परशुराम

Submitted by कृतिक शैलेश पटेल on 15 May, 2021 - 10:05

रेनूकेच्या सूता तुला शिवाचे वरदान ।
अन एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।धृ।।

सर्व भक्त शिवाचे, तूच एकमेव शिष्य।
प्राप्त त्यांच्याकडून तुला, पिनाक धनुष्य।।
जन्म घेऊन ब्राम्हणाचा, क्षत्रियाचे केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।१।।

सहस्त्रबाहुने जेव्हा केले, कैद रावणाला।
शिवाच्या आज्ञेने गेला, त्यासी सोडविण्याला।।
वध करून पाहरेकर्यांचा, पूर्ण केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।२।।

खांद्यावर परशू तुझ्या, जैसी यमाकडे पाश।
एकवीस वेळा केलासी तू, क्षत्रियांचा विनाश ।।
हादरलीया धरती, सर्व पसरला कोहराम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।३।।

तुटता धनुष्य शिवाचे, गेला स्वयंवरी।
धनुष्य तोडणार्याचा व्हायला अरी।।
जाता स्वयंवरी सीतेच्या, भेटले तुला राम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।४।।

नम्र शब्दाने रामाच्या, त्यागले धनुष्य।
सोपवून दिले तयांसी, भारताचे भविष्य।।
आले एकत्रित तेव्हा सीता आणि राम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।५।।

गंगा पुत्र देवव्रथ, भीष्म तुझा शिष्य।
देऊन धनुर्विद्या त्याला, घडविले भविष्य।।
गाजविला त्याने पुढे, सर्व राज्य जिंकण्याचा पराक्रम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।६।।

सूर्य पुत्र कर्ण, राधेय तुझा शिष्य।
शिकविली धनुर्विद्या, दिले विजय धनुष्य।।
इंद्र भिक्षेकरी ज्याला, दिले त्याला विद्या दान।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।७।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान