एक होता अवचट ... भाग ४

Submitted by सुर्या--- on 24 June, 2021 - 05:25

मागील भाग पाहण्यासाठी
भाग १ https://www.maayboli.com/node/79319
भाग २ https://www.maayboli.com/node/79338
भाग ३ https://www.maayboli.com/node/79355

अवचट च्या अवखळपणाचा त्याला जरी पश्चात्ताप वाटत असला तरीही त्याच्या त्या भोळसटपणाने एक वेगळीच जादू केली होती. काही वेळातच त्याच्या या नाच गाण्याचे, ट्रॅफिक चे, दुकानाचे फोटो शहरामध्ये सर्वत्र VIRAL झाले होते. अनेक जण कुतूहलाने अवचट ला पाहायला, दुकानाला भेट द्यायला आले आणि जाता जाता त्याला हार फुलांची ऑर्डर देऊन गेले. अर्थातच पहिल्याच दिवसापासून तो ती ऑर्डर पूर्ण करणार नव्हताच. काही ठराविक ऑर्डर पहिल्या दिवशी घेऊन बाकी पर्वा पासून देईन असं सर्वांना आश्वस्त केलं. ऑर्डर दिलेल्यांच्या घरांचे पत्ते वहीमध्ये नोंद केले. ५० लोकांच्या घरी हार पोहोचवण्यासाठीची कसरत आणि इतर व्यवस्था करण्यासाठी त्याला आता गरज होती मदतीची आणि व्यवस्थापनाची.

मित्रांनी पहिल्या दिवसासाठी हार बनवायला मदत केली. संध्याकाळ होईतोवर सर्व हार फुलांचे पॅकेट्स बनवून पवळ्या आणि अवचट निघाले ऑर्डर च्या डिलिव्हरी करायला.
ऐनवेळी केलेली मदत आणि पहिलीच मिळालेली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अवचट, पवळ्याबरोबर पेढे घेऊनच शाम्भवीच्या घरी पोचला. संध्याकाळची वेळ होती. भुरकटराव अभंगवाणी ऐकत चहा पीत बसले होते. मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी भाजी निवडण्यात व्यस्त होत्या. दार ठोठावण्याचा आवाज येतो तस सर्वांचं लक्ष दाराकडे जात.

अवचट:- अण्णा ...येऊ का ?
भुरकटराव:- (टीव्ही चा आवाज कमी करत) अरे ये अवचट... पवळ्या ... ये...ये
झाले का तयार आपले हार? बघू कसे बनवलेत.?
(मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी स्मितहास्य करत त्यांच्याकडे पाहत असतात)

पवळ्या हार पॅकेट मधून काढून दाखवतो.

भुरकटराव:- (हार हातात घेत) अरे व्वा ... फारच छान ...
खूपच छान बनवलेत हार....

पवळ्या :- अण्णा आज शाम्भवी आणि तुमच्यामुळेच आमचा पोपट होता होता राहिला.

मीनाक्षीदेवी:- पोरांनो जे कराल ते मन लावून करा...

अवचट :- भुरकटरावांना आणि मीनाक्षीदेवींना पेढा देत त्यांच्या पाया पडतो. शाम्भवीला पेढा द्यायला हात पुढे करतो. शाम्भवी स्मितहास्य करते. तिच्याही चेहऱ्यावर समाधान झळकलेले दिसते.

अवचट थोडा गोंधळत बोबडा बोलत शाम्भवीचे आभार मानतो.
"थं `~ ~ ~ थँक्स , श~ शाम्भवी. वाचवलंस "

आणि भुरकट रावांच्या आणि मीनाक्षीदेवीच्या पाया पडण्याच्या तंद्रीतच शाम्भवीच्याही पाया पडू लागतो.

शाम्भवी कपाळावर हात मारत, हसतच मागे सरकते.

मीनाक्षीदेवी :- (अवचट च्या पाठीवर ठपका मारत) ती काय घरातली म्हातारी वाटली का रे? तिच्या पाया पडतोय.

(सर्व जण जोराने हसू लागतात. अवचट दातांमध्ये जीभ चावतो.)

पवळ्या :- नानी आज आणखी पुढे गम्मत काय झाली माहितेय ... तुम्ही निघून गेल्यावर अवचट च्या आईची मज्जा केली आणि नंतर जी लोक दुकान बघायला येऊ लागली... तुम्हाला सांगतो ५० लोकांनी हारांची ऑर्डर दिले ना आपल्याला.

