ट्रान्सजेंडरइंडियाडॉटकॉम

Submitted by स्वेन on 27 June, 2021 - 06:20

सोशल मीडिया हा आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून समाजातील कुठल्याही घटकासंदर्भात बदल घडवून आणण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडिया म्हणून अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो आहे आणि अशा समुदायातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागले आहेत. समाजाकडून त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्या अशा व्यक्त होण्यामुळे आपल्यालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.

पण इतर माध्यमांचा विचार केला तर किती वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स, वेबसाइट्समध्ये या समुदायासंदर्भातील प्रश्नांना महत्व दिलं जातं? बरीच माध्यमे या विषयाला हात घालत नाहीत. काहीतरी वेगळे घडलं, नवीन समोर आलं तरच त्यांच्यासंबंधित माहिती समोर येते. या सगळ्यांचा विचार करून माध्यमांमध्ये आपली एखादी स्पेस तयार करण्याच्या विचारातून एक वेबसाइट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, जी ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांचे प्रतिनिधित्व करेल आणि या प्रयत्नातून तयार झाली ट्रान्सजेंडर इंडिया डॉट कॉम. नावातूनच याचं वेगळेपण लक्षात येतं, किंवा विषय काय असेल याचा अंदाज येतो. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू आहे.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून किंवा शिकवून घडवला जात नाही. पण तरीही ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे पाहताना समाजाची नजर वेगळी असते. त्यात एक शंका असते. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्ती समाजात वावरताना त्यांना काही मर्यादा येतात. समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. या भीतीमुळे ट्रान्स समुदायातील लोक स्वतःला उघडपणे व्यक्त करत नाहीत. तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. या व्यक्तींना बऱ्याचदा कुटुंबाची साथ नसते आणि समाजाची तर नसतेच. मग आपल्यात होणारे बदल काय आहेत? हे काही चुकीचे आहे का? काय करावं? असे अनेक प्रश्न त्यांनाही असतात. अशा वेळी त्यांना गरज असते मार्गदर्शनाची...मार्गदर्शकाची.
अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एक माध्यम असणं आवश्यक आहे, जे सामाजिक मान्यता आणि रूढीवादी सिद्धांतांपलीकडे जाऊन त्यांना मदत करू शकेल. अशांच्याच मदतीसाठी 'ट्रान्सजेंडर इंडिया' या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली. 'ट्रान्सजेंडर इंडिया ही भारताची पहिली ट्रान्स वेबसाइट आहे. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू . ट्रान्स महिला "नेसारा राय" यांनी ती तयार केली आहे. नेसारा ॲमस्टरडॅम येथे राहतात आणि ट्रान्सॲमस्टरडॅमच्या त्या आजीवन प्रतिनिधी आहेत.

मार्च २०२o मध्ये वॉशिंग्टन इथल्या जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या हॉल ऑफ नेशन्स मध्ये नेसारा यांचा भारताची पहिली ट्रान्स महिला म्हणून सहभाग होता. तिथल्या प्रदर्शनात नेसाराने चितारलेली पेंटिंग्ज ठेवलेली होती. या कार्यक्रमाची थीम होती : Vital Voices-100 Women using their Power to Empower. या कार्यक्रमात, इतर अनेक प्रतिष्ठित महिलांसमवेत, सेरेना विल्यम्स, ग्रेटा थनबर्ग, मलाला युसुफजाई यांचा ही सहभाग होता.

ट्रान्स जेंडर व्यक्तींचे होणारे शोषण थांबविणे आणि त्यांच्या हक्कांची माहिती करून देणे या साठी ही वेबसाईट बनवली असल्याचे नेसारा यांनी म्हंटले आहे. लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था यांना सविस्तर माहिती मिळावी, जेंडर आयडेंटिटी काय असते, ट्रान्सजेंडर कायदा २०२० काय आहे, लिंगबदल शस्त्रक्रिया कशी करतात, त्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया काय असते, ट्रान्स जेंडर पर्सन प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, एखादा फॉर्म भरताना मेल फिमेल असे दोनच पर्याय असतील तर काय करावे, ट्रान्स जेंडर व्यक्तींने पासपोर्ट कसा मिळवावा, समाजात वावरताना काय काळजी घ्यावी, या समाजातील उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्ती, अनेक शहरात त्यांची असणारी मंडळे, अशी सर्व उपयुक्त माहिती या वेब साईटवर मिळते.

