गोरक्षण आणि राजकारण

Submitted by प्रजननविरोधी on 30 May, 2021 - 00:37

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गोरक्षण चळवळी अधून मधून चालत होत्या. अहिंसेच्या तत्वांचा भाग म्हणून महात्मा गांधींनी त्यांना हातभार लावताना गुरांची कत्तल करणाऱ्या आणि आवश्यक सफाईचे काम करणाऱ्या दलित आणि मुसलमानांच्या दानवीकारणालाही विरोध केला. स्वातंत्र्या नंतर, गांधी हत्येचा डाग पुसण्याचा चांगला मार्ग म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गोरक्षणाचे मुद्दे उचलून धरले आणि तिथून चळवळीला वेग प्राप्त झाला.

जनसंघानी गोरक्षणाच्या मोहिमा सुरु केल्या. गोरक्षकांची मजल १९६६ साली त्रिशूळ आणि भाले घेतलेल्या हिंदू साधूंचा संसदेवर बलाढ्य मोर्चा नेण्यापर्येंत गेली. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि संसदेवर पहिला हल्ला झाला. अर्थातच त्याबद्दल काहीतरी करणे सरकारला कर्मप्राप्त होते. भविष्यात होणारे भारतीय श्वेतक्रांतीचे जनक आणि राष्ट्रीय डेअरी बोर्डाचे हेड वर्गेसी कुरियन ह्यांच्या अध्यक्षते खाली गोरक्षणावर एक समिती नेमण्यात आली.

"आय टू हॅड अ ड्रीम" ह्या त्यांच्या जीवनचरित्रात कुरियन ह्यांनी समितीच्या संमिश्र समावेशाबद्दल लिहिले आहे. त्यांच्यासारख्या शेती व्यावसायिकांपासून ते पुरीचे शंकराचार्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख एमएस गोलवलकर यांच्यासारखे हिंदू प्रतिनिधी यांचा त्यात समावेश होता. त्यांची गोलवलकरांशी अनपेक्षित मैत्री झाली.

गोहत्या बंदी घालण्यासाठी कुरियन यांनी पाठिंबा द्यावा अशी गोलवळकरांची इच्छा होती - “आणि मी तुम्हाला वचन देतो की त्या दिवसापासून पाच वर्षांत मी देश संघटित करून दाखवेन.” - असं ते म्हणत. पण कुरियन हे करू शकले नाहीत. त्यांना हे माहित होते की दुग्धव्यवसायात दूध न देऊ शकणाऱ्या म्हाताऱ्या गायींची (आणि बहुतेक नर वासरांची) कत्तल करावीच लागते. त्यांच्या निगेचा खर्च कमी करण्यासाठी आणि नवीन गायी विकत घेण्याकरता हे अनिवार्य आहे ह्या वास्तवाची कुरियन ह्यांना जाणीव होती.

ह्या मुद्द्यावरून कुरियन आणि शंकराचार्यांच्यात खटके उडाले कारण शंकराचार्यांकडे(आणि गोलवलकरांकडेही) या समस्येवर व्यावहारिक तोडगा कधीच नव्हता. भारतात पारंपारिक दुग्धव्यवसाय हा नेहमीच एका दांभिक ढोंगावर विसंबून राहिला आहे ज्यात दलित आणि मुस्लिम समुदाय वृद्ध जनावरांची विल्हेवाट लावण्याचे अत्यावश्यक काम करतो - परंतु त्याचमुळे त्यांची अवहेलना होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१) पूर्वी राजांकडे हजारो माणसंच सैन्य असायचे... त्यांना मांसाहार म्हणून काय खायला घालत असतील
२) लढाईनंतर गो धन लुटून नेत असत ... कोंबडी लुटून नेल्याचं कधी वाचलंय का
३) महाभारत काळात घरी आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यासाठी भोजनात कोणत्या पक्वान्नास प्राधान्य होते
४) सर्वात मोठे आदरातिथ्य म्हणून कोणाचे मांस शिजवत असत
५) आतापी - वातापी राक्षस पाहुण्यांना काय शिजवून घालत असत
६) अगस्त्य ऋषींनी वातापी राक्षसाला तो कोणत्या रूपात असताना खाल्ले
७) यद्न्य विधीत दिला जाणारा बळी

अशा अनेक प्रश्नांची उकल केली असता गोधन / प्राचीन काळातील मांसाहार याबाबत संदर्भ मिळतात .
केरळ मंदिर आणि
संस्कृती जपणूक आपण अनुभवलेलीच आहे : त्या भागातील मांसाहार बाबत मध्ये झालेला वादंग आपणास माहीत आहेतच

