निजरूप दाखवा हो!!
कधी भेटणार तो मला? कधी संपणार ही वाट?
कित्ती दिवस चालतोय. किती रात्री जागून काढल्या.
त्याच्या येण्याकडे डोळे लावून वाट बघत बसलोय.
डोळे थकून थकून गेले.
अश्रूचीच एक सर.. एक सर झरझरत बरसली.
पण त्याचा पाऊस अजून कसा नाही आला?
अजून तो कसा नाही आला?
अजून किती वाट बघू? अजून किती पायर्या चढू आणि किती दर्या ओलांडू?
किती समुद्राचे तळ धुंडाळले. किती तार्याचे दिवे ओवाळले.
सर्व फुलाच्या पाकळ्या कोमेजून गेल्या! कित्येक मनुष्याची प्रेतं झाली.
पण तो अजून येत नाही.
जेव्हा त्याला सोडून निघालो, तेव्हाच तो म्हणाला होता की न्यायला येइन.
अजून नाही आला... कधी येणार??
विश्वातल्या कणाकणाचा क्षणाक्षणाचा रेणूरेणूचा हिशोब ठेवणारा तो.
त्याला अजून माझी आठवण नाही का झाली?
इथे साद देऊन देऊन मन झुरून गेलं माझे
त्याचा प्रतिसाद कसा नाही मिळत मला?
इथल्या आयुष्याचं वाळवंट झालय...
वाळवंट.. छे!! त्या वाळवंटालाही एक निसर्गदत्त सौदर्य असतं.
माझ्या वाळवंटाला कसलंही सौंदर्य नाही. आहे ते फक्त कुजलेल्या मांसाचा वास
आणि सुकलेल्या रक्ताचे कैक डाग.
त्याच्याच.. त्याच्याच मुलानी आणि माझ्याच बंधुनी दिलेल्या जखमा.
ठसठसणार्या.. सडणार्या जखमा.
मग तो तरी कुठाय? की तो पण संपला या भयानक लढाईत?
मग मी तरी कशाला आहे? एकटाच?
मी कसा नाही संपलो?
का संपत नाहिये मी?
का येत नाहिये तो?
सर्वासाठी आला..
मग माझ्यासाठी का नाही येत?
मी लाडका नाहिये का त्याचा?
पण आता त्याने तरी प्रेम आणि द्वेष करायला
कोण शिल्लक आहे इथे?
मी उरलोय फक्त.. मी..
अख्ख्या अंगणात. अख्ख्या घरात मी उरलोय फक्त..
अजून अंग भाजून निघतय त्या दाहाने
अजून डोळे तापतायत त्या विनाशकारी प्रकाशाने.
अजून मी तडफडतोय त्या आक्रोशाने
अजून मी जळतोय त्या आगीमधे..
अजून मी विझत कसा नाही ?
अजून तो येत कसा नाही?
क्या बात
क्या बात है ...टॉप टू बॉटम...आवडली.
मस्त आहे!
आवडली!! (की
आवडली!! (की आवडला की आवडलं की अजून काही... तुम्ही म्हणाल तसं...
)
अरे वा!
अरे वा! आर्त साद.
जे काही
जे काही आहे ते आवडलं
तुला कदाचित तो दिसणार नाही पण त्याचे अस्तित्व मात्र तुला तो जाणवून देईल. त्या वाळवंटातले माणसाने आपल्या कर्माने पाडलेले रक्ताचे डाग उरणार नाहीत व पुन्हा ते वाळवंट आपलं निसर्गदत्त सौंदर्य झळकवेल. बरीचशी श्रद्धा व अजून थोडी सबुरी धर, तो त्याचे विशाल रुप तो दाखवेल व सांगेल तुला मी पंढरपूरला दिसलो होतो ना बालरुपात तोच मी आहे 
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
आईग..
आईग.. अश्विनी तू त्या पंढरपूरच्या लेखाची आठवण करून दिलीस! नंदिनीनेच लिहीला होता होय तो! सहीच!
हाही मस्त झालाय.. पोचतीय ती आर्तता.. अगदी!
www.bhagyashree.co.cc
नंदिनी,मस्
नंदिनी,मस्तच गं.. वाचुन आतल्या आत काहीतरी तुटल्यासारखं जाणवलं ...
_ _ _ _ _ _ _ _ _ _
सरणार कधी रण प्रभु तरी हे
कुठवर साहु घाव शिरी
सुरेख!
सुरेख!
मस्त
मस्त लिहिलेस नंदिनी!
आवडले
आवडले सुपाशेप आवडलं.... !!!
नंदिनी,
नंदिनी, छानच लिहिलंयस.. पंढरपूरच्या लेखाची लिंक दे ना.
नाद खुळा
नाद खुळा मस्तच.............