भुरकट राव :- ५० जणांच्या ऑर्डर्स (भुवया ताणून)
चांगल झालं. पण मग एवढं सगळं कस manage करणार?
(शाम्भवी ऐकत उभी असते)

अवचट :- पवळ्या आणि मी, आम्ही दोघे मिळून करू. हळूहळू बघू. पुढे कस होतंय ते ठरवू.

अवचट आणि पवळ्या , पवळ्या च्या घरी पेढे देऊन जातात.

रात्रीची वेळ असते. पवळ्या अवचट आणि इतर मित्र रव्याच्या दुकानाजवळ गप्पा मारत असतात.
दुसऱ्या दिवसाचं नियोजन करण्याची तयारी असते.

पवळ्या :- अवचट उद्यापासून तुझ्या मॉर्निंग वॉल्क ला ब्रेक लागेल ना रे.
अवचट:- कश्याला ब्रेक लागेल?
पवळ्या :- मग सकाळी जाऊन फुल कोण आणेल?
अवचट:- तू जाशील ना?
पवळ्या :- मी साखरझोपेत असतो रे. उठलो नाही , गेलो नाही तर दुसऱ्याच दिवशी आपला धंदा बंद होईल. बघ बाबां ...

रव्या आणि इतर मित्र अवचटलाच जायला सांगतात. कारण त्यांनाही पवळ्याची झोपेची सवय माहीत असते.
अवचट झोपायला जातो. पण त्यालाही वाईट वाटत असत. उद्यापासून morning walk बंद म्हणजे शाम्भवीचे दर्शन बंद. सकाळ चांगली नसेल तर दिवस कसा जाईल. पडल्या पडल्याचं सामानाचा अंदाज घेतो.

पहाट होताच अवचट दादर ला जातो. इकडे ६.३० वाजून गेले तरीही कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज नाही, कोंबडे अरवत नाही. रस्त्यावर शुकशुकाट. जो तो येणार जाणारा काहीतरी मिस करत होता. अनेकांना अलार्म लावायचा असतो याचाच विसर पडलेला होता, त्यामुळे त्यांना आज उठायला उशीर झालेला. शाळेत जाणारी मुले झोपूनच राहिली. दूध टाकायला जाणारा भैय्या शुकशुकाट पाहून कोणीतरी देवाघरी गेलं असावं आज इकडे फिरकू नये असा अंदाज बांधून माघारी फिरतो. रिक्षावाल्याला कोणी प्रवासी मिळत नाही. एवढं सर्व झालं होत फक्त एका गोष्टीमुळे, ते म्हणजे अवचट च्या अनुपस्थितीमुळे.

सकाळ होताच शाम्भवी नेहमीप्रमाणे उठते. तयार होते आणि बाल्कनीमध्ये केस सावरायला उभी राहते. एवढी शांतता का आज? आज काहीतरी वेगळं जाणवतंय हे तिलाही कळते. का असं उदास उदास वातावरण आहे आज? ती मनातल्या मनात विचार करते.
भुरकटराव तुळशीत अगरबत्ती लावायला येतात.

भुरकटराव :- (इकडे तिकडे पाहत) शाम्भवी आज असं विचित्र वातावरण का आहे? रस्त्यावर लोक दिसत नाहीत जास्त. कुत्र्यांचा आवाज नाही सकाळपासून. गाड्यांचा आवाज नाही. कोणी गेलय कि काय?

भुरकट रावांचे अर्धवट शब्द मीनाक्षीदेवी ऐकतात आणि जोरजोरात बोलत बाहेर येतात.

मीनाक्षीदेवी:- कोण गेलं? अरे देवा, सकाळी सकाळी अशी बातमी.
मीनाक्षीदेवीचा आक्रोश एकूण आजूबाजूचे लोक धडाधड दरवाजे खिडक्या उघडून बाहेर येतात. काही जण खिडक्यांमधून बाहेर डोकावून पाहू लागतात. आणि सर्वजण एकमेकांना विचारू लागतात. कोण गेलं ? कोण गेलं? कोण गेलं रे?

