रंजन आणि कल्पनाविस्तार

Submitted by कुमार१ on 27 May, 2021 - 02:40

कल्पना लढवा !
खाली एका मराठी नियतकालिकातील पूर्वप्रकाशित लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.

शब्द :

मुलगा, चाचणी, कायदा,
अधोगतीचे, थांबण्याचा, तोडीचे,
मानसिकता, फरक? , फोलपणा

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.

३. लेखाच्या विषयावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा निव्वळ अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, 'सांगता येत नाही', इत्यादी).
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?

५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी).

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. बिनधास्त लिहा.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
गर्भलिंगनिदान

२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.
गर्भलिंगचिकित्सा कायदा व सामाजिक मानसिकता

३. लेखाच्या विषयावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा निव्वळ अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, 'सांगता येत नाही', इत्यादी).
लिंग सांगता येत नाही. पण लेखक/लेखिका मध्यमवयीन असून स्त्रीपुरुष समानतावादी असावेत.

४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
काही वर्षांपूर्वी (२०११ ते २०१५) गर्भलिंगनिदान करून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे गंभीर गुन्हे घडले होते. हा लेख कदाचित त्या काळातला असेल.

५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी).
हा अंदाज सांगता येत नाही. साप्ताहिक/ मासिक (?)

उत्तरे:

१. पुरुषप्रधान संस्कृती, वैचारिक मागासलेपण असे काहीतरी
२. वंशाचा दिवा की पणती ?
३. मध्यमवयीन शहरी स्त्री
४. २०१० –२०१५
५. वैचारिक साप्ताहिक

अतुल व साद धन्यवाद.
छान लिहिलेत.
...
मूळ लेखाबद्दल माहिती :

शीर्षक : मुलगा हवाच हो !
( उपरोधिक अर्थाने दिलेले)
* लेखामध्ये मुलगा होण्याचा अट्टाहास, कुटुंबनियोजन, गर्भलिंगनिदान चाचणी, त्यावर बंदीचा कायदा, इत्यादी मुद्द्यांवर विवेचन.
* 2002 मध्ये दैनिकात प्रकाशित.
* लेखक : मध्यमवयीन शहरी पुरुष

कल्पना लढवा !
खाली एका मराठी लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.

mukhymantree (2).jpg

तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.
विषयाला स्थळकाळाचे कुठलेही बंधन नाही.

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

अरे वा... नवीन तर्‍हेचे कोडे? बघते काय सुचते......
कोडे २ उत्तरे :
१. दिलजमाई
काही कौटुंबिक मन/मतभेदातून दुरावलेले भाऊ किंवा बाप-लेक पुन्हा एकदा एकत्र आले.
२. पायघड्या
पूर्ण बहुमत थोडक्यात हुकल्याने कडबोळे सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आलेले राजकारणी व अपक्ष उमेदवार / अन्य पक्षनेते
३. शिष्यात् इच्छेत
पहिल्या जाहीर मैफिलीत किंवा जुगलबंदीत गुरूंपेक्षाही सरस म्हणून कौतुक झालेल्या शिष्यांचे अभिनंदन करणारे गुरू
४. मुखवट्याची दुनिया
आमची मैत्री / युती आहेच असे लोकांना भासवणारे राजकारणी

सुरुवात छान झालेली आहे.
येउद्यात अजून....
हवी तेवढी कल्पनेची भरारी मारा आणि लिहा.
स्वागत आहे !

हाजमोलासारखे रेचक विकणारे नीमहकीम आणि योगायोगाने मोकळे झालेले रूग्ण , आणि तो दोघांच्या खांद्यावर हात टाकून सांगतोयं 'बघा मी सांगितले नव्हते का, हे नवीन औषध बद्दकोष्ठावरचा रामबाण उपाय आहे' . Happy
पिकू बघण्याचा परिणाम म्हणून अगदी दोन मिनिटात सुचलेले, त्या चित्रात त्यांचा आनंद व चित्राची एकुण ढब ही मिश्कील वाटतेयं. भरारी मारली !
------

कारवी आल्या , वा वा ! Happy

' दोन चमचे !'
कांहींही फालतू बोललं तरी त्याला खदखदून हंसून दाद देणं, हा चमचेगिरीचा पक्का निकष आहे !

चित्रातले मधले राजकारणी मुख्य राष्ट्रीय पक्षाचे असावेत.
त्यांच्या बाजूचे दोघे काही काळापूर्वी पक्ष बदलून दुसरी कडे गेले असावेत आणि आता उपरती झाल्यावर त्यांनी घरवापसी केली असावी.
म्हणून तिघांनी गळ्यात गळे घातले आहेत.

चित्रं मस्त आहे. थोडक्या रेषांत काढलंय.

