सावळा

Submitted by SUHASpB on 20 May, 2021 - 01:40

राती इथे वसे अंधार सावळा

वारा दिव्यास दे संचार सावळा

फुंकून फारसा नाही सरावला

पाव्या सवे असे गंधार सावळा

देतेस ह्या उमेदा हारवून का

माझा तुझा असे संसार सावळा

वाद्या स वृंद लागे नाचणार ते

आत्मा नसे तिथे झंकार सावळा

वृंदावनी मिळे कृष्णास राधिका

माझ्यातला हसे ओंकार सावळा

(वृत्त:- प्रमोद्वरा - गागालगा लगा x २)

Group content visibility: 
Public - accessible to all site users