मोगर्‍याचं सरबत!

Submitted by सांज on 14 May, 2021 - 12:18
mogra sarbat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोगर्‍याची ताजी फुलं : 25-30
पाणी : दोन लिटर
साखर : दोन-तीन साध्या वाट्या
केसर (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

मोगर्‍याची ताजी टवटवीत फुलं स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची. दुसर्‍या दिवशी ते पाणी फुलांसहित उकळायचं. पाण्याचं प्रमाण जवळपास निम्म होईल इतका वेळ. मग त्यात साखर घालायची. केसर टाकायचं. साखर पुर्णपणे विरघळली की गॅस बंद करायचा. थंड झालं की गाळून बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेऊन द्यायचं.
सर्व्ह करताना एक तृतीयांश हे सिरप आणि बाकी पाणी असं मिक्स करून सर्व्ह करायचं.

करायला अतिशय सोपं आणि चवीला अतिशय सुंदर असं हे सरबत करून पहायला हवं असं आहे. आपल्याकडे आपण फुलांचा स्वयंपाकात फार कमी (शक्यतो नाहीच) उपयोग करतो. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही फुलं शेवटी निर्माल्य बनून जातात. मोगरा खूप थंड आणि स्कीनसाठीही खूप उपयोगी आहे. प्रतिकारशक्तीही त्याने वाढते.
मला या सरबताची कृती गोव्याच्या प्रसिद्ध फॉटोग्राफर असावरी कुलकर्णी यांच्याकडून समजली. त्यांच्या organic food recipes अतिशय सुंदर असतात आणि त्या व्यक्ति म्हणूनही खूप भन्नाट आहेत.
मागच्या उन्हाळ्यात प्रथम मी हे सरबत बनवलं होतं. ते अतिशय अप्रतिम लागतं. मे महिन्यातल्या प्रखर उन्हावरचं हे रामबाण औषध आहे.
ज्यांच्या-ज्यांच्या घरी मोगरा आहे, त्या सर्वांनी अवश्य करून पहा Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dj, वर्णिता
दोघांच्याही कल्पना मस्त आहेत. करुन पहायला हवं

Pages