सामान्य व्यक्तींना प्रश्न पडतो की या समुदायात कोण असतील अशा प्रतिष्ठित व्यक्ती? अशा प्रतिष्ठित किंवा शिकलेल्या व्यक्तींशी आपले रोजचे संबंध येत नसतात त्यामुळे हे कुठे आहेत आणि काय करतात याची माहिती सहज उपलब्ध होत नाही. तृतीयपंथीयांसाठी होत असलेल्या सामाजिक चळवळी, त्यांचें आणि सामान्य जनाचे प्रबोधन यामुळे बदल घडत आहेत. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आता बराच बदलला आहे. अशाच प्रबोधनातून पोलीस उपनिरीक्षक बनल्या के. प्रीतिका यशिनी. या पदासाठी गरजेचा असलेला पोलीस अकादमीचा अभ्यासक्रम प्रीतीकाने पूर्ण केला. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यात त्या सफल झाल्या आणि तमिळनाडू मधील धर्मपुरी जिल्ह्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाली.

सत्यश्री शर्मिला या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील आहेत. त्यांनी तमिळनाडू आणि पॉंडेचेरी बार कॉन्सिलमध्ये नोंदणी करत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील होण्याचा मान मिळवला आहे.

प. बंगाल‌मध्ये उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात‌ जोईता मंडल या तृतीयपंथी न्यायाधिश आहेत. यांचा प्रवास भीक मागण्यापासून ते थेट न्यायाधीश असा झालेला आहे. एकेकाळी ज्या भागात भीक मागितली होती त्याच भागातल्या कोर्टात आज त्या ‘ जज् ’ आहेत.

नताशा विश्वास हिने भारतातील पहिली ट्रान्स ब्युटी क्वीन स्पर्धा जिंकली आहे.

मुंबईच्या आयआयपीएम मधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या नावाजलेल्या भरत नाट्यम नृत्यांगना आहेत. २०१६ सालच्या उज्जैन इथे झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचे पहिले महा मंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली.

प. बंगाल मधल्या एका कॉलेज मध्ये डॉ. मानबी बंदोपाध्याय या पहिल्या ट्रान्स प्रिन्सिपॉल आहेत. पद्मिनी प्रकाश ह्या तमिळनाडू मधील लोटस चॅनेल वर वृत्त निवेदिका आहेत. बारा भाषेंवर प्रभुत्व असलेल्या शबनम बानो या मध्य प्रदेश विधानसभेत १९९८ ते २००३ या काळात आमदार होत्या.

नेसारा यांच्या म्हणण्यानुसार, ट्रान्सजेंडर इंडिया ही वेबसाइट ट्रान्स व्यक्तींसाठी एक कुटुंब आहे. त्यामुळे समाजातील ट्रान्स समुदायाबद्दल बोलण्याचा आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलता वाढवण्यासाठी या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून सरकार आणि धोरण- निर्मात्यांचे लक्ष या समुदायाच्या वास्तविक समस्यांकडे आणले जात आहे. नेसारा यांच्या या प्रयत्नांमुळे ट्रान्स लोकांसाठी निश्चितच नवीन आशा निर्माण झाली आहे असं म्हणता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

दुसरा अनुभव लिहिणे उचित वाटत नाही. कारण नाव लपवले तरी काही संदर्भ द्यावे लागतील. >>> आजपर्यंतच्या लिखाणाचे पोलीस व्हेरीफिकेशन झाले होते का मायबोलीवर ? Wink

ब्लॅक कॅट, सेक्स्युअलिटी आणि जेंडर आयडेंटिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लैंगिकता आणि लिंगभाव. ट्रान्सजेंडर हा प्रथम जेंडर आयडेंटिटीचा मुद्दा आहे. सेक्स्युअलिटीचा नाही.

आजपर्यंतच्या लिखाणाचे पोलीस व्हेरीफिकेशन झाले होते का मायबोलीवर ?>> त्याला मी घाबरत नाही. मी तत्वांबद्दल बोलत होतो. अश्या एखाद्या ओळखीच्याची अशी ओळख उघड होण्याची पुसटशी शंका आली तरी ते लिखाण टाळावे असे वाटते.

