गोरक्षण आणि राजकारण

Submitted by प्रजननविरोधी on 30 May, 2021 - 00:37

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गोरक्षण चळवळी अधून मधून चालत होत्या. अहिंसेच्या तत्वांचा भाग म्हणून महात्मा गांधींनी त्यांना हातभार लावताना गुरांची कत्तल करणाऱ्या आणि आवश्यक सफाईचे काम करणाऱ्या दलित आणि मुसलमानांच्या दानवीकारणालाही विरोध केला. स्वातंत्र्या नंतर, गांधी हत्येचा डाग पुसण्याचा चांगला मार्ग म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गोरक्षणाचे मुद्दे उचलून धरले आणि तिथून चळवळीला वेग प्राप्त झाला.

जनसंघानी गोरक्षणाच्या मोहिमा सुरु केल्या. गोरक्षकांची मजल १९६६ साली त्रिशूळ आणि भाले घेतलेल्या हिंदू साधूंचा संसदेवर बलाढ्य मोर्चा नेण्यापर्येंत गेली. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि संसदेवर पहिला हल्ला झाला. अर्थातच त्याबद्दल काहीतरी करणे सरकारला कर्मप्राप्त होते. भविष्यात होणारे भारतीय श्वेतक्रांतीचे जनक आणि राष्ट्रीय डेअरी बोर्डाचे हेड वर्गेसी कुरियन ह्यांच्या अध्यक्षते खाली गोरक्षणावर एक समिती नेमण्यात आली.

"आय टू हॅड अ ड्रीम" ह्या त्यांच्या जीवनचरित्रात कुरियन ह्यांनी समितीच्या संमिश्र समावेशाबद्दल लिहिले आहे. त्यांच्यासारख्या शेती व्यावसायिकांपासून ते पुरीचे शंकराचार्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख एमएस गोलवलकर यांच्यासारखे हिंदू प्रतिनिधी यांचा त्यात समावेश होता. त्यांची गोलवलकरांशी अनपेक्षित मैत्री झाली.

गोहत्या बंदी घालण्यासाठी कुरियन यांनी पाठिंबा द्यावा अशी गोलवळकरांची इच्छा होती - “आणि मी तुम्हाला वचन देतो की त्या दिवसापासून पाच वर्षांत मी देश संघटित करून दाखवेन.” - असं ते म्हणत. पण कुरियन हे करू शकले नाहीत. त्यांना हे माहित होते की दुग्धव्यवसायात दूध न देऊ शकणाऱ्या म्हाताऱ्या गायींची (आणि बहुतेक नर वासरांची) कत्तल करावीच लागते. त्यांच्या निगेचा खर्च कमी करण्यासाठी आणि नवीन गायी विकत घेण्याकरता हे अनिवार्य आहे ह्या वास्तवाची कुरियन ह्यांना जाणीव होती.

ह्या मुद्द्यावरून कुरियन आणि शंकराचार्यांच्यात खटके उडाले कारण शंकराचार्यांकडे(आणि गोलवलकरांकडेही) या समस्येवर व्यावहारिक तोडगा कधीच नव्हता. भारतात पारंपारिक दुग्धव्यवसाय हा नेहमीच एका दांभिक ढोंगावर विसंबून राहिला आहे ज्यात दलित आणि मुस्लिम समुदाय वृद्ध जनावरांची विल्हेवाट लावण्याचे अत्यावश्यक काम करतो - परंतु त्याचमुळे त्यांची अवहेलना होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना. शहरा मध्ये भाकड जनावरे रस्त्यावर मंद सारखे उभारून ट्रॅफीक जॅम करण्या पलीकडे काय करतात? सरासरी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या प्राण्यांची मोजमाप केली तर कोणता प्राणी सर्वात जास्त सापडेल बरे? उत्तर शोधणार्यास दहा गुण देण्यात येतील.

गांधी हत्येचा डाग पुसण्याचा चांगला मार्ग म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गोरक्षणाचे मुद्दे उचलून धरले

Proud

अशा दाम्भीक पक्षाकडे आज देशाचा कारभार आहे

ह्या असल्या च्याप लोकांमुळेच फुटपाथ शेणाने भरतात, मंदा सारखे भर रस्त्यात या गुरांना चारा खायला घालण्यासाठी त्याच्या मालकापुढे चारा विकत घेण्यासाठी अन त्यानंतर गुरांना तो चारण्यासाठी भली मोठी लाईन लाऊन ट्राफिक जाम केले जाते (मागे तर एकदा ट्राफिक का झाले म्हणुन मी स्वतः बस मध्हुन उतरून पुढे जाऊन पाहिलं तर ही च्याप माणसे चारा खायला घालत होती..!!). वर यांच्यासारखेच हात-पाय-धड असणार्‍या पण वास्तवात रहाणार्‍या माणसांना राक्षस ठरवून गुरांमधे देव शोधण्याची कला पुढील पिढ्यात पाझरवून तिलाही मानसिकरित्या पंगु करवले जाते,

दोन पायांच्या गोपुत्रांनी भाकड गाई, कोणाला नको असलेले गेले वंशातले नर सांभाळायला पुढाकार घ्यावा व त्यासाठी व्यवस्था करावी.

