ट्रान्सजेंडरइंडियाडॉटकॉम

Submitted by स्वेन on 27 June, 2021 - 06:20

सोशल मीडिया हा आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून समाजातील कुठल्याही घटकासंदर्भात बदल घडवून आणण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडिया म्हणून अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो आहे आणि अशा समुदायातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागले आहेत. समाजाकडून त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्या अशा व्यक्त होण्यामुळे आपल्यालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.

पण इतर माध्यमांचा विचार केला तर किती वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स, वेबसाइट्समध्ये या समुदायासंदर्भातील प्रश्नांना महत्व दिलं जातं? बरीच माध्यमे या विषयाला हात घालत नाहीत. काहीतरी वेगळे घडलं, नवीन समोर आलं तरच त्यांच्यासंबंधित माहिती समोर येते. या सगळ्यांचा विचार करून माध्यमांमध्ये आपली एखादी स्पेस तयार करण्याच्या विचारातून एक वेबसाइट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, जी ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांचे प्रतिनिधित्व करेल आणि या प्रयत्नातून तयार झाली ट्रान्सजेंडर इंडिया डॉट कॉम. नावातूनच याचं वेगळेपण लक्षात येतं, किंवा विषय काय असेल याचा अंदाज येतो. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू आहे.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून किंवा शिकवून घडवला जात नाही. पण तरीही ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे पाहताना समाजाची नजर वेगळी असते. त्यात एक शंका असते. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्ती समाजात वावरताना त्यांना काही मर्यादा येतात. समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. या भीतीमुळे ट्रान्स समुदायातील लोक स्वतःला उघडपणे व्यक्त करत नाहीत. तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. या व्यक्तींना बऱ्याचदा कुटुंबाची साथ नसते आणि समाजाची तर नसतेच. मग आपल्यात होणारे बदल काय आहेत? हे काही चुकीचे आहे का? काय करावं? असे अनेक प्रश्न त्यांनाही असतात. अशा वेळी त्यांना गरज असते मार्गदर्शनाची...मार्गदर्शकाची.
अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एक माध्यम असणं आवश्यक आहे, जे सामाजिक मान्यता आणि रूढीवादी सिद्धांतांपलीकडे जाऊन त्यांना मदत करू शकेल. अशांच्याच मदतीसाठी 'ट्रान्सजेंडर इंडिया' या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली. 'ट्रान्सजेंडर इंडिया ही भारताची पहिली ट्रान्स वेबसाइट आहे. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू . ट्रान्स महिला "नेसारा राय" यांनी ती तयार केली आहे. नेसारा ॲमस्टरडॅम येथे राहतात आणि ट्रान्सॲमस्टरडॅमच्या त्या आजीवन प्रतिनिधी आहेत.

मार्च २०२o मध्ये वॉशिंग्टन इथल्या जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या हॉल ऑफ नेशन्स मध्ये नेसारा यांचा भारताची पहिली ट्रान्स महिला म्हणून सहभाग होता. तिथल्या प्रदर्शनात नेसाराने चितारलेली पेंटिंग्ज ठेवलेली होती. या कार्यक्रमाची थीम होती : Vital Voices-100 Women using their Power to Empower. या कार्यक्रमात, इतर अनेक प्रतिष्ठित महिलांसमवेत, सेरेना विल्यम्स, ग्रेटा थनबर्ग, मलाला युसुफजाई यांचा ही सहभाग होता.

ट्रान्स जेंडर व्यक्तींचे होणारे शोषण थांबविणे आणि त्यांच्या हक्कांची माहिती करून देणे या साठी ही वेबसाईट बनवली असल्याचे नेसारा यांनी म्हंटले आहे. लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था यांना सविस्तर माहिती मिळावी, जेंडर आयडेंटिटी काय असते, ट्रान्सजेंडर कायदा २०२० काय आहे, लिंगबदल शस्त्रक्रिया कशी करतात, त्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया काय असते, ट्रान्स जेंडर पर्सन प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, एखादा फॉर्म भरताना मेल फिमेल असे दोनच पर्याय असतील तर काय करावे, ट्रान्स जेंडर व्यक्तींने पासपोर्ट कसा मिळवावा, समाजात वावरताना काय काळजी घ्यावी, या समाजातील उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्ती, अनेक शहरात त्यांची असणारी मंडळे, अशी सर्व उपयुक्त माहिती या वेब साईटवर मिळते.