ऋन्मेष, अशा ठिकाणी (म्हणजे ओळखीच्या व्यक्तींच्या संदर्भात लिखाण येणार असेल) अबक किंवा क्ष असं नाव वापरले, स्थळ-काळ यांच्या बाबतीत पण वेगळ्या ठिकाणचा अन वेगळ्या वेळेचा संदर्भ दिला तर कुणाला काही समजणार नाही असं मला वाटतं (याही उपर संबंधीत व्यक्ती माबो वर येऊन लेख वाचण्याची शक्यता खूप कमी.... आणि तीही टाळायची असेल तर ठळक अक्षरात डिस्क्लेमर टाकला की काम तमाम..! है कै अन नै कै Bw )

मानव
फक्त छान लेख म्हणून चालणार नाही
एका तरी transgender ला सन्मान ध्या .त्याला मित्र बनवा,सर्व कार्यक्रम,सहली,ह्या मध्ये त्याला सहभागी करा .
आणि सन्मान मिळवून ध्या.
फक्त मस्त लेख बोलून काही होत नाही.

एका तरी transgender ला सन्मान ध्या .त्याला मित्र बनवा,सर्व कार्यक्रम,सहली,ह्या मध्ये त्याला सहभागी करा .>> परंतू अशा व्यक्तिंची संख्या असुन असुन किती असणार...? कमीच संख्या असेल असं मला वाटतं. जर खरेच सम्ख्या कमी असेल तर त्यांच्या तर्फे इतर जणांच्या फ्रेंड रीक्वेस्ट्स पेंडिंग रहातील तसेच त्यांना कार्यक्रम आणि सहलींमधे सहभागी करून घेण्यासाठी वेटिंग लिस्ट ठरवावी लागेल... पुन्हा त्यात CNF, WL, RLWL, PLWL, CAN, REGT अशी प्रतवारी करावी लागेल.

छान माहितीपूर्ण लेख आहे. ही साईट नक्कीच पाहीन आणि प्रतिसादातील लिंक्स वाचायचीही उत्सुकता आहे.

हेमंत, माझ्या सामाजिक स्तरावरची अशी ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली नाही. भेटली असती तर मैत्री केली असती. मला त्यात काहीच वावगं वाटत नाही. ( मला आता वेळ नाही, पण 'सामाजिक स्तर' या टर्म बद्दल कोणी आक्षेप घेतला तर मला नेमकं काय म्हणायचं आहे ते वेळ झाल्यावर लिहीन)

कालच इंस्टा किंवा FB रिल्स वर एका शिवलक्ष्मी नावाच्या ट्रान्सजेंडर आणि कोपरगावचा एक तरुण, या दोघांच्या लग्नाची पुर्ण माहिती ऐकली. दोघांचा इंटरव्ह्यू होता. दोघांच्या घरच्यांच्या संमतीने झालेला विवाह असुनही माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. असो.

मूल झाले की ट्रान्स जेंडर ना बक्षिस देतात. काल परवात मुंबईत एका ठिकाणी मूल झाले म्हणून ट्रा. बक्षिस मागायला गेला. एक साडी व ११०० रु अशी मागणी होती. कुटुंबाने २०० रु देतो म्हटले ते पटले नाही. वादावादी झाली. रात्रीतून ते मूल ( मुलगी तीन मह्न्याची) किड नॅप केली व तिला जिवंत वाळूत पुरले. वारली ती बालिका. आता त्या ट्रान्स. ला अटक झाली आहे पण गेलेला जीव परत येतो का?

त्यांना रोजगार उपलब्ध केले गेले तर अश्या बक्षिसावर अवलंबून राहणे कमी होईल.

?

Transgender मध्ये खूप प्रकार असावेत.
१) पूर्ण पुरुष ,पूर्ण स्त्री पण विभिन्न लिंगी attraction नाही समलिंगी attraction.
लेस्बिअन म्हणतात त्यांना.
२) पूर्ण स्त्री ,पूर्ण पुरुष पण समलिंगी,आणि भिन्न लिंगी दोन्ही शी संबंध.
३) पूर्ण स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही असे.
४)पूर्ण पुरुष पण स्त्री च्या सर्व भावना
५)पूर्ण स्त्री पण पुरुषाच्या सर्व भावना.
ह्या सर्व प्रकारात transgender नक्की कोण.
जे विवाह होत आहेत ते वरील कोणत्या प्रकारच्या लोकांचे होत आहेत.