सर्व धर्म बाजूला कचऱ्यात फेकून ध्या आणि गायी ला जास्त किंमत का दिली जाते त्याचा विचार करा.
माणूस शेती करू लागला एका जागेवर स्थिर झाला .
आणि त्या साठी त्याला सर्वात उपयोगी प्राणी होता गाय.
शेतीसाठी बैल मिळत होते.
दूध मिळत होते.
भरपूर चारा असायचा त्या मुळे काही खर्च नव्हता.
शेती ल उत्तम खत मिळत होते.
एवढे ज्या प्राण्या मुळे मिळत होते त्याची जाणीव ठेवण्यासाठी च गाय ही पवित्र मानली जाते.अगदी काल पर्यंत गाय विकणे हे पाप होते कोणी गाय विकायचे नाही एक सोडून दिली जात असे अन्न ची कमी नव्हतीच किंवा कोणाला तरी कोणतीच किंमत न घेता सांभाळ करायला दिली जायची.

ब्लॅक कॅट
आपल्या देशाविषयी बोलतोय .मी स्वतः तो काळ बघितला आहे जेव्हा गाय विकली जात नसे.पण इथे धर्माचा काही ही संबंध नाही . तो काही अती हुशार लोकांनी त्याला धर्म जोडला आहे.

कॅट
आपल्या देशाविषयी बोलतोय .मी स्वतः तो काळ बघितला आहे जेव्हा गाय विकली जात नसे.पण इथे धर्माचा काही ही संबंध नाही . तो काही अती हुशार लोकांनी त्याला धर्म जोडला आहे.>>≥>>>>>>>>>>
100 % सहमत !!!!!
ग्रामीण भागात पूर्वी गाईला पवित्रच मनात होते .

स्वतः तो काळ बघितला आहे जेव्हा गाय विकली जात नसे

कुठला काळ हा ?

आणि मग 2014 नंतर अचानक लोक गायी खाऊ लागले की काय ?

गाय विकत नव्हते आणि मग तो संसदेवर हल्ला कधी अन का केला होता ?

की फक्त 15 % मुसलमान 70 % हिंदूंच्या सर्व गाई पळवत आहेत ?

Biggrin

ब्लॅककॅट, गायीच्या आडून दोन भक्त येऊ-की नको अवस्थेत चाचपून बघत आहेत अन तुम्ही असे बाँब टाकताय म्हणजे इतर भक्ताडांचे यायच्या आधीच अवसान गळून पडेल. Proud

भक्ताडांचे यायच्या आधीच अवसान गळून पडेल.
Lol
गिरीश सावंत यांचा प्रतिसाद आवडला. गाय पण दूध देते तशी म्हैस पण देते. उलट म्हशीच्या दुधाचा कंटेंट गाईच्या दुधापेक्षा हुच्चं असतो. पण मग फक्त गाय पावित्र आणि म्हैस नाही असे का? ती (गाय) गोरी असते म्हणून काय? हा तर रेसिझिम झाला.

मग फक्त गाय पावित्र आणि म्हैस नाही असे का? ती (गाय) गोरी असते म्हणून काय? हा तर रेसिझिम झाला.>>> ++++१११११ अगदी अगदी मनातलं लिहिलंत..!!!!!!!

उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ्, डावा-उजवा, गोरा-काळा अशा कैक भेदभावांच्या पायावर रचलेल्या कळसातुन कोणत्या संस्कृतीही अपेक्षा करायचे...!!!

यांना गाय प्यारी - म्हैस नाही. म्हशीला शेळ्यांना बकर्‍यांना मारलं तरी कैच हरकत नाही.

यांना मोर प्यारा... कामं-धामं सोडून त्याला दाणे घालत बसतील पण कोंबड्या, बदकं, तितरं मारली तरी यांना कैच हरकत नाही.

गाय,म्हैस,बैल काही ही असू शेतकरी जेव्हा त्यांचे पालन पोषण करतो .त्यांना लहानाचे मोठे होताना बघतो तेव्हा एक प्रेम निर्माण झालेलं असते.
माझी म्हैस,बैल, गाय दावनी वर मेली तरी चालेल पण विकणार नाही .
असा विचार करणारा शेतकरी तुमच्या नजरेत का येत नाही.
इथे धर्माचा संबंध नाही हे तर पहिलेच लिहले

माझी म्हैस,बैल, गाय दावनी वर मेली तरी चालेल पण विकणार नाही .>> नुसतं म्हणायचं असतं हो हेमंत.... आम्ही पण शेतकरीच आहोत... पण गाई नाहीत आम्च्याकडे. फक्त चार म्हशी आहेत (सरासरी ८० हजार रुपये खरेदी दर आहे प्रत्येकीचा). आमच्या भावकीचा अन गावचा तौलनिक आभ्यास केला तर गायी पाळणारे अगदी नगण्य लोक उरले आहेत. म्हशींसारखं सकस आणि प्रोटिन्स असलेलं दुध गायीकडून कधीच मिळत नाही त्यामुळॅ त्याला दरही नसतो.. मग अशा फुळ्ळ पाणीदार दूध देणारीला कोण ठेवेल दावणीला..?