सामान्य व्यक्तींना प्रश्न पडतो की या समुदायात कोण असतील अशा प्रतिष्ठित व्यक्ती? अशा प्रतिष्ठित किंवा शिकलेल्या व्यक्तींशी आपले रोजचे संबंध येत नसतात त्यामुळे हे कुठे आहेत आणि काय करतात याची माहिती सहज उपलब्ध होत नाही. तृतीयपंथीयांसाठी होत असलेल्या सामाजिक चळवळी, त्यांचें आणि सामान्य जनाचे प्रबोधन यामुळे बदल घडत आहेत. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आता बराच बदलला आहे. अशाच प्रबोधनातून पोलीस उपनिरीक्षक बनल्या के. प्रीतिका यशिनी. या पदासाठी गरजेचा असलेला पोलीस अकादमीचा अभ्यासक्रम प्रीतीकाने पूर्ण केला. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यात त्या सफल झाल्या आणि तमिळनाडू मधील धर्मपुरी जिल्ह्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाली.

सत्यश्री शर्मिला या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील आहेत. त्यांनी तमिळनाडू आणि पॉंडेचेरी बार कॉन्सिलमध्ये नोंदणी करत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील होण्याचा मान मिळवला आहे.

प. बंगाल‌मध्ये उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात‌ जोईता मंडल या तृतीयपंथी न्यायाधिश आहेत. यांचा प्रवास भीक मागण्यापासून ते थेट न्यायाधीश असा झालेला आहे. एकेकाळी ज्या भागात भीक मागितली होती त्याच भागातल्या कोर्टात आज त्या ‘ जज् ’ आहेत.

नताशा विश्वास हिने भारतातील पहिली ट्रान्स ब्युटी क्वीन स्पर्धा जिंकली आहे.

मुंबईच्या आयआयपीएम मधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या नावाजलेल्या भरत नाट्यम नृत्यांगना आहेत. २०१६ सालच्या उज्जैन इथे झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचे पहिले महा मंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली.

प. बंगाल मधल्या एका कॉलेज मध्ये डॉ. मानबी बंदोपाध्याय या पहिल्या ट्रान्स प्रिन्सिपॉल आहेत. पद्मिनी प्रकाश ह्या तमिळनाडू मधील लोटस चॅनेल वर वृत्त निवेदिका आहेत. बारा भाषेंवर प्रभुत्व असलेल्या शबनम बानो या मध्य प्रदेश विधानसभेत १९९८ ते २००३ या काळात आमदार होत्या.

नेसारा यांच्या म्हणण्यानुसार, ट्रान्सजेंडर इंडिया ही वेबसाइट ट्रान्स व्यक्तींसाठी एक कुटुंब आहे. त्यामुळे समाजातील ट्रान्स समुदायाबद्दल बोलण्याचा आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलता वाढवण्यासाठी या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून सरकार आणि धोरण- निर्मात्यांचे लक्ष या समुदायाच्या वास्तविक समस्यांकडे आणले जात आहे. नेसारा यांच्या या प्रयत्नांमुळे ट्रान्स लोकांसाठी निश्चितच नवीन आशा निर्माण झाली आहे असं म्हणता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

Since the 1990s, transsexual has generally been used to refer to the subset of transgender people[4][42][43] who desire to transition permanently to the gender with which they identify and who seek medical assistance (for example, sex reassignment surgery) with this.
क्ष ला पुरुषाचं शरीर मिळालं आहे. त्याची समाजात ओळखही पुरुष म्हणूनच आहे. पण क्ष ला वाटतं की ती स्त्री आहे. आपल्या शरीरात वैद्यकीय उपचारांनी बदल करून क्षला स्त्री व्हायचं आहे.
य ला स्त्रीचं शरीर मिळालं आहे. त्याची समाजात ओळखही स्त्री अशीच आहे. पण य ला वाटतंय की तो पुरुष आहे. आपल्या शरीरात वैद्यकीय उपचारांनी बदल करून त्याला पुरुष व्हायचं आहे.