पवळ्या ची आई पवळ्याला झोपेतून उठवते. "पवळ्या अरे उठ , कोणीतरी गेलंय ...
पवळ्या डोळे चोळतच उठतो. बाहेर येतो. चाळीतील सर्वजण आपापल्या बाल्कनीमध्ये उभे राहून चर्चा करत असतात.
तेवढ्यात पवळ्या चा फोन खणाणतो. पवळ्याची आई पवळ्याला फोन आणून देते.

अवचट:- (फोनवर) फुल घेतली आहेत. स्टेशन वर ये घ्यायला.
पवळ्या :- (आवाज क्लिअर नसल्यामुळे जोरजोरात बोलू लागतो.)
फुल घेतलेत का? ... हा ठीक आहे.. हा... हा.... अरेरे ... मग... बरं ...हा ...हा... येतो.... हा... चल TC

चाळीतील सर्वांचा समज होतो कि पवळ्या आता जो कोणी गेलाय त्याच्या घरी चालला आहे.
अनेकजण नक्की कोण गेलाय हे पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग निघतात. पवळ्या सायकलने स्टेशन ला जातो. तोवर ते चौकातच उभे राहतात. पवळ्या आणि अवचट फुल घेऊन आल्यावर त्यांच्याभोवती गोळा होऊन सर्वजण पवळ्या ला विचारू लागतात. कोण गेलं रे?
पवळ्या माहिती नाही असा सूर लावतो. एव्हाना कुठे रडण्याचा आवाज नाही म्हणून जो तो आपला गैरसमज झाल्याचे स्वीकारून आपापल्या कामाला लागतो.

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय उत्तम कथा. एकाच कथेत भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, चालू वर्तमानकाळ, आणि इतर काळ अशी कालातीत अभिजात कथा मायबोली वर मायबोलीच्या स्थापनेपासून वाचनात आलेली नाही. गल्लीनायकाचा प्रवास दिल्लीनायक होऊन पार्लमेंट हाऊसमध्ये हार तुरे विकण्यापर्यंत आणि नंतर व्हाइट हाऊसमध्ये बुके पोचवण्या पर्यन्त होवो हीच सदिच्छा.

@स्वेन
तुमची प्रतिक्रिया वाचून मला खूप मोठा धक्का बसलाय. १ महिना आणि एक आठवडा झालाय तुम्हाला मायबोली जॉईन करून आणि तुम्ही मायबोलीच्या जन्मापासूनच वाचन पूर्ण केलात. मला त्यामुळे रजनीकांत चा रोबोट movie आठवला. पाने पालटली कि पुस्तक डायरेक्ट डोक्यात. कदाचित तुम्ही लॉगिन केल्याबरोबरच सर्व लेख ऑटोमॅटिक तुमच्या मेंदूच्या memory कार्ड मध्ये save झालं असावं. असो, या ना त्या कारणाने प्रतिसाद देत राहा. कधी कधी प्रतिसाद वाचूनही आनंद मिळतो.

देवभुबाबा
या आयडीकडे लक्ष देऊ नका. या आयडीला असे तोंड लपवून वावरण्याची घाणेरडी सवय आहे. अशा निनावी आयड्यांनी लैंगिक विषयांवर बौद्धीक हस्तमैथुन करणे ही याची विकृती आहे. जर याला डिवचले तर हा स्त्री असो वा पुरूष शिव्या देतो. बिथोविन नावाचा आयडी काढून याने स्त्रियांना उद्देशून अत्यंत अश्लील शेरेबाजी केली होती. याला अ‍ॅडमिननी मूळ आयडीने हाकलून दिले आहे. मूळ आयडी होता तेव्हांही याला कुणीही पाहीलेले नाही. एक दोन गटग मधे येतो म्हणाला पण गेला नाही. याचे मूळ नाव उदयन आहे. इनामदार हा त्याचा अजून एक आयडी सध्या चालू आहे.
कोणत्याही आयडीच्या वाटेला निनावी आयडी घेऊन जाणा-या या विकृत इसमाकडे दुर्लक्ष करा किंवा वेमा यांना किंवा अ‍ॅडमिन यांना कळवा.

@sparkkkkk
धन्यवाद साहेब. यांचं स्वतःच लिखाण काही दिसत नाही. मग उगाच जे लिहू पाहत आहेत. शिकत आहेत त्यांना नाउमेद करून कसलं समाधान मिळवत आहेत. असो. काहीतरी शिकायला मिळालं. असे लोक सुद्धा आहेत.