डाएट चॉकोलेट पॅनकेक

Submitted by अश्विनीमामी on 1 June, 2021 - 21:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणीक किंवा सध्याच्या भाषेत गव्हाचे पीठ एक वाटी, रवा अर्धी वाटी , कोंडा व ओट ब्रॅन समप्रमाणात मिळून अर्धी वाटी. साखर दोन टेबल स्पून
हर्शीज चॉकोलेट पाव्डर एक टेबल स्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट चार पाच थेंब.

तव्याला लावायला थोडेसे तेल किवा फ्लेवर साठी बटर अगदी छोटा चमचा.

क्रमवार पाककृती: 

ही वेगळी करायची रेसीपी नाही. पण पोळ्या करतो तेव्हा उरलेली कणीक / पिठी आहे त्यात वरील गोष्टी घालून एकाद दुसरा चॉकोलेट पॅनकेक बनवता येतो. पण सर्व घटक पदार्थ अंदाजे घालावे लागतात.

तर एका भांड्यात कणीक, रवा, ब्रॅन चॉकोलेट पाव्ड र मिक्स करून घ्या, व पाणी घालून सर सरीत मिश्रण करून घ्या. मग त्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला. सारखे करून घ्या.

नॉन स्टिक तवा मध्यम गरम करून घ्या व त्यात एक चमचा हे मिश्रण घालून छोटा पॅनकेक घाला. साइडने अगदी थोडे तेल किंवा बटर घाला.
वासा पुरते. नाहीतर गरज नाही.
एका बाजूने शेकल्यावर दुसर्‍या बाजूने पण भाजून घ्या व गरम गरम खा दोन छोटे पॅनकेक खाल्ले की डाएट जेवणा नंतर जी गोड खायची सुर सुरी येते ती शांत होते.

वाढणी/प्रमाण: 
वरील मिश्रणात बारके आठ दहा पॅन केक होतात. प्रत्येकी दोन सर्व केले तर चार लोकांना पुरे होतील.
अधिक टिपा: 

हे लिमिटेड खाण्याचेच आहे.

तुम्ही शुगर सबस्टिट्यू ट वापरू शकता. तेल बटर आजिबातच बाद करू शकता चांगल्या नॉन स्टिक वर तेल बटर् लागणार नाही आजिबात.

जे लोक डाएट प्लॅन वर नाहीत त्यांना बरोबर कापलेली फळे( अ‍ॅपल स्ट्रॉबेरी प्लम ) फ्रेश क्रीम चा स्टार किंवा नटेला/ चॉकोलेट स्प्रेड / किसलेले डार्क चॉकोलेट आदी घालून अधिक सुरेख करता येइल प्लेट मध्ये फॅन्सी सुशोभन म्हणून स्ट्रॉबेरी किंवा मिक्स फ्रूट जॅम थोडा पाणी घालून गरम करून काही थेंब व रेघोट्या मारता येइल.

माहितीचा स्रोत: 
सांगली कडे साबा पोळ्या केल्यावर पिठीत तिखट मीठ कोथिंबीर टाकून एक धिरडे घालत. ही स्फूर्ति.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओट्स वापरले नाहीत तर चालेल का>> न चालायला काय झाले. आमचा जो डाएट प्लॅन आहे त्यामध्ये बरे का पह्ल्या आठवड्यात कणीक व कोंडा
पक्षी व्हीट ब्रॅन अर्धे अर्धे होते. मग आता ह्या आठवड्यात कणीक कोंडा व ओट्स ब्रॅन ४०:३०:३० प्रमाणात आहे. त्या ऐवजी थोडा रवा किंवा
तांदळाची पिठी/ पूर्ण मैदा असेही करता येइल.

ह्याचे नॉन चॉकोलेटी व्हर्जन असे ही करते मी. नार ळाचे दूध व त्यात गूळ विरघळून घ्यायचा अगदी एक चमचा गूळ . व त्यात पिठे भिजवायची.
थोडे साजूक तूप वापरायचे

ह्याचे नॉन चॉकोलेटी व्हर्जन असे ही करते मी. नार ळाचे दूध व त्यात गूळ विरघळून घ्यायचा अगदी एक चमचा गूळ . व त्यात पिठे भिजवायची.
थोडे साजूक तूप वापरायचे

नवीन Submitted by अमा on 1 June, 2021 - 23:52

>> मस्त ट्राय करेन!