क्ष आणि य हे ट्रान्ससेक्स्युअल आहेत. त्यांना कोणा विषयी लैंगिक आकर्षण वाटतं हा भाग वेगळा. शरीराने स्त्री आणि मनाने पुरुष असून कुणाला स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण असू शकेल किंवा पुरुषाबद्दल. किंवा दोहोंबद्दल.

ट्रान्सजेंडर, जेंडर आयडेंटिटी या संज्ञांचा नेमका अर्थ समजावून सांगणारा हा लेख.
https://www.maayboli.com/node/68774

ट्रान्सजेंडरबद्दलच्या विकीपेजवरची माहितीही नेमकी वाटली.
https://en.wikipedia.org/wiki/Transgender#Transsexual
https://en.wikipedia.org/wiki/Gender_identity

https://transequality.org/issues/resources/frequently-asked-questions-ab...

थोराड अंगाचे पुरूष स्त्रीवेषात हे एरव्हीही बघवत नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमावर त्यामुळेच टीका होते. ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी. >>>> हा माझा पहिला प्रतिसाद होता. उगीच काहीतरी विद्वत्ता पाजळण्याच्या नादात अव्यवहार्य लिहीत सुटलेल्यांनी साडी नेसायला काय हरकत आहे ? जर दोष पाहणा-यांच्या नजरेचा आहे तर तुम्हाला त्याची फिकीर नसायला हवी. अशा रॅशनॅलिस्ट पुरूषांनी साडी चोळीचा पोषाख करून सर्रास वावरायला काय हरकत आहे ? उत्तर भारत सोडा, पुरोगामी महाराष्ट्र आणि दक्षिणेत सुद्धा काय नजरेने पाहतील ?

साडी किंवा स्त्रैण वस्त्रे ही स्त्री ला चांगली दिसतात. काही थोराड स्त्रियाही पाहण्यात आहेत. या पूर्ण स्त्रिया आहेत पण उंची सहा फूट आणि आडदांड शरीरयष्टी मुळे त्यांना साडी शोभत नाही. हा आपल्या सवयीचा भाग आहे.

हिजडा किंवा किन्नर म्हणजे काय या बद्दल माझ्या मनात गोंधळ आहे आणि तो दूर करण्यासाठी मेहनत घेण्याचीही तयारी नाही. मला या लोकांबद्दल राग नाही पण घृणा , भीती आहे. उगीच गुगलवरून माहिती शोधताना नजरेला काही बाही पडू नये म्हणून त्या वाटेला जातच नाही. अंधश्रद्धा पण आहे आणि त्यापोटीची भीती पण आहे.

पण काही किन्नर दिसायला सुंदर आणि स्त्रीसारखे दिसायला असतात. त्यांनी स्त्रैण वस्त्रे परिधान केली तर नजरेला खटकणार नाही हा व्यवहार्य मुद्दा आहे. पुरूषासारखा थोराड चेहरा आणि अंगयष्टी असलेल्यांनी साड्या नेसणे यामुळे ते वेगळे वाटू लागतात. यात चुकीचे काय आहे ? तुम्ही कोणाकोणाला समजत फिरणार आहात ?

पुरूषासारख्या चेह-याच्या किन्नराने यशस्वीरित्या वावरता यावे यासाठी आपल्या पेहराव विचारपूर्वक निवडावा. त्याला कुणी सक्ती केली नाही. राजस्थानी मारवाडी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा फोटो लावून व्यवसाय करतात. समाजात मिसळायचे तर ती कला आत्मसात केलीच पाहीजे. आपल्याला आवडते म्हणून त्या लिंगाची वस्त्रे नेसून समाजात मिसळताना अडचणी येणारच की. दोन्हीकडून ओरडून कसे चालेल ?

