योद्धा

Submitted by आरती शिवकुमार on 13 May, 2021 - 02:27

कोरोनाच्या संकटातही कामासाठी बाहेर पडतोस तू,
स्वतःच्या खांद्यावर सर्व जबाबदारी घेतोस तू,
माझी काळजी करू नका सतत बोलतोस तू,
पण सर्वांची काळजी घेतोस तू .

कोरोनाच्या संकटातही कष्टाने काम करतोस तू,
संकटाला धैर्याने सामोरी जातोस तू,
कामासाठी आपली भूक सुद्धा मारतोस तू,
कष्टाने काम करून आपला घाम गाळतोस तू.

दुःखामध्ये सुद्धा हसायला शिकवतोस तू,
सुखाची चाहूल देतोस तू ,
आम्हाला आधार देतोस तू,
प्रत्येक संकटावर मात करायला शिकवतोस तू .

पूर्ण दिवस मास्क लावून राहतोस तू,
दमटलेल्या श्वासात दिवसभर वावरतोस तू,
घरी आल्यावर मोकळा श्वास घेतोस तू,
माझी काळजी करू नका सांगतोस तू.

दिवसभरात राब-राब राबतोस तू,
तरीही परिवारासोबत हसत हसत जेवतोस तू,
जेवताना विनोद सांगतोस तू,
स्वतःला होणारा त्रास लपवतोस तू .

कोरोनाच्या या लढाईत पुढे जातोस तू,
आम्हाला मोकळा श्वास घ्यायला लागावा म्हणून,
स्वता:चे जीव प्रणाला लावतोस तू ,
हसत रहा बोलतोस तू .

ही कविता मी, सर्व कोरोना योद्ध्यांसाठी लिहिली आहे.
जे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या या संकटात ही कामावर जातात.

- आरती शिवकुमार

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users