कैरी चा कायरस

Submitted by अमुपरी on 3 June, 2021 - 11:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कच्चे आंबे 2 (तोतापुरी असेल तर चांगला )

भाजुन पुड करण्यासाठी(येथे चमचा पोहे खाण्या साठी वापरतो तो मध्यम आकाराचा आहे )
मेथी अर्धा चमचा
हिंग अर्धा चमचा
मोहरी 3 चमचे
तांदुळ 8 चमचे
उडीद डाळ 6 चमचे

फोडणी साठी
तेल 4 छोट्या पळ्या .
मोहरी अर्धा चमचा
मेथी 10 दाणे
हिंग पाव चमचा

गुळ पाऊण वाटी आंबा आंबट असेल तर जास्त लागेल.
तिखट 3 चमचे.
हळद अर्धा चमचा.
मिठ गरजेनुसार
पाणी लागेल तसे.

क्रमवार पाककृती: 

आंब्याची साले काढून त्याचा मध्यम उभ्या फोडी कराव्यात.
तांदुळ ,उडदाची डाळ , हिंग ,मोहरी ,मेथी हे कोरडे भाजुन घ्यावे. व त्याची मिक्सर ला पुड करुन घेणे.
एका कढई मध्ये तेल टाकुन हिंग ,मोहरी ,मेथी ची फोडणी करणे.
म त्याच्यावर आंब्याच्या फोडी घालुन परतणे .
त्यावर तिखट मिठ हळद घालुन परत परतणे. त्यानंतर पाणी ओतणे. पाण्याला उकळी आली की मिक्सर ला केलेली पुड टाकणे.
म हे सर्व मिश्रण शिजवणे.
चांगले शिजल्या वर नंतर गुळ टाकणे.
आपल्याला जेवढे पातळ हवे तेवढे पाणी घालणे.
परत उकळी आणणे.
हा कायरस गार झाल्यावर थोडा घट होतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कल्पना नाही BLACKCAT . आमच्या कडे तर असे फक्त कच्या आंब्याचे करतात.
ढब्बू मिरची चे आमच्या कडे पंचामृत करतात. त्यामध्ये घालण्यासाठी जी पुड करतात त्यात वेगळे जिन्नस असतात.

मस्तच.

तोतापुरी कैरी आंबट नसते असा अनुभव, इथे घेतलेली किंवा इतर ठिकाणी राहायचो तिथे घेतलेली, अजिबात आंबटपणा नव्हता.