किन्नर म्हणजे काय हे माहीत नसल्याने या धाग्यापासून दूरच राहतो आहे. माझा मुद्दा फक्त समाजात राहून यशस्वी होण्यासाठी काय करता येईल इतकाच आहे. आपण विचित्र वाटू नये याची दक्षता ज्याची त्याने घ्यावी. एखाद्या पुरूषाने साडी नेसणे हा माझा संविधानाने दिलेला हक्क आहे म्हणून अट्टाहासाने मुद्दा सिद्ध करायला साडी नेसायला सुरूवात केली तर त्याच्याबद्दल लोक जो समज करून घेतील तो कोणत्या रॅशनॅलिस्टाला जाऊन सांगणार ? शिष्टसंमत वागणूक शहाणपणाची असते. तसे न वागण्याचे स्वातंत्र आहेच की. पण त्याला शहाणपण म्हणतात का ?

लिंग बदललेले हा विषयच वेगळा आहे. पण जन्मतः:च लिंगाच्या बाबत दोष उत्पन्न झालेले किन्नर इतकेच अभिप्रेत आहे. यात जन्माने स्त्री पण धारणा पुरूषाच्या आणि जन्माने पुरूष पण धारणा स्त्री च्या हा ही वेगळा प्रकार वाटतो.

ऐकीव माहितीप्रमाणे बाह्य आकार व रूप स्त्री चा पण लिंग पुरूषाचे आणि बाह्य आकार व रूप पुरूषाचा पण लिंग स्त्रीचे असे जे काही लोक आहेत (पारंपारीक किन्नर) त्यांच्याबद्दलच इथे बहुतेक लोक बोलत असावेत. यांचे लिंगच ठरवता येत नसल्याने लैंगिक ओळख (मानसिक) हा मुद्दाच उपस्थित होत नाही. त्यांना तिसरे लिंग हीच ओळख राहते. त्यांचे लैंगिक आकर्षण किंवा ते स्वतःला कोणत्या लिंगाचे समजतात हा आणखी किचकट प्रश्न आहे.

छत्तीसगढ आणि ओरिसा सरकारने ट्रान्सजेंडर्सची पोलिस खात्यात भरती करण्याचे पाऊल उचलले आहे.
केरळमध्ये कोची मेट्रोमध्येही असा प्रयोग केला गेला होता. पण कंत्राटी नोकर्‍या, कमी पगार, राहण्याची सोय न होणे यामुळे बरेचसे ट्रान्सजेंडर्स त्या नोकर्‍या सोडून गेले.

काही राज्यांनी ट्रान्सजेंडर साठी नोकर्‍यांमध्ये आरक्षण सुरू केले आहे.

लिम्का द्यायची सवय वाईट. गुगल सगळ्यांच्याच इंटरनेटमधे असतं. आपल्याला काय म्हणायचंय ते दोन चार वाक्यात मांडता आलं पाहीजे. ही घ्या लिंक आणि घाला काशी हे वयाच्या एका टप्प्यानंतर थांबवले पाहीजे.

सहजराव तुमच्या मताशी सहमत.
लिंक देवून दुसऱ्याच्या मताचा काय आधार घ्यायचा .
आपण समाजात राहतो आपली पण स्वतः ची मत असावीत आणि तीच मांडली जावीत.

हेमंत, लिंकामध्ये मते नाहीत. माहिती आहे. फॅक्ट्स आहेत. संज्ञाचे अर्थ आहेत.

या गोष्टींतला फरक तुम्हांला समजत नसेल तर राहू द्या.

लिंक देताना वर दोन चार ओळी स्वतःच्या लिहाव्यात. या लिंका गुगलवर हजारोने असतात. धागा सुरू झाल्यावर बरेच जण सर्च देत असतात. सगळेच अब्राहम लिंकन होत नाहीत. कशासाठी ओपन करायची हे सुद्धा समजत नाही लिंक.
जे आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लिंक देतात त्यांना सोशल मीडीयातल्या चर्चांचा अर्थ समजला. अब्राहम लिंकन म्हणजे मास्तरने आज पान क्र. ५५ ते १२९ वाचून या, त्यावर परीक्षा घेणार आहे असे म्हणणे झाले.
आपल्या चुका झालेल्या कुणी दाखवल्या कि पिसाळणा-या जमातीने जास्त मनावर घेऊ नये. मी बोलणार नाही हे गाणे म्हणावे. Lol

अरेरे, फक्त लिंक देण्याआधी स्वतःची दोन वाक्यं लिहावीत असा मुद्दा मांडल्याने एक आयडी पिसाळला आहे. लोकांचे जुने धागे उकरत सुटला आहे.