ह्या मध्ये पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री पण तरी समलैंगिक संबंध ह्या वर समाजाची जास्त आपत्ती आहे.
कारण ह्यांची बायको/ नवरा ,मुल ह्यांची फसवणूक असते,त्यांच्या भावना दुखावल्या जातात. त्यांची फसवणूक झालेली असते.

ना पुरुष ना स्त्री अशी जी लोक असतात त्यांच्या विषयी लोकांमध्ये तिरस्कार नसतो त्यांचे लैंगिक वर्तन स्पष्ट असते.

वरती अमा यांनी सांगितला तसे नकारात्मक अनुभव बरेच ऐकण्यात आहेत. मला स्वतःला एकही वाईट अनुभव अजूनतरी नाही आला हे नमुद करू इच्छितो. लखनौला पहिली पोस्टिंग होती तेव्हा नुकतेच लग्न झालेल्या तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितला होता. जन्म-बारसे-लग्न या प्रसंगी तिथली स्थानिक टोळी घर कसे आहे ते पाहून रकमेची मागणी/खण्डणी करते. यांची परिस्थिती बरी असल्याने त्यांच्या म्होरक्याने ५१ हजार मागितले पण यांच्या वडिलांनी एवढी रक्कम द्यायला सरळ नकार दिला. नंतर इज्जतीखातर ते ११हजाराला तयार झाले पण त्यांनी ऐकले नाही. त्यावर नवीन लग्न झालेल्या घराबाहेर येउन त्या टोळीने 'त्यांच्या स्टाईलने' कपडे वगैरे काढून सगळ्या खानदानाचा शिव्याशाप देऊन उद्धार केला. नंतर प्रकरण पोलिसांत गेले पण जो त्रास व्हायचा तो झालाच. असा त्रास बऱ्याच जणांना होतो पण बहुतेक मंडळी पैसे देऊन गप्प बसतात. आमच्या भागात तरी असे प्रकार सुदैवाने नाही ऐकले अजून. ह्या लोकांचे जीवन खडतर असते हे मान्य आहे पण अश्या गोष्टी कमी होणार नाही तोपर्यंत समाजमन बदलणे अवघड आहे.

Transgender (ना पुरुष ना स्त्री) फळ,भाज्या विकणे असे लहान उद्योग करू लागले तर लोक त्यांच्या कडून नक्कीच विकत घेतील.
पण त्यांनी स्वतः ला स्वतःच एका विशिष्ट चाली रिती मध्ये बांधून घेतले आहे.
त्याला समाज जबाबदार नाही.
शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत.त्यांनी ते काम केले तरी त्यांना शेतकरी काम देतील.
पण काम करायचेच नाही फक्त भिक मागायची हीच वृत्ती असल्यावर काय करणार.

काम करून ,कष्ट करून जगण्याची सवय नसते.

आमचे क्षेत्र सुद्धा पूर्ण पणे लिंग निरपेक्ष आहे.

मी नेहमी सगळ्यांना सुचवत असते पण आंघोळीचे / कपडे/ भांडी /धुण्या चे साबण डिट पावड र,
अगरबत्त्त्या वळणे व पॅक करणे, सुवासिक तेले बनव्णे स्प्रे बनवणे, असे बरेच साधे उद्योग आहेत जे कोणी ही करू शकते. फार हायटेक नाहीत.
हे त्यांना शिकवून आर्थिक बाबीत स्वावलंबी बनव्णे सहज शक्य. आहे एखाद्याची लैंगि कता हा पूर्ण पणे वैयक्तिक प्रशन किंवा उत्तर आहे. त्याच्या ओव्हर ऑल जीवनाच्या जगण्याच्या सुखात तो मध्ये का यावा? हे अन्याय कारक आहे. त्यातूनच असे गुन्हे घडतात. पूर्ण सेगमेंट टाइप कास्ट होत जाते.

एकाने त्याच्या घरातील स्त्रियांसाठी ट्रान्स ड्रायव्हर ठेवलेला पाहिले आहे. राजेरजवाडे पुर्वी स्त्रियांच्या सोबतीला ट्रान्स ठेवायचेच की. बॉडीगार्ड म्हणून चांगला स्कोप आहे त्यांच्यासाठी. अर्थात कोणी काय काम करावे यावर बाकी लोकांनी सल्ला द्यायची गरज नाही पण भीक मागणे/दहशत माजवणे असे उद्योग बंद करावे. सगळेच वाईट असतात असेही बिलकुल सुचवायचे नाहीये.

