जीवन

Submitted by ShabdVarsha on 13 June, 2021 - 01:44

न मिटते ती भूक जीवाची घालता आकाशाला गवसणी
पुर्तता सारी स्वप्नाची कोणत्या काळात पूर्ण व्हावी

कापले पंख जरी अपेक्षा काही सुटत नाही
सारे भेटूनिया जीवनाची ओंजळ काही भरत नाही

समाधान पळून नेणाऱ्या कधी गोठाव्या त्या अपेक्षा
खटाटोप सारा भविष्याचा न संपणारी प्रतीक्षा

नात्यांना टिकवण्याचे प्रत्येकाचे नव नवीन बहाने
भेटलेल्या दुःखात अश्रूचे कायम डोळे मिटून नहाने

काही न सुटणारी कोडी कोणत्या काळात सुटावी
खेळ सर्व पाप पुण्याचा मुक्तता कशी सहज मिळावी

डाव सारा हा जीवनाचा शब्दांत कसा मांडावा?
कोणता क्षण शेवटचा याचा शोध कसा, कुणी घ्यावा?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users