तो जो आयडू आहे तो डूख धरून व्यत्यय आणि फिल्मी या नावाने हलकटपणा करतो. स्वॅन या नावाने किन्नरांवर लिहीतो आणि इतर काही आयड्यांनी ( उदा. बाख, बिथोवन इत्यादी) लैंगिक विषयांवर लिहीत सुटतो.
मूळ मुद्दा हाच होता की लिंका देत सुटू नये.
आणि जर हे म्हणणे पटले नाही तर मी बोलणार नाही म्हणून भोकाड पसरता येतेच की.
पण नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे हा आयडी बिथरून अनेक जुने धागे उकरून काढत बसला आहे. आज दिवसभर याला कुणी डिस्टार्ब करू नये. याचे दोन आयडी आज बाद झाले आहेत. बाकीचे वेळ मिळाला की करूच की Lol

आली अंगावर तर घेतली शिंगावर असे भल्या भल्यांनी म्हटले आहे.

या आयडीचा खूप मोठा रहस्यभेद होणार आहे लवकरच. जर जातीचा निर्लज्ज असेल तरच सोशल मीडीयात राहील हा.

सर्जरी करून स्वतःला हवे ते जेंडर हवे आहे , पण अजून असे न करता जे तसेच रहातात , ते अदनान सामीगत असतात

म्हणजे रहातात भारतात , पण अजून नागरिकत्व घेतले नाही , कितीही सामावून घेतले तरी कागदावर नागरिकत्व जुनेच राहील ना ? जेंव्हा त्याला नागरिकत्व भारतीय मिळेल तेंव्हा त्या कॉलममधला ऑप्शन बदलेल . तशी ह्यांची सर्जरी होऊन हवे ते जेंडर मिळाले की मग त्यांचा जेंडरक्लास चेंज होईल. तोवर त्रिशंकूच रहाणार

काही देशांमध्ये स्वतः:चं जेंडर स्वतः:ला हवं ते declare करायचं स्वातंत्र्य आहे. कोणत्याही medical interference शिवाय.
भारतातही district magistrate कडे अर्ज करून स्वतः:चं किंवा पाल्याचे जेंडर declare करता येतं.
Self-identification, or ‘self-id’, is the concept that a person should be allowed to legally identify with the gender of their choice by simply declaring so, and without facing any medical tests.
भारतात काही ठिकाणी फॉर्ममध्ये तिसरं जेंडर निवडायचा पर्याय आला आहे.
२०११ जनगणनेत ट्रान्स लोकांची प्रथमच वेगळी नोंद झाली. पण त्यातला आकडा हा प्रत्यक्षापेक्षा खूप कमी असावा.

प्रत्येक ट्रान्स व्यक्ती सर्जरी करून जेंडर बदलण्याची इच्छा ठेवील असे नाही. त्यांना जन्मवेळी नोंदवलेल जेंडर बदलून जे वाटतंय ते जे़ंडर लावता यायला हवं.

लिंक न देता चार ओळी देण्याचं महत्व पटण्यासाठी संशयग्रस्त होऊन पाच सहा आयडींचे (डिलीट झालेल्या) जुने धागे उकरून त्यावर प्रतिसाद देऊन आपला कंड शमवून घ्यायला लागणे हे कशाचे लक्षण असावे ?
नुसत्या लिंका देऊ नये हे म्हणणे इग्नोर सुद्धा करता आले असते की Lol

Self-identification, or ‘self-id’, is the concept that a person should be allowed to legally identify with the gender of their choice by simply declaring so, and without facing any medical tests. >>>
हे मान्य आहे.
पण TG ना जर काही सवलती, आरक्षण वगैरे सुविधा दिल्या तर मग फक्त सेल्फ डिक्लेअरेशन चालणार नाही, सरकारी प्रमाणपत्र हवे, मग त्यासाठी टेस्ट्स वगैरे येईल.
)

प्रत्येक ट्रान्स व्यक्ती सर्जरी करून जेंडर बदलण्याची इच्छा ठेवील असे नाही. त्यांना जन्मवेळी नोंदवलेल जेंडर बदलून जे वाटतंय ते जे़ंडर लावता यायला हवं.