कोणी शेतकरी गाय-बैल-म्हैस दावणीला मरु देत नाही... मरत असलेच तर ते रोगाने नाहीतर वेळेत विकले गेले नाहीत म्हनुन मरतात.. किंवा फार झालेच तर तो दावण असलेला शेतकरी 'मेंदुला गायीच्या शेणाचा लेप लावलेल्या भाद्दरांच्या' कह्यात आलेला असेल तरच...अर्थात हजारो रुपयांचं नुकसान सोसुन...!!!

मग आल कबीर असे मुस्लिम नाव असलेला जैन मालक गायीचे बीफ विकतो तरी कसे ?

मोदी पार्टीला 2 कोट का किती डोनेशन दिले म्हणे

विषयाला धार्मिक वळण च देणे अपेक्षित असेल तर.
किती मुस्लिम देशात डुक्कर खाण्यावर बंदी नाही .
आपल्या देशात डुक्कर खाण्यावरून हिंसा झाली नसली तरी बाकी मुस्लिम देशात कोण बिन्धास्त डुक्कर कापू लागला तर हिंसा होईल की नाही.
हा पण प्रश्न विचारला जावू शकतो ना.

आपल्या देशात डुक्कर खाण्यावरून हिंसा झाली नसली तरी बाकी मुस्लिम देशात कोण बिन्धास्त डुक्कर कापू लागला तर हिंसा होईल की नाही.>> आपल्या घरात काहीही खाण्यावर बंदी नाही म्हणुन आपली सून काय वाट्टेल ते खाते परंतु शेजार्‍याच्या घरात त्यांच्या सुनेने काय खाल्लं तर भांडणं होतील या विषयी वांझोटी चर्चा करण्याला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या वाक्यालाही आहे.

आपला भारत सर्वधर्मसमभाव अनुसरणारा देश आहे... इथे कोणत्याही धर्माची तत्व घटनेपेक्षा उच्च नाहीत. सर्वांना आपाल्या घरात हवा तो धर्म पाळण्याची मूभा आहे. काहीही खायची मुभा आहे. त्यामुळॅ कुणा धर्माच्या तत्त्वांनुसार चालणार्‍या इतर देशांसोबत भारताची तुलना करणे म्हणजे पिच.डी. करणार्‍या विद्यार्थ्याने बालवाडी मधे अ‍ॅडमिशन घेण्यासारखेच आहे.

विषयाला धार्मिक वळण च देणे अपेक्षित असेल तर.
किती मुस्लिम देशात डुक्कर खाण्यावर बंदी नाही .
आपल्या देशात डुक्कर खाण्यावरून हिंसा झाली नसली तरी बाकी मुस्लिम देशात कोण बिन्धास्त डुक्कर कापू लागला तर हिंसा होईल की नाही.
>>>>>>>>
मुस्लिम देशामध्ये डुक्कर हा प्राणी पूजनीय समजला जात असेल आणि त्याचा मांसाहार साठी कोणी वापर करत असेल तर दंगली होणारच !
ख्रिश्चन आणि मुस्लिम मध्ये साऱ्या जगात उभा वाद त्यामुळेच असावा !

मुस्लिम देशामध्ये डुक्कर हा प्राणी पूजनीय समजला जात असेल आणि त्याचा मांसाहार साठी कोणी वापर करत असेल तर दंगली होणारच !>> होउद्या त्यांच्या देशात झाल्या तर.. पण त्यांचे दाखले इथे भारतात देताना काहीतरी हेतु असेलच की... उगीच ताकाला जाऊन भांडं लपवण्या मागचं कारण काय..?? Wink

ख्रिश्चन आणि मुस्लिम मध्ये साऱ्या जगात उभा वाद त्यामुळेच असावा !>> असला तर असु देत.. त्यात हिंदू, बौद्ध, जैन, इसाई अन शिखांनी काळजी करण्यासारखं काय आहे..??

ब्लॅककॅट , dj आणि झम्पू तुमच्या तिघांनाही प्रत्येकी 11 कोटी देव येऊन कसे झोडपून काढतील बघा.

बोकलत.
सध्या कोणत्या ग्रहावरच्या पिंपळाच्या झाडावर वस्ती आहे.