Transgender मध्ये खूप प्रकार असावेत.
१) पूर्ण पुरुष ,पूर्ण स्त्री पण विभिन्न लिंगी attraction नाही समलिंगी attraction.
लेस्बिअन म्हणतात त्यांना.
२) पूर्ण स्त्री ,पूर्ण पुरुष पण समलिंगी,आणि भिन्न लिंगी दोन्ही शी संबंध.
>>>
यांना ट्रान्सजेन्डर नाही म्हणता येणार. हे sexual ओरिएंटेशन आहे. ह्यातील बऱ्याच जणांना आपले ओरिएंटेशन माहित असते पण समाजाच्या भीतीने किंवा आई वडिलांच्या जबरदस्तीने भिन्नलिंगीशी लग्न करतात.

मेडिकल टेस्ट करून transgender कोण हे नक्की ठरवता येत असेल.
आणि मुंबई सारख्या शहरातील सर्व transgender ची टेस्ट केली तर किती तरी भुरटे सापडतील.
असतात पुरुष पण फक्त भीक मागण्यासाठी तसा अवतार घेतात.
मला वाटतं गुन्हे हे अशा लोकांकडून च होत असावेत.
ओरिजनल transgender व्यक्ती कडून नाही

ट्रान्सजेंडर हा प्रथम जेंडर आयडेंटिटीचा मुद्दा आहे. सेक्स्युअलिटीचा नाही.

जेंडर आयडेंटिटी हा मुख्य मुद्दा असला तरी इतरांचे त्याच्याशी काही देणेघेणे नसते.

मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ऑफीसात काम करतो , माझ्या स्त्री पुरुष कोणत्याच सहकार्याला मी हात लावत नाही , सर्वांना समान वागवतो , त्यांनी कपडे कुठलेही पण ऑफिसशी सूट होणारे घालावेत.

आता , नवरात्रीत नऊ दिवस बायकांच्या रंगीत ग्रुपात त्या टिजीला साडी नेसून समाविष्ट करून घेतील का आणि खांद्यावर हात टाकून खेटून उभे राहू देतील का , किंवा कोणत्याही मुलींच्या function ला त्याला घेतील का , हे त्यांच्यातील अंडर स्टँडिंगवर आहे , पण त्यासाठी त्याची नोकरी , तिथले काम व इतरांशी असणारे रिलेशन ह्यात बाधा येण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आठ तास आपले काम करावे , इतकाच तर इतरांशी सम्बम्ध असतो.

आज प्रत्येक गोष्टीत स्त्री पुरुष समानता आली आहे , म्हणजे आज पुरुष असलेला एक स्टाफ बदलून उद्या तिथे स्त्री आली तर कुणालाच काही फरक पडणार नसतो , त्या व्यक्तीने काम नीट केल्याशी कारण , मग टीजी लोकांना त्यांच्या जेंडर आयडेंटिटीवरून नेमका काय प्रॉब्लेम असतो ?

------ ------ -----

आणि गम्मत म्हणजे लॅब फॉर्मवर मेल फिमेल दोनच ऑप्शन आहेत, मी जसे सुचेल तसे लिहितो , कधीकधी तिसरी चौकट पेनने काढून TG लिहितो , रिपोर्ट आणला की नाव बघून ते सगळे लिहून काढण्यातच वेळ जातो , त्यामुळे ते जेंडर काय छापतात , कधी लक्षच गेले नाही , उद्या जेंडर डिस्क्रीमिनेशन हा मुद्दा करून माझ्याशी कुणी वाद घालू नये , इतकीच अपेक्षा

Creatinine जरा वाढले असले तर creatinine clearance काढताना जेंडर मेल फिमेल काय पकडावे , हाही एक काल्पनिक मुद्दा आहे , सुदैवाने सगळे नॉर्मलच येतात , म्हणून बरे आहे