गोशाळांमध्ये उपाशी राहून गाई मरतात, स्वतः:च्याच शेणामुताच्या चिखलात बुडून मरतात त्यावर या़च्या तोंडून ब्र निघत नाही.

कसाई लोकांस गायी डायरेक्ट शेतकरी विकत नाहीत दलालांना विकतात जी जनावर भाकड होतात ती.
पण हे पण सत्य आहे विकणारे हिंदू च असतात ,दलाल पण जास्त करून हिंदू च असतात.त्या मुळे नैतिक अधिकार राहत नाही. गौ हत्येचा विरोध करण्याचा.
गायी सांभाळणाऱ्या काही संस्था आहेत त्या सांभाळ करतात पण त्याचे प्रमाण कमी आहे .
पण हिंदू पवित्र समजतात म्हणून गायी विषयी द्वेष नको तो एक प्राणीच आहे.
राष्ट्रीय पक्षी,राष्ट्रीय फळ, असले प्रकार पण आहेत ना.
मग धार्मिक प्रतीक म्हणून कोणता प्राणी असेल तर त्याला विरोध काय कामाचा.
हो पण हे ऐच्छिक असावे जबरदस्ती करून नको.

मुळात आज भारतीय बाजारात गायीचे तूप म्हणून जे विकतात , तितके उत्पादन होईल इतक्या गाई पूर्ण विश्वात तरी आहेत का ?

गुरांना चारा खायला घालण्यासाठी त्याच्या मालकापुढे चारा विकत घेण्यासाठी अन त्यानंतर गुरांना तो चारण्यासाठी भली मोठी लाईन लाऊन ट्राफिक जाम केले जाते >>>>>>>>
हि मात्र निव्वळ फालतू गिरी असते ! रस्त्यावर कसले आलेय गो रक्षण ?
ईद ला आठ दिवस अगोदर बोकड खरेदी करतात , त्याला खाऊ घालून नटवून मिरवतात .
त्या बोकडाला देखील पुढील भविष्य माहित नसल्यामुळे तो देखील सगळे लाड पुरवून / मिरवून घेत असतो .
आणि ईद च्या दिवशी घरातील सर्वजण त्याच बोकडाच्या नळ्या ओढत असतात ......
अगदी तोच प्रकार म्हणजे रस्त्यावरील गाईंना चारा देऊन स्वतःला उपकृत समजून घेणे !
@हेमंत , तुमचे विचार बरोबर आहेत .
पण मला देखील कधी कधी वाटते गाई मध्ये कसले आलेय देवत्व ? गोहत्या मूळे काही लोक मृत्युमुखी ही पडले जे चुकीचेच होते !!!!!!!
पण गाई वरून हिंदू धर्मियांची निंदा करणारे
डुकरा मूळे चवताळून येतात तेंव्हा गंमत वाटते ...
अशावेळी जिझस ग्रुप ची भयानक गोची होत असेल , दोन्हीही प्राणी प्रिय असल्यामुळे !

असं नाहीय ववृ, कोणताही अन्नपदार्थ खाल्ल्याशिवाय कळत नाही की त्यात काय मज्जा असते. भारी भारी असतं सगळं... यम्म...!!

गोहत्या मुळे लोक मृत्यूमुखी पडले?

करेक्शन - गोरक्षणाच्या नावाखाली त्यांचं मॉब लिंचिंंग झालं. एकाही केसमध्ये गोहत्या झालेली नाही.

भारतातला स्वर्ग अशा उत्तर प्रदेशात तर या गोराक्षसांनी पोलिस अधिकाऱ्याला ठार केलं.

भारतातील स्वर्ग.
पण तो मेल्यावर च दिसतो.
उत्तर प्रदेश चे योग्य वर्णन केले आहे.तिथे राहणे म्हणजे मरण यातना.

मुळात ह्या विषयाला धार्मिक रंग दिला गेला की प्रकरण गंभीर रूप घेणार.
हिंदू ज्यांना गौमास मुळे होणाऱ्या हत्या बिलकुल पटत नाही चुकीच्या वाटतात ते धार्मिक रंग दिला की त्यांच्या विचारात बदल करून हिंदू च्या मानापमान च विषय समजणार.
आणि काही हिंदू वादी आणि काही हिंदू विरोधी ह्याला धार्मिक रंग देण्याचाच प्रयत्न करतात.
आणि
दोन्ही बाजूचे आप आपली पोळी भाजून घेत असतात आणि मरतात सर्वसामान्य लोक.

दोन्ही बाजूचे आप आपली पोळी भाजून घेत असतात आणि मरतात सर्वसामान्य लोक.>> अगदी खरंय.... नाहीतरी ब्लॅककॅट यांनी म्हटलेलंच आहे -
गाईचे राजकारण म्हणजे मरायला बहुजन आणि चरायला xxx असे आहे

अरे इथल्या सर्व शेतकऱ्यांनो, भांडू नका. शेतकऱ्या शेतकऱ्यामध्येच भांडणे झाली तर त्याचा फायदा शत्रूला होणार. मग देशाचे ऐक्य कसे व्हायचे!
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कण्यातले मणी मणके सुटे होऊ देऊ नका रे बाबांनो!

Pages