तीन शाळूमित्रं आता सिनियर सिटिझन्स झाल्यावर खूप वर्षांनी भेटले आहेत आणि अगदी गळ्यात गळे घालून दिलखुलास गप्पा मारत हसताहेत.

शीर्षक: युत्या आणि आघाड्या
विषय: आजवरच्या राजकीय युत्या आणि आघाड्यांवरचा लेख
--
शीर्षक: खळी कोपरखळी
विषय: तीन काल्पनिक पात्रांच्या आधारे केलेल्या राजकीय प्रहसनांवर आधारित सदरामधील एक लेख
--
(हे चित्र जुन्या नियतकालिकात/दिवाळी अंकात कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय सारखेसारखे. पण आठवत नाही)

धोतर नेसले आहेत म्हणून ग्रामीण भागातील असावेत असे समजून : या तीन शेतकर्‍यांनी मिळून शेत कसले आहे आणि आता डोलणारं भरघोस पीक बघून आनंद साजरा करत आहेत

खूप वर्षांनी भेटलेले तीन मित्र. जे आपआपल्या मुलांच्या कॉलेज दाखल्यासाठी आलेले पण त्यांचे कॉलेज संपल्यावर अगदी मुले-बाळे मोठी झाल्यावर कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेले आणि कॉलेजमध्ये असतानाची ती सध्या काय करते, कोणाचे सगळे केस गेले, कोणाचे पांढरे झाले अशा खूप वर्षांचे साचलेले गॉसीप त्याच कॉलेज कँटीन मध्येबसून चहा आणि वडा पाव खाता खाता घेतलेला हा सेल्फी.

सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार !

आपण सर्वांनी कल्पनेने लिहिलेला मजकूर उत्तम आहे. विविध प्रकारच्या उत्तरांनी खूप मजा आली. व्यक्तिचित्रणाच्या मजेदार छटा अनुभवता आल्या.

आता मूळ लेख व चित्राबद्दल :
सदर चित्र 1984 मधील आहे. चित्राचा अनुरूप विषय असा:

त्या दशकात काही विधानसभांमध्ये पूर्ण पाच वर्षे सरकार टिकतच नव्हते. याचे कारण म्हणजे कुठल्या एका पक्षाला पूर्ण बहुमत नसायचे. अशा परिस्थितीत गरजेनुसार तीन पक्षांची युती करून सरकार बनवा व टिकवा, अशी सूचना त्या लेखनात केलेली होती.

कल्पना लढवा !
खाली एका मराठी लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.

शब्द :
निसर्ग, परका, घराचा
नागरी, अलग, संबंध
माणसाला, स्थळे , शोकांतिका.

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.

३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी)
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
…………………..

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
……………………………

निसर्ग, परका, घराचा
नागरी, अलग, संबंध
माणसाला, स्थळे , शोकांतिका.

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल - 30जुलै 2014मधिल पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याची दुर्घटना

२. लेखाला सुयोग्य शीर्षक - एक होते माळीण गाव

३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज- सांगता येत नाही

४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ काय असावा - 7वर्षे

सध्या पावसाळ्यात सगळीकडे अशा घटना कानावर येतात म्हणून असेच शोकांतिका व निसर्ग असा विचार करुन मला वाटते माळीण येथील दुर्घटना असावी.

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
=> घर आणि कुटुंबव्यवस्था जन्माला आल्यापासून काळाच्या ओघात निसर्गासाठी मानव परका होत गेला. निसर्गापासून अलग राहून नागरी जीवन सुसह्य करताना मानवाचे निसर्गाशी संबंध दुरावले. आज मानवाला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळे गाठावी लागतात. हि खरे तर शोकांतिकाच.

२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.
=> निसर्ग आणि मानव: बदलते संबंध

३. लेखावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, ‘सांगता येत नाही’, इत्यादी)
=> लेखक मध्यमवयीन, पर्यावरणवादी व त्या विषयाचे अभ्यासक असावेत.

४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
=> २००४ ते २००९ (त्सुनामी, मुंबई अभूतपूर्व अतिवृष्टी इत्यादींचा कालावधी)

सियोना, अतुल
वा ! छान लिहिलेत.
.....
मूळ लेख ‘कोंदण’ नावाचा असून त्यात निसर्गावर विवेचन आहे. आपण आपल्या घराला निसर्गापासून तोडले ही मध्यवर्ती कल्पना.

आता निसर्ग अनुभवण्यासाठी आपल्याला कायम ‘बाहेर’ पर्यटनास जावे लागते ही शोकांतिका आहे.

लेखक ५०+ पुरुष. विज्ञानकथा लेखक.
लेखनकाल १९९५.