भाजलेल्या कारल्याची जरा हटके भाजी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 14 May, 2021 - 07:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ कोवळी कारली,एक कांदा,डावभर तेल,दोन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड कूट, फोडणीसाठी हळद,हिंग,मोहरे,जिरे,गोडा मसाला, चवीनुसार तिखट ,मीठ आणि चवीपुरती चिमुटभर साखर

क्रमवार पाककृती: 

कृती : कारली गॅसवर सगळ्या बाजूंनी चांगली खरपूस भाजून घ्या. भाजलेल्या कारल्यांच्या बियांसह काचर्‍या चिरून घ्या. एक मोठा कांदा ऊभाच चिरुन घ्या.
आता गॅसवर कढईत तेल तापवून ,फोडणी करा आणि त्या खमंग फोडणीत उभा चिरलेला कांदा आणि भाजलेल्या कारल्याच्या चकत्या घाला. भाजीत तिखट मीठ गोडा मसाला दाण्याचे कुट व चिमूटभर साखर घालून भाजीला एक दणदणून वाफ काढा.
भाजी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

अप्रतिम चवीची भाजी अगदी बियासुद्धा टेस्टी लागतात.
तळटीप : भाजल्याने कारल्याच्या बिया छान शिजतात आणि भाजी मिळून येते.
कांदा आणि शेंगदाण्याचे कूट न घालताही भाजी छानच होते.

माहितीचा स्रोत: 
गावाकडे एकदा खाल्ली होती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
भाजीत अजिबात पाणी घालायचं नाही?

मस्त आयडीया आहे ही. करून बघणार.
तवा सब्जी बुफे मध्ये ठेवतात त्यात कार्ल भाजून ठेवलेल मस्त लागलेल एकदम.

पाककृती मस्त वाटते आहे. कारली आवडतातच. भाजीही आवडेल.
कारली गॅसवर भाजल्यावर वरचा काळा झालेला भाग तसाच ठेवायचा का? कि वरवर खरवडून काढायचा?
वांगे भाजल्यावर वरचा पापुद्रा अलगद निघतो तसे कारल्याचे होणार नाही. कारली कधी भाजली नाहीत. त्यामुळे प्रश्न पडला.

कारली अजिबात आवडत नाहीत. भाजी केली तर मी लोणच्यासारखी एवढीशी घेते. पण हे भाजकं प्रकरण आवडेल असं वाटतंय. सोनालीला पडलेला प्रश्न मलाही पडलाय. शिवाय ह्या प्रकारात कडूपणा कमी ही केलेला नाहीये मीठ लावून पिळून काढून वगैरे.

96628B22-0278-4ADE-8099-5E708100CF00.jpeg

चवीला थोडासा गूळ व भिजलेली चिंच घातली.
एकदम मस्त !

मी साल काढली नाही. फक्त चकत्या केल्या. एरवीही मला कारले आवडतेच, भाजल्याने कडवटपणा कमी झाला व फ्लेवर मात्र थोडा वाढलाच. एरवी कारले न खाणार्‍या मेंबरांनाही आवडली. फोटो काढू शकलो नाही. सॉरी.

चवीला थोडासा गूळ व भिजलेली चिंच घातली.
एकदम मस्त !
नवीन Submitted by vijaykulkarni on 16 May, 2021 - 01:47
<<
त्या टीव्हीवरच्या कुकिंग च्यानेल वाल्यांत प्रत्येक डिशवर 'गार्निशिंग के लिये पुदिने के दो पत्ते' सारखं,

किंबहुना त्याहिपेक्षा अधिकच कडवेपणाने चिंच-गुळाची चव घातली नाही तर कोकणस्थांना अमृतही गोड लागणार नाही, असं आडकित्तापुराणात नारदमुनींनी सांगून ठेवलं आहे...

जब्राट लागली ही भाजी.
कारले खरपूस bhajalyane एक smoky फ्लेवर आला. उन्हाळ्यात ग्रिलवर भाजून पाहणार. इलेक्ट्रिक बर्नर खूप वेळ लावतो.

व्वा व्वा शाकाहारी बार्बीक्यूसाठी आणखी एक खाद्यपदार्थ सापडला. धन्यवाद प्रमोदजी

अहो, ब्लॅककॅट प्रची मध्ये काहीच दिसत नाही की हो... पांढऱ्या प्लेट मध्ये काहीतरी काळं दिसतंय इतकंच. तरीही तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये मुळे हुरूप आलाय.. नक्किंकरून बघेन.

करून बघा
मस्त होते , थोडी साखर किंवा गुळ घातल्यास बरे होईल, त्यांनीदेखील साखर सांगितली आहे.

कापा, मीठ लावून ठेवा, बिया काढा काही भानगड नाही.
भाजल्यावर मोठ्या बियादेखील अगदी मिळून येतात,

मी केली आहे या रेसिपीने. दिसायला काळी दिसते एकदम पण दिसण्यावर जाऊ नका. चवीला एकदम छान होते ही भाजी.