ब्लॅककॅट , dj आणि झम्पू तुमच्या तिघांनाही प्रत्येकी 11 कोटी देव येऊन कसे झोडपून काढतील बघा.>> तुम्ही असल्यावर आम्हाला कसली भिती Wink

असला तर असु देत.. त्यात हिंदू, बौद्ध, जैन, इसाई अन शिखांनी काळजी करण्यासारखं काय आहे..?? >>>>>
बरोबर !
मग या वाहत्या पानाचा उद्देश मग काय असावा ?

ज्या प्रमाणे गाय वरून दंगली झाल्यात तसेच डुक्कर वरून पण एकेकाळी जाळपोळी झाल्यात ना ?

आणि जर कोणी गाय ला पूजनीय मानत असतील तर इतरांनी शंख वाजवलाच पाहिजे असा नियम आहे का ?

ब्लॅककॅट , dj आणि झम्पू तुमच्या तिघांनाही प्रत्येकी 11 कोटी देव येऊन कसे झोडपून काढतील बघा.
Happy

जर कोणी गाय ला पूजनीय मानत असतील तर इतरांनी शंख वाजवलाच पाहिजे असा नियम आहे का ?>> कोण शंख करतंय...? ज्यांना गाय अन म्हशीतला फरक कळत नाही, त्यांच्या किमतीतील तफावत माहित नाही, दुधातील फरक कळत नाही, शेणघाण माहिती नाही, उठली की बसली हे कळत नाही ते शंख करत आहेत.... ज्यांना हे सर्व कळते त्यांना काही फरक पडत नाही... त्यांच्या लेखी गाय अन म्हैस एकाच दोरीत मापल्या जातात.. आणि दोन्ही पैकी एक ठेव म्हटलं तर म्हशीलाच प्राधान्य मिळते...!!!

सध्या कोणत्या ग्रहावरच्या पिंपळाच्या झाडावर वस्ती आहे>>> वर्क लोड आलाय मरणाचा. कसल्या वस्त्या करताय. बॉसने कंपनिसमोरच्या पिंपळावर वस्ती नाही करायला सांगितलं म्हणजे मिळवलं.
तुम्ही असल्यावर आम्हाला कसली भिती >>> मी त्यांच्याच टीममध्ये आहे. Happy

ज्यांना गाय अन म्हशीतला फरक कळत नाही, त्यांच्या किमतीतील तफावत माहित नाही, दुधातील फरक कळत नाही, शेणघाण माहिती नाही, उठली की बसली हे कळत नाही ते शंख करत आहेत.... ज्यांना हे सर्व कळते त्यांना काही फरक पडत नाही... त्यांच्या लेखी गाय अन म्हैस एकाच दोरीत मापल्या जातात.. आणि दोन्ही पैकी एक ठेव म्हटलं तर म्हशीलाच प्राधान्य मिळते...!!! >>>>>>>>>
त्यातील फरक आम्हाला चांगला कळतो बरं का !
पूर्वी ग्रामीण भागात गाय आणि म्हैस पाळण्याचा उद्देश काय होता या बद्दल तुम्हाला काही माहिती असेल या बद्दल शंका च आहे .
चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मुश्किलीने चार पाच लिटर दुध देणाऱ्या दोन तीन दुभत्या गाई , दोन चार कालवडी आणि जोडीला दोन बैल असा बारदाना असलेला शेतकरी सुखी समजला जात होता .
तो शेतकरी दूध तुपाची घरची गरज भागवून उरलेले विकले तरी तो समाधानी असे .
दुग्ध उत्पन्नासाठी म्हशी पाळणारे खूप श्रीमंत समजले जात होते .

त्यातील फरक आम्हाला चांगला कळतो बरं का !>> हो का.... सांगा बरं मग खोंडात अन बैलात काय फरक असतो..???

पूर्वी ग्रामीण भागात..... ब्ला... ब्ला... ब्ला... ब्ला.... दुग्ध उत्पन्नासाठी म्हशी पाळणारे खूप श्रीमंत समजले जात होते .>> याचा अन भाकड गायी-गुरे दावणीला मरु देण्याचा काय संबंध..?? आजच्या जमान्यातच काय त्या काळच्या जमान्यातही गायी-गुरांची किंमत जास्तच असणार... कोणता शहाणा शेतकरी गुरं अशी फुकट मरु देईल दावणीला..?

या तर त्या च्याप लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत जे स्वतः असल्या फालतू कल्पनांना भुलुन गायी-गुरात देव शोधुन फुटपाथ कडेला बांधुन ठेवलेल्या गायांना त्याच्याच मालकाकडून पैसे देऊन चारा विकत घेऊन खायला घालतात अन मनोभावे पाया पडतात..!!! असले गुरांना दैवत्व बहाल करणारे च्याप लोकं माणसांना मात्र हिरवा-भगवा-निळा-पांढरा असे रंग देऊन कुणी काय खावे अन कुणी काय खाऊ नये याची उसाभर करत बसतात..!!!

Pages