रेमाचा आहे. आंतरिक ओढीचा आहे. सद्भावनेचा आहे!

डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग चा तो काळ होता. माझं ऍडमिशन आधी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ला झालं होत. तेव्हा तिची आणि माझी ओळख झाली 'निकिता', 'निकिता चापले' सडपातळ बांधा, उंच देहयष्टी, लांब सडक केस सावळ्या वर्णाची आणि डाव्या गालातल्या खळीत काळा तीळ असणारी निक्की! मी दोनच महिने इलेक्ट्रिकलला होतो. नंतर मला लास्ट राऊंडला मेकॅनिकल मिळालं.
पण इलेक्ट्रिकल मध्येच माझी मैत्री आणि प्रेम दोन्ही होतं!
भूषी-भूषण हा माझा जिवाभावाचा मित्र!
खाणं-पिणं,खेळणं-बागडणं सर्व काही सोबत मी पहिल्या वर्षात निकी बद्दलचे प्रेम कोणालाही कळू दिले नाही पण दुसऱ्या वर्षाला मनाला हुरहुर लागुन राहीली. मग मी बार मध्ये थोडी झिंगल्यानंतर भूषणला सांगितले की मी निकिता वर खूप प्रेम करतो. तो पण आश्चर्यचकित झाला केव्हापासून? पहिल्याच भेटीपासून! ती मला खुप आवडते.

मग मी एक प्लान केला भूषणने निकीला जाऊन सांगितले की सुहासच्या डायरीत तुझ्याविषयी लिहिले आहे. तिने पण उत्सुकतेने विचारले, काय? "की तू त्याला खूप आवडते!" तिने फक्त मंद स्मित केले पण त्याचे उत्तर तिने काही त्याला दिले नाही मग हळूहळू सेमिस्टर वर सेमिस्टर येत गेले पण लास्ट सेमिस्टरला मला वाटलं आपण स्वतःहून तिला प्रपोज करावं!
मग तो दिवस आला मी, भूषण, निकिता, नेहा चौघे रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो सदरच्या! विषयाचं गांभीर्य ओळखून नेहा आणि भूषण दुसऱ्या टेबलवर जाऊन बसले मी तिला विचारलं की, "तुला जेव्हा माहित झालं तेव्हा तुला धक्का बसला का?" ती म्हणाली, "सुहास तसं काही नाही मला प्रेमाबिमात पडायचं नाही कारण आधीच माझ्या बहिणीचं प्रेम प्रकरण घरच्यांच्या लक्षात आलं त्यामुळे मला खूप भीती वाटते. तुझ्या जागी दुसरा कोणी पण मुलगा असता तरी माझे उत्तर हेच असते!" मी तिला प्रेमाच्या आणाभाका घातल्या पण ती तटस्थ होती तिच्या निर्णयावर! त्यादिवशी डोळे पाणावले! खूप रडलो! आणि मस्त पैकी गम मध्ये दारू प्यायलो!!! पण तिचा विचार डोक्यातून काही जाईना! अभी twist बाकी है मेरे दोस्त!!!!

भुशी बऱ्याचदा दांड्या मारायचा कॉलेजला त्यामुळे त्याचं प्रॅक्टिकल जर्नल निकी कम्प्लीट करून द्यायची त्याचा आणि तिचा रोल नंबर मागे पुढेच होता तो 'भोयर' आणि ती 'चापले' आणि परीक्षेच्या वेळेस हे दोघे एकमेकांना हेल्प करायचे मला पण आधी वाटलं मैत्रीखातर ती हे करत असेल. एक दिवस मदिरालयात बसलो असताना भूषणने निकिताने पाठवलेला मेसेज मला दाखवला "हम तेरी मोहब्बत मे हो गये फना" अशी त्याची शेवटची ओळ होती. याबद्दल भूषीने निकीला विचारले तर ती म्हणाली "चुकून तुला मेसेज गेला"
. पण माझ्या दृष्टीक्षेपात त्या सगळ्या घटना यायला लागल्या की 'निकी' भूषणची एवढी काळजी का घेते. तेव्हा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की 'निकी' भुषीवर प्रेम करते तेव्हाच तिने तो मेसेज त्याला पाठवला. मी त्याला त्या दिवशी याबद्दल सांगितले तर तो जाम भडकला माझ्यावर! "काही पण काय बोलतो सुहास. अरे तू तिच्यावर प्रेम करतो ना!" मी म्हणालो "हो करतो पण ती तुझ्यावर करते ना! मला माझं प्रेम नाही मिळालं तरी ठीक आहे पण तिला तिचे प्रेम मिळू दे!" मी तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेमाची भावना जागृत केली.
येणाऱ्या 9 ऑक्टोबरला भुशीचा वाढदिवस होता त्याच दिवशी मी त्याला निकीला प्रपोज करायला सांगितले आणि हो त्याने ते केले. त्याच्या प्रस्तावाने ती गप्प होती पण काही दिवसानंतर तिने accept केले पण तिने भूषणला एक प्रश्न विचारला, "सुहास काय विचार करेल?" तेव्हा भूषण म्हणाला, "त्यानेच तर मला तुला प्रपोज करायला सांगितले." या शब्दांनी तिला आश्चर्याचा धक्काच दिला.
जेव्हापर्यंत कॉलेजमध्ये होतो ती मला अधून-मधून भेटायची! चेहऱ्यावर एक हलकेसे हसू असायचे पण आता ती 'भुशी' ची 'निकी' होती त्यामुळे मी तिला त्याच भावनेने बघायचो!

"मोहब्बत वो नहीं
जो सब कर बैठे हैं!
मोहब्बत वो है;
जो यार के खातिर कुर्बान कर बैठे!!"

अरे भावा, तिचे तुझ्यवर प्रेम कधिच नव्ह्ते. तु कसली कुर्बानि द्यायला निघालाय..

तुला जे कारण सान्गितले तेच् भूषणला सान्गितले अस्ते तर ते कारण खरे मानता आले असते.. तिने उगिच काहीतरी सान्गुन तुला कटवले.

कदाचित ते खरे असेलही साधना! पण मी भूषणला नाही म्हणालो असतो तर त्याने तिला कधीच प्रपोज केला नसता.माझ्यावर नाही पण तिला तिचे प्रेम मिळवून देण्याचा कठीण प्रयत्न मी केला आणि तो सपशेल यशस्वी झाला.
त्यांचे प्रेम हे माझ्याच प्रयत्नांचे फळ होते.त्यालाच मी कुर्बाणीचे नाव दिले आहे.
मला माहीत होतं ती माझ्यावर प्रेम करत नव्हती पण ती भूषणलाही सहजासहजी स्विकारायला तयार नव्हती कारण त्याने प्रपोज केल्यानंतर बरेच दिवस निकीने विचार केला आणि तेव्हाच तीने तो प्रश्न केला "सुहासला काय वाटेल?".एक soft corner होता माझ्याविषयी तिच्या हृदयात.ती नंतरही माझ्यासोबत तशीच बोलायची जशी आधी.पण मी दोघांमधला एक दुवा ठरलो एवढच!

वाह चंद्रमाजी..
तुम्ही डर किंवा देवदास पीक्चरमधला शारुक न बनता हम दिल दे चुके सनम मधला अजय देवगण बनुन दोन जीवांची भेट घडवुन आणलीत.

तरुण मुली जशा शू शू शू असे आवाज काढून विचित्र हातवारे करत पाल झटकतात तसेच हातवारे करून एखाद्या मुलाला झटकले की त्याला Shoe off म्हणत असावेत. एकतर्फी प्रेमाचाच हा एक प्रकार.

Pages