अगदी खरे , पण हे त्यांना फक्त मानसिक समाधान देईल , जोवर सर्जरीच करत नाही , तोवर त्या लिंगी असण्याचे पूर्ण सुख , स्वातंत्रय व इतर काही कायदेशीर हक्क मिळणार नाहीत

Not necessarily. सुख ही फार वैयक्तिक संकल्पना आहे. व्यक्तिसापेक्ष बदलते.
स्वातंत्र्य, हक्क काही ठिकाणी मिळतात. त्यासाठी लढा चालू आहे.
काहींना थर्ड जेंडर, agender, transqueer म्हणून राहायचं असू शकतं.

हे सगळं" हे किंवा ते" असं binary नाही.
स्वाती आंबोळेंची लेखमाला वाचली तर समजू शकेल.

वरच्या transequality faq मध्ये ही खूप छान मांडलाय.

Proud

हा युक्तिवाद फसवा आहे

तुझे सुख तू मानसिक पातळीवर भोगू शकतोस , तर मग मला बाकीचे लोक मला अमुक तमुक समजत नाहीत , मला वेगळे टॉयलेट नाही , मला आरक्षण नाही , हे रडगाणे कशाला हवे ? उद्या एखादा पुरुष मानसिक स्त्री आहे ह्याचे सर्टीफिकेट दाखवून महिला क्रिकेट टीम मध्ये जाईल , पुरुष पोलिटीशन महिला राखीव जागात अर्ज करतील .

उद्या मी जाहीर केले की मी मानसिक पातळीवर ग्रीन कार्ड होल्डर आहे , मग अमेरिका मला नागरिकत्व देणार का ?

ह्या निमित्ताने , creatinine clearance काढताना टिजीला मेल धरावे की फिमेल , हे विचारून झाले , अजून कुणाला उत्तर सुचले नाही , सगळ्या app मध्ये दोनच ऑप्शन आहेत.

आणि अजून एक माहिती मिळाली , हॉस्पिटलमध्ये टीजी लोकांना फिमेल वॉर्ड दिला जात नाही , कम्पलसरी मेल वॉर्डच दिला जातो.

सुख हा शब्द तुम्ही "तोवर त्या लिंगी असण्याचे पूर्ण सुख" या साठी वापरलाय. याच्याच प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असू शकतात. तो लैंगिकतेचा भाग झाला.
लिंगभा आनि लैंगिकता या गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत. पण क्ष आहे म्हणून य असेलच असं नाही. हा एक स्प्टेक्ट्रम आहे. यात अ किंवा
ब असे दोनच पर्याय नसतात हे आता मान्य झालेलं आहे.

असो. पुन्हा पुन्हा तेच तेच लिहिण्यात अर्थ नाही.

ज्यांना जस्या भावना निर्माण होतात तसे त्यांनी
राहवे काही कोणाला अडचण नाही.
पण बाकी लोकांनी त्यांना स्वतःचे विचार बाजूला ठेवून स्वीकारावे, ही अपेक्षा गैर आहे.
दुसऱ्यांनी का आपली मत बदलावी .
त्यांना सरकार नी बाकी नागरिकांना ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा त्यांना पण द्याव्यात काही अडचण नाही.
पण आरक्षण ठेवावे, हे गैर आहे.
आर्थिक स्थिती वरून च फक्त आरक्षण असावे बाकी सर्व आरक्षण बंद करायची वेळ आली आहे.

माझी इथली वेळ संपली असे म्हणून कपडे बदलून विनाव्यत्यय फिरणा-या शेअर मार्केटच्या साहेबांनी काल खूप गोंधळ घातला. त्यांना पृथ्वी ग्रहावरच्या फिल्मी मानवाने रनर म्हणून धावा काढायला साथ दिली आहे अध्यक्षमहोदय.

Pages