कोरोना विधवेसाठी सरकारी मदत कशी मिळवायची?

Submitted by रीया on 10 June, 2021 - 20:56

आमच्या शेजारच्या काका मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये कोरोना ने गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. कुठे तरी बातमी वाचली होती की कोरोना मुले विधवा झालेल्या स्त्रियांसाठी सरकार मदत देत आहे. एक फॉर्म ऑनलाईन मिळाला पण तो कुठे पाठवायचा आहे वगैरे काही माहिती त्यावर नाही. कोणाला काही माहिती असेल तर प्लिज शेअर करा.
आई ज्या शाळेत शिकवायला आहे त्या शाळेत काम करणारे माजी क्लार्क पण कोरोना मुळे गेले, त्यांची दोन्ही मुले मतिमंद आहेत. बायको ही फारशी सक्षम नाही तेंव्हा सध्या शाळा लेव्हल वर त्यांना आर्थिक मदत करणे सुरू आहे. त्यांना फारशी पेंशन नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही ही माहिती मला उपयोगी पडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

संजय गांधी निराधार योजना
श्रावणबाळ योजना
तहसिलदार ऑफीसमध्ये Form मिळतील.
महिना १००० मदत मिळेल.
दारिद्रय रेषेखाली कुटूंब असल्यास अजून वेगळ्या मदतीच्या योजना आहेत.

महिना 1000 फक्त ? कुठे तरी वाचलेलं वाचलेलं की 7 लाख रुपये मिळणार आहेत म्हणून.तसं नाहीये का?

राज्य शासनाकडून कदाचित केलेली घोषणा असू शकेल सात लाख रुपये मदतीची..
पण वरच्या योजना ह्या कायमस्वरूपी आहेत.
तुम्हांला जमल्यास तहसिलदार office मध्ये चौकशी करा.
तिथे माहिती मिळेल तुम्हांला...

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या योजना नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. पण करोना मुळे पती गमावलेल्या स्त्रियांसाठी अशी काही योजना असल्याचे दिसले नाही. याबाबत एक फेक मेसेज मात्र फिरतो आहे.
https://thelogicalindian.com/fact-check/coronavirus-compensation-28769

थँक्स लोकहो.

बरेच ओळखीचे कोरोना मुळे गेले, त्यातले काही तर अक्षरशः त्या गेलेल्या व्यक्तीवरच अवलंबून होते त्यामुळे आता जे काही सेविंग होतं ते वापरून लोकं सध्या दिवस काढतायेत. त्या सगळ्याना उपयोग होईल म्हणून माहिती काढावी यासाठी धागा काढला. नक्कीच उपयोगी माहिती जमा होते आहे