सुरुवात कोणी तरी केली पाहिजे आणि सर्वांची इच्छा असते मी सोडून बाकी कोणी तरी व्यक्ती नी हे कार्य करावे.
इथे दहा पंधरा आयडी नी तरी transgender लोकांना समानतेने वागवले पाहिजे ,त्यांच्या शी मैत्री केली पाहिजे त्यांना सण वार,लग्न समारंभ ह्या मध्ये बोलावले पाहिजे असं मत व्यक्त केले आहे पण
येथील किती लोकांनी स्वतः तसे वागून बदलला सुरुवात केली आहे?
एक पण नसेल.
समाज स्वतः काहीच करणार नाही फक्त बोलेल.
स्वतः ची ओळख समाजात निर्माण करायची असेल तर स्वतः transgender लोकांनी एकत्र येवून विविध उद्योग,व्यवसाय,शिक्षण ह्या मध्ये ठसा उमटवला पाहिजे.
त्या शिवाय त्यांचे हक्क त्यांना मिळणे शक्य च नाही.
संघर्ष केल्या शिवाय काहीच मिळत नाही.

I would. But I don't meet humanity itself. Those days are over.

असे वाटले की इथे बर्‍याच लोकांची ट्रान्स्जेन्डर म्हणजे अचकट विचकट हाव भाव करून टाळ्या वाजवत पैसे मागणारे लोक एवढीच समजूत दिसतेय.
नॉर्मल साध्या सुध्या घरातले, सुशिक्षित ट्रान्स्जेन्डर व्यक्ती जे लिंगबदल केला तरी त्या त्या लिंगानुसार साधी , लाउड नसलेली वेषभूषा करणारे, तुमच्या आमच्या सारखे ऑफिसात, फॅक्टरी, टेक जॉब्ज, शिक्षक इ. असूच शकत नाहीत का? त्यांनी डायरेक्ट भीक मागणे किंवा मग अंगमेहनतीची कामे करणे इतकेच सुचते का आपल्याला? कदाचित अशी उदाहरणे भारतात फार नसावीत.

https://transgenderindia.com/talk/d/7813-discrimination-faced-by-transge... धागा ज्या साइट बद्दल आहे तिथून

समजा ट्रान्सजेंडर व्यक्तीने त्याला जन्मतः दिल्या गेलेल्या लिंगानुरूप कपडे केले (आणि ती ट्रान्सजेंडर आहे हे जाहीर केले) तर तिला कोणताही त्रास दिला जाणार नाही का? तिच्याबाबत भेदभाव होणार नाही का? वेगळे काढले जाणार नाही का?
या प्रश्नांची उत्तरे माझ्यामते "हो" अशी आहेत. समाजमनात त्या व्यक्तीच्या ट्रान्सजेंडर असण्याबद्दलच अढी आहे.

कपड्यांचा मुद्दा वरवरचा आहे. आधी कोणीतरी लिहिल्याप्रमाणे शर्ट पँट घातलेली स्त्री बघायला ऑड वाटत नाही. कारण त्याची सवय झाली आहे. तीच स्त्री उत्तर प्रदेश हरयाणाच्या ग्रामीण भागात गेली तर तिला काय रिअ‍ॅक्शन मिळेल?

म्हणजे हे कपडे घालणार्‍या व्यक्तीवर नव्हे तर पाहणार्‍यावर अवलंबून आहे.

त्यांची जनगणना होत असेल हे तर नक्की.
मग समाजात किती टक्के लोक transgender असावीत .कोणाला माहित आहे का?
पण हा आकडा अगदी नगण्य असावा.
राज्याची लोकसंख्या दाखवताना स्त्रिया किती पुरुष किती ह्याचे आकडे असतात.
पण tg किती आहेत हा आकडा नसतो.
असे का?

सामो
जन्मजात जे असतात त्यांच्या विषयी बोलतोय मी.
Gay किंवा लेस्बिअन विषयी नाही बोलत.

इतकेच सुचते का आपल्याला? & एवढीच समजूत दिसतेय > आम्ही त्या ठराविक गटाबद्दलच बोलत आहोत नाकी सगळ्या. रस्त्यावर भीक मागत/ पब्लिकला धमकावत जगणाऱ्या लोकांना डिरेक्टली कुठे तुम्ही म्हणता त्या ठिकाणी समाविष्ट करता येत असेल तर आनंदच आहे.

चिनूक्स म्हणजे एक्स्प्लोरींग ओन सेक्श्युअ‍ॅलिटी. आपण बाय आहोत का वगैरे .... मला हे मान्य आहे की लैंगिकता उपजत असते पण काही टीनेजर्स, युवक हे एक्स्प्लोअर करतही असतील, अधिक ओपन माईंडेडली.

Pages